Wednesday, February 8, 2023

 सर्व कर्तृत्ववान महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

💐💐💐💐💐💐💐💐


       *“वेध स्त्री मनाचा”*
                        (..डॉ. स्वप्नील मानकर )


*वेध स्त्री मनाचा अहो घ्याल का कुणी जरा !*
*साद तिच्या दुःखांना द्य़ाल का कुणी जरा !!*

विसरून सारं काही !
करत राहते कर्तव्य !!
पाहत असते नेहमी !
घरदाराचे भवितव्य !!
*आवडे तुज काय विचाराल का कुणी जरा !*
*वेध स्त्री मनाचा अहो घ्याल का कुणी जरा !!*

मुलबाळांंमध्ये तिला !
तिचे सर्वसुख दिसते !!
त्यांना घडविण्यातच !
तिला स्वारस्य असते !!
*मुलांना कशी वागवते पहाल का कुणी जरा !*
*वेध स्त्री मनाचा अहो घ्याल का कुणी जरा !!*

तीच जिजाऊ सावित्री !
ती असे दुर्गा सरस्वती !!
अनिष्टांना संपविण्या !
घेई वेगवेगळे रूप ती !!
*फेड त्या उपकारांची कराल का कुणी जरा !*
*वेध स्त्री मनाचा अहो घ्याल का कुणी जरा !!*

मनातल्या भावनांना !
ती व्यक्त कधी करते !!
सासरी असताना ती !
तर प्रेमाकरिता झुरते !!
*घास आईच्या मायेने भरवाल का कुणी जरा !*
*वेध स्त्री मनाचा अहो घ्याल का कुणी जरा !!*

एवढं करून ही स्त्री !
गर्भात मारली जाते !!
शिक्षण तर रहिलं दूर !
ओझे समजली जाते !!
*दोष कसा तिचा यात सांगाल का कुणी जरा !*
*वेध स्त्री मनाचा अहो घ्याल का कुणी जरा !!*


                                  .....शीघ्रकवी स्वप्‍नील
                                         ०८/०३/२०१७

डॉ. स्वप्‍नील मानकर
मानकर बाल रुग्णालय
शिंदें प्लॉट्स, यवतमाळ
9850330301

©© आवडल्यास कृपया नावासाहित फॉरवर्ड करा
धन्यवाद
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

 सुप्रभात 


दिनविशेष .... जागतिक महिला दिन 

कल्पवृक्ष अशा आजीला 
सुगरण अशा आईला 
अन्नपूर्णा अशा अहो आईंना 
समाधानी अशा काकूंना
मनकवड्या अशा मामींना
प्रेरक अशा मावशींना
शिस्त अशा आत्यांना
समंजस अशा नंदांना
मायाळू अशा जावांना
नम्र अशा वहिनींना  
कर्तृत्ववान अशा बहिणींना
कुशल अशा सुनांना 
धाडसी अशा पुतणींना
बोलक्या अशा भाच्यांना
अष्टपैलू अशा लेकींना
आनंदी अशा नातींना 
अंतर्यामी अशा मैत्रिणींना 
वक्तशीर अशा नोकरदार महिलांना 
कार्यक्षम अशा उद्योजिकांना 
कर्तबगार अशा विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या महिलांना 
कलावंत अशा कलाकारांना
अष्टावधानी अशा समस्त गृहिणींना ....

*जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

 📚 *घटस्थापना वाचन संस्कृती वाढवण्याची* 📚


*नवरात्र विशेष*

 * दररोज एका दुर्गाचे वाचन करु या ..
 *वाचायला विसरू नका*

 *पहिली दुर्गा* 1️⃣


_*📚 मेरा पांडुरंग नही दुंगी*_

_*✍🏼 लेखक : प्रा.हरी नरके*_
 
_*


_*➖➖➖➖➖
   _*10 मार्च 1897 ला सावित्रीबाई गेल्या. काम करता करता गेल्या. पुण्या-मुंबईत प्लेगनं कहर मांडला होता. शेकडो माणसं दररोज मरत होती. त्यांच्या मृत्यूची नोंद करायला नगरपालिकेजवळ कारकून नसल्यानं आज 367 लोक मेले. आज 289 लोक लोक मेले अशा नोंदी नगरपालिकेच्या दप्तरात केल्या जात होत्या.*_

