काय JOIN करायचं...आणि काय LEFT करायचं...
हे जाणून आनंदी व्हा ---.
Join कधी व्हायचे,
left कधी व्हायचे...
याचे गणित जमायला पाहिजे.
मनाची गुपितं,
सुखदुःख व्यक्त करण्यास...
join होता आलं पाहिजे.
आपल्या मताला,
आदर,किंमत,सन्मान
नसेल तर तिथून...
left होता आलं पाहिजे.
सज्जनांच्या संगतीत...
join होता आलं पाहिजे,
दुर्जनांच्या संगतीतून...
left होता आलं पाहिजे.
परोपकारी,समाजसेवी कार्यक्रमात
join होता आलं पाहिजे.
स्वार्थी,अप्पलपोटी माणसांतून
left होता आलं पाहिजे.
संवेदनशील,परमार्थ करणाऱ्या जगात...
join होता आलं पाहिजे,
अहंकारी,स्वार्थी, भावनाशून्य
जगातून...
left होता आले पाहिजे.
मुलांच्यासाठी योग्य वयापर्यंत
join होता आलं पाहिजे,
योग्य वेळी त्यांच्या सासंरीक प्रपंचातून
left होता आलं पाहिजे...
कारण
Join ला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व...
Left ला आहे..........👍
No comments:
Post a Comment