Tuesday, August 16, 2022

निवृत्त मी झालो,पण निवांत ती झाली*

निवृत्त मी झालो,पण निवांत ती झाली*


      सकाळच्या पहिल्या चहाची
      जबाबदारी माझ्यावर आली
        दूध ऊतू जाऊ न देण्याची 
      काळजी माझ्या शिरी आली
               निवृत्त मी झालो,
              निवांत ती झाली ।

         आजचा नाष्टा ठरवायची 
आणि, करायची पाळी माझ्यावर आली
     कांदा चिरताना आसवे गाळायची
           वेळ आता माझ्यावर आली,
                 निवृत्त मी झालो,
                 निवांत ती झाली ।

       कुकरच्या शिट्यां मोजण्याची
            आता मला सवय झाली
            तव्यावरची गरम पोळीही 
         आताशा चटके देईना झाली
                   निवृत्त मी झालो,
                   निवांत ती झाली ।

          दुधाचा खाडा,पेपरचा खाडा
               फोन बिल,लाईट बिल
               हिशोब ठेवताना माझी
                  त्रेधातिरपीट झाली
                    निवृत्त मी झालो,
                   निवांत ती झाली । 

          घड्याळाच्या काट्याबरोबर
           फिरण्यातून,ती मुक्त झाली
              लवकर उठण्याची सवय
              आता,तीने सोडून दिली 
                    निवृत्त मी झालो
                   निवांत ती झाली ।

             माझ्यासाठी धावणारी ती
              आता जरा थकू लागली
           थकलेल्या तिच्या पावलांची
            आता मला चाहूल लागली
                     निवृत्त मी झालो
                    निवांत ती झाली ।

                *~~~~~🌹~~~~~*


#################################################


*एक ओळ हिंदी आणि दुसरी मराठी असा प्रयोग मराठी गजलेत करणाऱ्या शायराला माझा दंडवत🙏*

ऐ सनम आँखों को मेरी 
खूबसुरत साज दे
येऊनी स्वप्नात माझ्या 
एकदा आवाज दे...

आहटों से दिल की 
बेचैनी मेरे बढ़ने लगी
ऐक आभासा मला 
थोडा तरी अंदाज दे

ऐ खुदा मैं चाहता हूँ 
हर कोई चाहे मुझे
गंध दे मजला फुलांचा, 
हासणे निर्व्याज दे

लज्ज़त-ए-ग़म के सिवा 
तूने मुझे सबकुछ दिया
वेदनांनी बहरलेली एक 
सुंदर सांज दे...

उम्र अब ढलने लगी है, 
कर लूँ कुछ बहरे-ए-खुदा
टाळ चिपळ्या दे इलाही, 
आणखी पखवाज दे...

*-- इलाही जमादार.*

एक वर्ष असे ही* 2020🤬


 *ना सुगंध लोणच्याचा* 
 *ना कप आईस्क्रीमचा*
 *ना रस उसाचा*  
 *ना रस आंब्याचा*

  एक वर्ष असे ही... 

 *ना लग्नाचे आमंत्रण,*
 *ना हळदीचे जेवण ,*
 *ना मातीचे आवताण*
 *ना दहाव्याचे बोलावणं*

  एक वर्ष असे ही... 

 *ना अपेक्षा साडीची* 
 *ना मागणी मेकअपची* 
 *ना खरेदी बुटांची*  
 *ना घडवणी दागिन्यांची* 

  एक वर्ष असे ही... 

    *नाही तिकिट रेल्वेचे*           
    *नाही आरक्षण बसचे,* 
    *नाही बुकिंग फ्लाइटचे*  
    *रिक्त होते रुम हॉटेलचे*

  एक वर्ष असे ही .. 

 *ना वडिलांचे अंगण,*
 *ना आईच्या हातचे वरण*
 *ना मामाकडचे पुरण* 
 *ना काका कडचे जेवण* 

  एक वर्ष असे ही .. 

    *ना मंदिराची घंटा,*
    *ना दर्शन साठी तंटा*
    *ना दानधर्म भक्तांचा* 
    *ना प्रसाद देवाचा* 

 एक वर्ष असे ही .. 
 