     _ब्राह्मण विधवेकडून दत्तक घेतलेला सावित्रीबाईंचा मुलगा यशवंत डॅाक्टर होता. तो सैन्यात नोकरीला होता. सावित्रीबाईंनी त्याला तारेने बोलावून घेतले. हडपसरजवळ ससाणे मळ्यात तंबू टाकून दवाखाना सुरू करायला लावला. तो आईला ह्या आजाराची भीषणता समाजावून सांगत होता. सावित्रीबाईंचा एकच प्रश्न होता, *"आज जोतीराव असते तर ते निष्क्रिय बसून राहिले असते काय? आपल्याला जमेल तेव्हढ्या रूग्णांना आपण वाचवूया."*_

    _त्याकाळात न ‍अँब्युलन्स होती ना स्ट्रेचर. आजार भयानक होता. संसर्गजन्य होता. आजारी माणसाला स्पर्श केला तर माणूस मरतो हे डोळ्याला दिसत असल्यानं पुणे शहरावर मृत्यूची छाया पसरलेली होती. कुणीही मदतीला येत नव्हतं. पुणे शहरभर प्लेगच्या उंदरांचं आणि गिधाडांचं साम्राज्य पसरलेलं होतं._

    _अंधश्रद्धेमुळं लोक औषधपाणी करायला, घरात फवारणी करून घ्यायला घाबरत होते. पुण्यात रँडसाहेब आरोग्याची सक्ती करीत असल्याची नाराजी वाढत होती. सावित्रीबाई एकटीनं घरोघर फिरून आजारी असलेल्या लहान मुलं, मुली, महिला यांना उपचारासाठी यशवंतच्या दवाखान्यात घेऊन जात होत्या. स्वत: त्यांची सुश्रुषा करीत होत्या._

     _इतक्यात मुंबईत कामगार नेते आणि भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे हे प्लेगने आजारी असलेल्या कामगारांवर, रूग्णांवर उपचार करताना गेल्याची बातमी आली. सावित्रीबाईंना शोक अनावर झाला. जवळचा खंदा कार्यकर्ता गेला._

     _पण त्या रडत बसल्या नाहीत. उठल्या नी पुन्हा कामाला लागल्या. पुणे शहरातले बहुतेक सगळे पुढारी जिवाच्या भितीनं गावोगावी पांगले होते._

     _सावित्रीबाईंनी कित्येकांना वाचवले. बरे केले. मुंढव्याच्या दलित वस्तीतल्या गायकवाडांच्या मुलाला प्लेग झाल्याचं सावित्रीबाईंना समजलं. गायकवाड अस्पृश्य मानले जात असल्यानं सरकारी वैद्यकीय कर्मचारीही मदत करीत नव्हते._

     _सावित्रीबाई तिथं धावून गेल्या. पांडुरंग गायकवाड 11 वर्षांचा होता. काखेत गोळा आलेला. तापानं फणफणलेला. एका चादरीत पोराला गुंडाळलं. पाठीवर घेतलं._

    _सावित्रीबाईंचं वय झालेलं होतं. गेली पन्नास वर्षे त्या अहोरात्र राबत होत्या. 7 वर्षांपुर्वीच जोतीराव गेलेले होते. मुंढवा ते हडपसरचा ससाणे मळा, व्हाया मगरपट्टा पल्ला मोठा होता. 67 वर्षे वयाची एक म्हातारी बाई अकरा वर्षांच्या आजारी पोराला पाठीवर घेऊन साताठ किलोमीटर चालत जाते. त्याच्यावर उपचार करते. त्याला बरा करते. पांडुरंग जगतो. मोठा होतो._

     _सावित्रीबाई त्याला पाठीवर घेऊन चालल्या असतील तेव्हा त्या नक्की प्लेगला सांगत असणार, *"मेरा पांडुरंग नही दुंगी."* मृत्यूला त्यांच्यापुढे पराभव पत्करावा लागला. पण त्याच काळात, त्याच कामात सावित्रीबाईंना मात्र प्लेगचा संसर्ग झाला. पांडुरंग हा त्यांनी वाचवलेला शेवटचा रूग्ण._

     _सलग 50 वर्षे आपला देह या समाजासाठी, महिला, मुलं, मुली यांच्यासाठी त्यांनी वाहिलेला होता. आता देह थकला होता. 10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाई प्लेगमध्ये रूग्णसेवेचं काम करता करता गेल्या._

   _*राजकीय स्वातंत्र्यासाठी लढणारे इतिहासात अजरामर झाले. या सामाजिक शहीदांसाठीही आपण एखाद दुसरा आसू असू द्यावा.*_

📚📚📚📚📚📚📚

उद्या पुन्हा भेटू या एका नव्या दुर्गसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद !!!

