Friday, July 1, 2022

माझी परछाई........

 आई तू बनून राहशील ना गं 

माझी परछाई........ 


आई, माझ्या आठवणीतील 

वृंदावन बनशील ना गं माई

कारण आठवण येईल मला तुझी

चार दिशात ठायी ठायी.....

आई तू बनून राहशील ना गं माझी परछाई..........


मनाचा गोटा करीत 

काढील तो दिसही 

परंतु वचनांना तुझ्या

कुलूप कधी लावू देणार नाही.....

आई तू बनून राहशील ना गं माझी

परछाई..........


हुंदका दाटून आल्यवरही 

अश्रू पाघळू देणार नाही 

रीतसर तुझ्या संस्काराला 

कवळीमोल बोलू देणार नाही.....

आई तू बनून राहशील ना गं माझी 

परछाई..........


आठवण येईल घास घेतांना 

हाक मारून तू उठवायची 

माझा हा तो दिवस माई 

पुन्हा कधी येणार नाही.....

आई तू बनून राहशील ना गं माझी 

परछाई..........


धर्माच्या या संस्कारानी 

यावं लागलं गं सासरी 

संसाराच काही कारण नसतं ना 

तुला सोडल नसतं गं क्षणभरही.....

आई तू बनून राहशील ना गं माझी 

परछाई.......... 💐💐

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...