*नेहमीच राहील या वर्षाची आठवण*

 *पुनः कधीच येऊ नये असे वर्ष*
😷2️⃣0️⃣2️⃣0️⃣😷

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

: *जाहल्या काही चुका..!!*

*पाठवलेले हे गाणं प्रथम सुरू करा आणि या स्वर्गीय गीताचा आनंद घेता घेता खालील रसग्रहण वाचा...एक अनाकलनीय अनुभूती येते...केवळ अप्रतिम...*

*"अशीच गेली हयात सारी*
*कथा असे हीच जीवनाची*
*करायचे ते कधी न जमले*
*नको नको ते करून झाले*

*हसून झाले रडून झाले*
*भलेबुरे ओळखून झाले*
*आता निघू दया मला सुखाने*
*बरेच माझे जगून झाले"*

*आयुष्याच्या उत्तरार्धात सगळीच माणसं आपापल्या परीनं आपल्या आयुष्याचा हिशेब मांडत असतात.*
*खरंच आपण काय कमावलं ? आणि काय गमावलं ? याचा ताळेबंद मांडतात,*
*आणि तो सादर करतात विधात्यासमोर...*

*आणि नेमकी हीच काहीशी भावना *मंगेश पाडगावकरांच्या सिद्धहस्त लेखणीतून एका काव्यात अवतरली.*

*जाहल्या काही चुका*
*अन्‌ सूर काही राहिले*
*तू दिलेले गीत माझे*
*आवडीने गायिले*

*पाडगांवकरांनी आयुष्यालाच गीता ची उपमा दिलीय.*
*ते म्हणतात की हे आयुष्य गीत गाताना किंवा सादर करताना, हे ईश्वरा माझ्या काही चुका झाल्या, काही सूर राहून गेले पण तरी देखील तू हे दिलेलं आयुष्य (गीत) मी आवडीने जगलो (गायलो).*

*पहिल्या अंतऱ्यात ते म्हणतात...*
 
*चांदण्यांच्या मोहराने*
*रात्र केव्हा दाटली*
*काजळी काळ्या ढगांनी*
*हाक केव्हा घातली*
*मी स्वरांच्या लोचनांनी*
*विश्व सारे पाहिले*
👇🏻
*आयुष्यात चांदण्यांची रात्र म्हणजे सुख आणि काजळी काळ्या ढगांची हाक म्हणजे दुःख, हे दोन्ही अनुभवले आणि तू दिलेल्या गीताच्या स्वरातून (आयुष्याच्या माध्यमातून) मी सगळं जग पाहिलं (अनुभवलं).*

*दुसऱ्या अंतऱ्यात पाडगांवकर लिहितात..*.

*सौख्य माझे, दु:ख माझे*
*सर्व माझ्या भावना*
*मोर स्वप्नांचे निळे अन्‌*
*विंधणाऱ्या वेदना*
*मी असे गीतांतुनी*
*सर्वस्व माझे वाहिले*
 👇🏻
*मी भोगलेली सारी सुखं आणि दुःख, बघितलेली सुंदर स्वप्न आणि ठसठसणाऱ्या वेदना ह्या आयुष्य भर ओझं म्हणून वाहिल्या (आणि आज त्या तुझ्या चरणावर वाहतो आहे असा सुप्त अर्थ सुद्धा निघतो)*

*शेवटच्या कडव्यात पाडगांवकर आणखी भावुक होऊन लिहितात.*

*संपता पूजा स्वरांची*
*हात तू देशील का ?*
*दाटुनी काळोख येता*
*तू घरी नेशील का ?*
*पूर्णतेसाठीच या मी*
*सर्व काही साहिले*
👇🏻
*संपता पूजा स्वरांची म्हणजे माझं हे आयुष्य गीत संपल्यावर हे विधात्या तू मला हात देशील ना ? आणि काळोख दाटून आल्यावर म्हणजे माझ्या मृत्यूनंतर तू मला तुझ्या घरी नेशील ना ? किंबहुना तू मला तुझ्या घरी ने, कारण या पूर्णतेसाठीच, पूर्ततेसाठीच तर आतापर्यंतचा हा सुख दुःखाचा आयुष्य प्रवास मी सहन केलाय.*