 *संग्रहित सौ.भावना मेथा* साभार *_विजय तारा नामदेव_*

 चर्च, मंदिर, मशिदींनी 

घेतला मोकळा श्वास
ना कुणी भक्त
ना कुठला हव्यास 
ना कुठली ईच्छा
आता सर्वांना फक्त
"जगणे" हाच ध्यास

जाती,धर्म स्वार्थापायी
ज्यांनी उठवले होते रान
त्या कट्टरांच्या तलवारीही
आता झाल्या म्यान

आता ना कसले वाद 
ना कुठला उन्माद
सर्वजण घरी घेत आहेत
घरच्या जेवणाचा आस्वाद

कोंबड्या, बकरींनाही 
मिळाले तुर्तास जीवनदान
शाकाहारात शोधू लागले
जेवणाचे समाधान..।

विदेशातही झाला चमत्कार
अलिंगन सोडून 
करत आहेत
एकमेकांना नमस्कार
ऐषोरामाचा माज उतरून
अचानक आले भान
जुनाट भारतीय संस्कृतीचा
वाटू लागला अभिमान

माॅल, थिएटर, जीम, बागा
सर्व चंगळवाद झाला बंद
मोठमोठ्या, अलिशान 
गाड्यांचा वेग झाला मंद
धर्म, जात, देश अथवा
तुमचा कुठलाही असो वंश
निसर्गाचा असा एक अंश
करेल जगाचा विद्धंस

निसर्गाच्या एका अंशाने
अशी दाणादाण उडवली
कोटीच्या कोटी माणसे
घाबरून लपून बसली
ना चालली कुठली शस्त्र 
ना चालले कुठले अस्त्र
ना चाले कुठले तंत्रज्ञान
आज फिके पडे सारे
आपले प्रगत विज्ञान...

निसर्ग हाच देव
निसर्ग हाच धर्म
निसर्गाला जपणे
हेच आपले कर्म...
✍🙏

 *वेळ द्या आपल्या साठी😘😘*

मागे एक दोन महिन्यांपूर्वी मी तिला मेसेज केला.फेसबुक वर.

Hii कशी आहेस?काय चालु आहे?

(आता आम्ही तसे मित्र आहोत.म्हणजे एकमेकांशी कुठे भेटलो तर बोलतो म्हणजे अगदीच अनोळखी नाही.)

तर तिचा रिप्लाय असा आला
---मी खूप बिझी असते.महत्वाचे काय ते बोल.

मी फक्त बर म्हणलो.पुन्हा मेसेज करणार नाही हे ठरवूनच.
ती काहीतरी ट्युशन घेते इतके समजले.

असू शकतात लोक बिझी. आणि असावे.
पण समोरचा कधीतरी खूप दिवसांनी बोलतोय तर काही मिनिटे देऊ शकत नाही? बर त्यावेळेला जाऊदे पण आपण नंतर बोलू हे तरी बोलू शकतो ना.आणि समोरचा खूप पकवतोय तर गोष्ट वेगळी.

