Friday, July 1, 2022

 खूपदा  वाटतं

 फोटोत जाऊन बसलेल्या 

आईशी निदान फोनवर बोलावं 

जमलं तर इंद्राशी गोड  बोलून 

तिने परतूनच यावं 

सकाळी झोपेतून तिनं 

हळूच उठवावं 

तरी तिच्या मांडीवर 

लोळत पडावं 

तिच्या हातच काहीही 

मनसोक्त खावं 

तिने पाण्याला सुद्धा 

दिलेल्या फोडणीने 

घर दरवळून जावं 

वय किती ही वाढलं असो 

तोंड तिच्या पदराला पुसावं 

स्वयंपाक शिकून घे 

तिने सतत ओरडावं 

आणि आपण मात्र 

ओट्यावर बसून 

आयतंच  खावं 

आई कुठल्या रंगाचा

 घालू ग ड्रेस 

म्हणून सतवावं 

तिच्या साडीच्या मऊ स्पर्शाची 

पैठणी ला नाही सर , तिला सांगावं 

बाहेरून आल्यावर 

तिनेच समोर दिसावं 

थकला असशील ना म्हणून 

लगबगीने पाणी द्यावं 

आपण ही आल्या आल्या

 आज दिवसभरात घडलेलं 

अधाशा सारखं सांगून टाकावं 

आपल्याशी वाईट वागणाऱ्या वर 

तिने खूप रागवावं 

आपली चूक असली तरी 

आपलीच बाजू घेऊन भांडावं 

आई तू गेल्यापासून

खाण्या पिण्याची 

सणा वाराची मजाच गेली 

दारापुढची रांगोळी 

तुळशीची रयाच गेली 

आता नेहमीसारखी देवाची 

पूजा नाही करत 

कुणी उपास नाही धरत !

किती बोलायचो आपण 

पण नंतर कामात गेलो बुडून 

पाच मिनिटं बोलतोस का बेटा 

विचारायचीस घाबरून 

तुला दिसतंय ना कामात 

आहे ग मी ..जा ना 

असंच  म्हटलं मी 

आणि खरंच निघून गेलीस तू परत 

ना येण्यासाठी. 

असं कुठलं काम असतं 

आईशी बोलायलाही 

नसतो वेळ 

माहीतच नसतं आपल्याला 

नियती मांडून बसली आहे 

वेगळाच खेळ

 मला कृष्ण कन्हैयाशी भांडायचंय

सगळीकडे म्हणे देव नाही 

जाऊ शकत.

म्हणून बनवली आई.

देवा तूच तिला नेण्याची 

का केलीस घाई

आता हे घर निशब्द आहे 

यात नाही तुझ्या मायेची ओल 

आज ही तुझा फोटो 

पाहिला की 

काळजात उठते कळ खोल 

आज ही आनंद झाला की 

तुझ्यापुढे येऊन नाचतो 

आज ही कुणी दुखावलं 

तर तुझ्या समोर रडतो 

चूक झाली तर तुझ्यापुढे 

येऊन कान धरतो 

नवीन काही सुरु करताना 

नमस्कार करतो

पण फोटोत तुझे शब्द नाहीत 

तुझा स्पर्श नाही 

आई तुझ्याशिवाय कशालाच अर्थ नाही 

बघ ना जमेल तर 

बोलता येईल का प्रत्यक्ष भरभरून 

खरंच का ग एकदा 

गेलेली माणसं येत नाहीत परतून ?

😔 i miss you Aai ज्यांना आई आहेना त्यांनी त्या मातेला कधी ही अंतर देऊ नका... 

कारण मातेची किमया फारच निराळी आहे बरं.. *!!आई म्हणोनी कोणी. आईस हाक मारी. ती हाक येई कानी.

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...