*एक अत्यंत नितांत सुंदर, पण तितकीच आर्त अशी ही आयुष्याच्या संध्याकाळची भावना शब्दबद्ध करणं हे खूपच अवघड काम पण सिद्धहस्त कवी मंगेश पाडगावकरांनी ती भावना अगदी सहज कागदा वर उतरवली.* 
*खळे काकांसारख्या अत्यंत श्रेष्ठ संगीतकाराने आपल्या चालीने आणि संगीताने त्यात आणखी गहिरे रंग भरले.*
*आणि लताबाईंनी तर ही कवीच्या शब्दातली आर्तता, ईश्वराच्या चरणी नतमस्तक होतानाचा शरणभाव, लीनता आणि आपल्या संपूर्ण आयुष्याचा हिशेब त्याच्या समोर मांडतानाचे अत्यंत संयमित संतुलित आणि शांत स्निग्ध भाव आणि त्यातली परिपक्वता मांडताना कुठेही कसूर ठेवलेली नाही.*

*ह्या सगळ्याच भाव छटा लता मंगेशकर यांच्या गंभीर स्वरांतून ऐकतांना आपणही भावविभोर होतो, अस्वस्थ होतो.*

*श्रीनिवास खळे यांची ही संथ चाल हळूहळू आपल्या मनात झिरपत आपल्या मनाची पकड घेते आणि गाणं संपल्यावर आपल्याला अंतर्मुख करते.*

*संपूर्ण गीतात सुरुवातीचा, आणि अंतऱ्यामधल्या जागा गाण्यातली आर्तता वाढवतात एकंदरीत हे गाणं आपल्या जिव्हारी लागतं, आपल्याला घायाळ करतं..*.  

*जाहल्या काही चुका* 🙏🏻

खूप वर्षांनी पुन्हा तो आयुष्यात डोकावला

माझ्याविना आयुष्य कसं वाटलं
कानाशी पुटपूटला
छानच की...... मी म्हटलं 😊

संसाराच्या गाढ्यात सहाजिक तुझं विस्मरण झालं
अस्तित्वावर बोट ठेवायला पुन्हा
का येणं केलंस ?

रोजच्या धावपळीत स्वत:लाच 
विसरले होते
संघर्ष कुठच नव्हता म्हणून हळूवार तुझे बोट सोडले होते

शाळाकॉलेजमध्ये तू सोबत होतास म्हणून 
अशक्य ते शक्य झालं 
मेहनती ने का असेना,यशाच शिखर गांठता आलं 

आता संसारात मुलांसाठी मन मारावं लागतं 
एवढं करुनही आईला काही येत नाही अस त्यांना वाटतं

दोन पुस्तक शिकून मुलं गर्व करू लागतात
पहिला गुरु आई हेच नेमकं विसरतात

नवऱ्याच्या पाठीशी बायको खंभीर उभी रहाते
पण प्रशंसा सोडून,'वेंधळीच आहेस बघ' हेच ऐकायची सवय होते

तू होतास तेव्हां आयुष्य होत छान
सुधारीत जगात जगताना नवरा, मुलांशिवाय हलत नाही पान

मी मात्र मागे राहिले ,स्वत:साठीच जगायचं विसरले....
मित्रा आता तरी घे हातात हात
आजन्म दे तूच आता साथ

तो म्हणाला मला मिळवण्यासाठी
कणखर व्हावं लागतं 
नवा दिवस उजाडावा तर पृथ्वीलाच 
सूर्याभोवती फिरावं लागतं 

हसून विचारलं त्याला आहेस कोण एवढा खास?
तोही हसला...म्हणाला ओळखलं 
नाहीस अजून....?
मी आहे तुझाच...... आत्मविश्वास

               कविता...आत्मविश्वास🙏🏻

=================================================
---व. पु. ची एक भन्नाट कविता ---