असो.
मग मी या अनेक बिझी लोकांचा स्टडी केला.माझे इव्हन तुमचे ही अनेक मित्र परिवार असा असेल जो कायम बिझी.
माझे बालमित्र,कॉलेजमित्र असे अनेक जण त्या त्या काळात खूप घनिष्ठ होते.असे वागत जणू मैत्री म्हणजे हेच उदाहरण.
पण हे समजले की,काळ जसा पुढे जाईल आणि सो called एखादा वेल सेटल जॉब मिळाला,लग्न झाले की अशी काय अहंकाराची नकळत झालर लागते की या लोकांना साधी माणसे,साधे मित्र नकोसे होतात किंवा दूर दूर जातात.
अनेकांना आपण एकट्यानेच पुढे जावे,मोठे व्हावे असे वाटते.
मग कधीतरी कोणी बँक मॅनेजर,कोण गव्हर्नमेंट नोकरदार कोण IT तर अजून कोण चांगला ऑफिसर झाला तर नेमके ही लोक का बदलत असावीत??
म्हणजे त्यांचे स्टेटस,राहणीमान बदलून किंमत वाढते म्हणून??
की खिशात खूप पैसा खळखळतो म्हणून??
याचा अर्थ तुम्ही चोवीस तास नेहमी संपर्कात राहावा असा नक्कीच नाही.
कधीतरी महिन्यातुन एकदा स्वतःहून एखादा कॉल आला तरी अनेकवेळा जिंकता येते.
कसा आहेस? काय करतोस? सर्वजण ठीक आहेत ना?? ही साधी वाटणारी वाक्ये पण किती आधार देतात.
कधीतरी स्वतःहून मेसेज तरी केला तर काही चुकेल का?जग इतके जवळ आले असूनही?काही महाशय तर एखाद्याला वाढदिवस निम्मित शुभेच्छा फक्त "HBD" लिहून देतात.बापरे किती ते कष्ट अन किती मोठं मन नाही का.

पण नाही.आम्ही कोणीतरी वेगळे आहोत.
अहो ठीक आहे.सिकंदर बिचारा जाताना सांगून गेला शेवटी काही राहत नाही.
रावण असो किंवा पृथ्वी तलावावरील कोण कायम आहे?

तुमचा अहंकार??
माझा असाच एक मित्र आहे.खूप कामात व्यस्त.नुकतेच त्याच लग्न झालं.आई सतत त्याच उदाहरण देते बघ तो कसा हुशार आहे.अमुक तमुक.
तर त्याच्या लग्नाला त्याचे मोजून चार मित्र होते.
बिचारा एकटाच पळत होता.पत्रिका वाटण्यापासून खूप काही करताना दमछाक दिसत होती.

असेच अनेक माझे मित्र आहेत.मोठमोठ्या पोस्ट वर काही अपवादात्मक सोडले तर अनेकजण गर्विष्ठ अन बिझी.

पैसा, धावपळ,मला अजिबात वेळच नसतो,स्टेटस,बॉस,वीकएंड एन्जॉय, मोजकेच अन एकाच पातळीवरचे मित्र ,माझा जॉब,
माझं अमुक तमुक म्हणणारी आज कोरोनाने ठप्प केलं.आक्ख जग.
काय केलं?
सांगू शकताल त्याला??I am busy.

मी कोरोनाच समर्थन करत नाही पण अनेक गोष्टी त्यातून शिकायला मिळाल्या.
आपलं जवळच कोण,लांबच कोण अन नावाला मित्र कोण हे दाखवले.
आणि जे आपले आहेत त्यांचे कॉल येतात किंवा करू वाटतात.

परवा त्या बिझी मुलीचा वाढदिवस होता.लॉककडाऊन मध्ये.
पण मी शुभेच्छा नाही दिल्या.मी बिझी होतो.माझ्या वाचनात,माझ्या इतर अनेक गोष्टींत😊

माणूस पैशांनी श्रीमंत असावा नक्कीच.पण सोबत माणसे तराजूत न तोलता मोठ्या श्रीमंत मनाने जपणे काय कठीण आहे??
अर्थात संगत पण ओळखता यावी.उगाच करायचे म्हणून कुठलेही वाईट विचारांचे मित्र नकोच.

दोन दिवसांपूर्वी माझ्या मित्राची आई वयोमानानुसार आजारपणातून देवाघरी गेल्या.
आज त्याला कॉल केला.विचारपूस केली.काळजी घे सावर असे चार शब्द बोललो.
शेवटी तो मनापासून म्हणाला,
"खूप बरं वाटलं तुझ्याशी बोलून,😌"

पैशांत ताकद जास्त नक्कीच असेल पण त्यापेक्षा जास्त मनाच्या श्रीमंतीत,दिलदार स्वभावात असेल.त्याच स्टेटस ठेवता येत नाही पण माणसे नक्कीच जोडून ठेवू शकतो.

शेवटी कोणीतरी म्हणलेच आहे,
Give Respect
Take Respect😊

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...