माझं घर तसं तीन खोल्यांचेच होतं
आजोबांपासून नातवापर्यंत भरलेल होत,
पोपट, कुत्रा, मांजरांनाही मुक्तद्वार होतं
घरादाराला कधीही ’लॉक' नव्हतं..
*तरीही माझ जीवन सुखाचं होतं* ||१||

आजोबांच स्थान घरात सर्वोच्च होतं
स्वयंपाकघर आजीच्या ताब्यात होत,
पाहुण्यांचे येणे-जाणे नित्याचेच होतं
आई-बाबांना एकमेकांशी बोलताही येत नव्हतं..
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* ||२||

घरासमोर छोटंसं अंगण होतं
तुळस, प्राजक्ताला तिथे फुलता येत होतं,
दारात रांगोळी काढणे अनिर्वाय होतं
विहिरीवरून पाणी भरण कष्टाचं होतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || ३ ||

आंघोळीला लाईफ़बॉय साबण असायचा, 
माणसापासून म्हशीपर्यंत सगळ्यांनाच चालायचा,
दात घासायला कडुलिंबाचा फ़ाटा लागायचा- 
दगडाने अंग घासणं फ़ारसं सुसह्य नव्हतं
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || ४ ॥

पायात चप्पल असणं सक्तीच नव्हतं
अंडरपॅट बनियनवर फ़िरणं जगन्मान्य होतं
शाळेसाठी मैलभर चालण्याचं अप्रूप नव्हतं
मोठ्यांना सायकलशिवाय दुसरं वाहन नव्हतं..
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || ५ ॥

शाळेत गुरुजनांप्रती आदर होता
घोकंपट्टीला दुसरा पर्यायच नव्हता,
पाढे पाठांतराचा आग्रह सर्वत्र होता
छडी हे शिक्षकाचं लाडकं शस्त्र होतं..
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || ६ ॥

शाळेत गरीब श्रीमंत हा भेदभाव नव्हता,
नादारी सांगण्यात काही संकोच नव्हता,
अंगणात येवून शिकणाराही एक वर्ग होता
कलांना "भिकेचे डोहाळे" असंच नाव होतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || ७ ॥

नव्या कपड्यांचा लाभ लग्न-मुंजीतच व्हायचा
पाटाखालच्या इस्त्रीला पर्याय नसायचा, 
शाळेचा युनिफाॅर्म थोरल्याकडूनच मिळायचा
तिन्हीसांजेला घरी परतणं सक्तीच होतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || ८ || 

वळचणीत चिमण्यांच्या पिढ्या नांदायच्या
पोपटांचा थवा झाडावर विसावायचा,
कुत्रा, मांजर, डुकरांनी गाव भरलेला असायचा - 
उंदीर, डास, ढेकुण यांचे सार्वभौम् राज्य होतं..
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || ९ ||

पुस्तकातले प्राणी अचानक रानात दिसायचे
घाबरगुंडी उडाली तरी ते आपलेच वाटायचे,
उरलेले प्राणी नंतर पेशवेपार्कात भेटायचे - 
नॉनवेज खाणं हे तर माहितीच नव्हतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || १० ||

शाळेत अभ्यासाला खूप महत्व होतं
नंबरावर बक्षीस/छड्या यांचं प्रमाण ठरत असतं,
कॉपी, गाईड, क्लासेसना स्थानही नव्हतं
वशिल्याने पास होणं माहितीच नव्हतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || ११ ||

गावची जत्रा हीच एक करमणूक असायची - 
चक्र-पाळण्यात फिरण्यात मजा मिळायची, 
बुढ्ढीके बाल, गाठीशेवेची तोंडलावणी व्हायची
विमानातला फोटो काढणं चमत्कारिक होतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || १२ ||

गावाबाहेरच जग हिरवागार असायचं
सगळ्या नद्यांचे पाणी स्वच्छच असायचं, 
पावसाळ्यात ढगांनी आकाश भरायचं,
प्रदूषण, पर्यावरण वगैरे माहितीच नव्हतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || १३ ||

हुतुतू आट्यापाट्याचा खेळ गल्लीत चालायचा
क्रिकेटच्या मॅचेस चाळीत व्हायच्या,
बापू नाडकर्णी, चंदू बोर्डेच्या गोष्टी रंगायच्या
डे-नाईट, ट्वेंटी- २० चं नावही नव्हतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || १४ ||

प्रवास झालाच तर एस.टी.नेच व्हायचा
गचके, ठेचकाळणे याला अंत नसायचा,
हॅन्डल सोबत फिरकीचा तांब्याही लागायचा
लक्झरी, फर्स्टक्लास एसीचं नावही नव्हतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || १५ ||

दिवाळी खऱ्या अर्थाने दिवाळी होती
चमनचिडी, पानपट्टी, भुईनळ्या यांची रात्र होती,
रंगीत तेल, उटणे, मोती साबणाची ऐश होती
लाडू, चकल्या, करंज्या यांचे दर्शन वार्षिकच होतं..
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || १६ ||

जुनाट रेडिओतून आकाशवाणी बरसायची
बिनाका गीतामालेने बुधवारची रात्र सजायची,
रेडीओ सिलोनने तारुण्याची लज्जत वाढायची
ताई, नाना हरबा यांच्या इतकाच बालोद्यान असायचा,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || १७ ||

खाण्याच्या बाबतीत भेदभाव केला जायचा
दादाच्या ताटात जास्त शिरा पडायचा,
पानात टाकणाऱ्याच्या पाठीत रट्टा बसायचा
हॉटेलात जाणं तर पूर्ण निषिद्ध होतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || १८ ||

मामाच्या गावाला कधी जाणं-येण होतं
धिंगामस्ती करायला नैशनल परमिट होतं,
विहिरीत पोहायला तिथेच मिळत होतं
भाऊबिजेला आईच्या ताटात फारस पडत नव्हतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || १९ ||

घरातले पुरुष कर्तेसवरते असायचे
बायांना दुपारी झोपणे माहिती नसायचे,
पोराबाळांना गोडधोड सणावारीच मिळायचं
प्रायव्हसीला तिथे काडीचंही स्थान नव्हतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || २० ||

पाव्हणे रावळे इत्यादींचा घरात राबता असायचा
सख्खा, चुलत, मावस असा भेदभाव नसायचा,
गाववाल्यानाही पंक्तीत सन्मान असायचा
पंक्तीत श्लोक म्हणणं मात्र सक्तीचं होतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || २१ ||  

आज घराऐवजी लक्झुरीयस फ्लॅट आहे
मोपेड, स्कूटर, मोटारींचा सुळसुळाट आहे, 
टीव्हीवर शंभर वाहिन्यांचा दणदणाट आहे
फास्टफूड, पार्ट्या, ड्रिंक्स याना सन्मान आहे,
*कौटुंबिक सुसंवादाची मात्र वानवा आहे* || २२ ||

आज मुलांसाठी महागडी शाळा-कॉलेजेस आहेत
दूध, बूस्ट, काॅम्प्लानचा भरपूर मारा आहे,
क्लास, गाईड, सेलफोन,काॅम्प्युटरची ऐशच ऐश आहे
कपडे, युनिफॅर्म क्रीडासाहित्य हवे तितके आहे,
*बालकांच्या नशिबी मात्र पाळणाघर आहे* || २३ ||

आज पतीला ऑफिसात मरेस्तोवर काम आहे
सुशिक्षित पत्नीला करियरचा हव्यास आहे,
एक्स्ट्रा अॅक्टीव्हीटीजना घरात सन्मान आहे
छंद, संस्कार यांच्यासाठी क्लासेस उपलब्ध आहेत,
*आजीआजोबांना वृद्धाश्रमाचा रस्ता मोकळा आहे*||२४||

आज घरात प्रचंड आर्थिक सुबत्ता आहे
मागेल ती वस्तू क्षणात हजर आहे,
इन्स्टालमेंट, क्रेडीट कार्डचा सुळसुळाट आहे
सध्या बाय वन गेट वन फ्रीचा जमाना आहे..
म्हणूनच
*पैशांवर समाधान फ्री मिळण्याची मी वाट पहात आहे..*||२५||

     *🌹🌹🌹🌹🌹🌹🌹* ✌️

*चिरे खण*

 मालवणी भाषेतले दर्द आणि मुलखाच्या गरीबीची कथा सांगणारी ,लाल मातीतली कविता.मुंबईतल्या गिरणी संपात उद्ध्वस्त झालेला तरुण गावात येतो. गरीबीत संसार करतानां एका सोन्याच्या कुडी साठी हट्ट करणार्‍या आपल्या लाडक्या बायकोची कशीकाय समजुत घालतो त्याची ही खरीखुरी कथा.


*चिरे खण*

वायच जरा निवांत र्‍हव
फटा फटा बोलतंस काय
रडा नको ,रडा नको
शानी माजी बा य !

अगो,असा हमसान हमसांन
नको रडा!
तुज्या परास काय मोठा आसां
सोन्याचा कुडा ?

कनकवलेच्या चौकात आता
नईन दुकान ईलाहा
काय बगशीत,एकेक कुडी
कसली कसली फुलां !

हाल्लीच चिरेखनीर लागलय ना गो
मालकान पैलो पगार दिल्यान.
घराक येवच्या आधीच
वाणयान सगळो काढुन न्हेल्यान !

माजो पगार मोजुक सोपो
तीस दिवसाक धा नोटे !
तेच्यातच वाणी,औषध पाणी
लायट, घरभाडा...
किती किती फाटे !

तरी हाल्ली बरां आसां
बाजारात बांगडे तरी येतंत.
धा रुपयात कधी दोन तर..
कधी चार चार देतंत !

तू बाकी सुगरण हां..
हाताकच तुज्या चव !
तुज्या हातच्या कालवणा पुढे
मेजवानी सुद्धा बेचव !

म्हणान हल्ली हाॅटेलची
पायरी चढत नाय
कसली कळकट भजी त्येंची
कसलो मळकट चाय !

अगो काय सांगा,हाल्ली 
दुपारची लयच भूक लागता
रुपयाच्या शेंगदाण्यात काय
दुपार सगळी भागता ?
म्हणान हल्ली दुपारचो
घराक जेवक् येतय .
वगीच झिजात चप्पल म्हणान् 
हातांत काढून घेतंय...!

तुज्या हांतचा पाणी सुद्धा
थंड किती सांग..!
वायच् भातावरचो निवळ चलात
थोडो पेल्यातसुन आण .

अगो काय सांगा
हाली चिरे खणीर,गरम किती होता?
तरी बरां, माकां आज मिळाला तां काप..
थोडा नरम तरी होता !
रोजच्या परास,चार दगड
अधीक काढुक होये..
सोताचा घर बांधाचा आसां
तर थोडे हाल काडुक होये !

सोताचा घर म्हटल्यार..
हसतंस काय..झुळुझुळु ?
मांका सांग, मंगळवारी..
बाजाराक जांवया काय गो 
किती दिवस तुज्या साठी..
गजरोच आणलंय नाय गो ! .

©शशीकांत तिरोडकर.

शृंगार मराठीचा

 मराठी भाषेतील स्वल्पविराम, अनुस्वार आदिंचा वापर करुन लिहिलेली कविता नेटवर सापडली.

 कुणी लिहिली हे कदाचित विकी'पीडी'या लाच ठाऊक असेल. 

वाचाच, मस्त आहे..!

🌹

*शृंगार मराठीचा*                  
 
_*अनुस्वारी*_ शुभकुंकुम ते 
भाळी सौदामिनी |              

_*प्रश्नचिन्ही*_ डुलती झुमके 
सुंदर तव कानी |             

नाकावरती _*स्वल्पविरामी*_
शोभे तव नथनी |              

_*काना*_-काना गुंफुनी माला 
खुलवी तुज मानिनी |       

_*वेलांटी*_चा पदर शोभे
तुझीया माथ्याला |                 

_*मात्रां*_चा मग सूवर्णचाफा
वेणीवर माळला |          
    
_*उद्गारा*_चा तो गे छल्ला
लटके कमरेला |                   

_*अवतरणां*_च्या बटा 
मनोहर भावती चेहर्‍याला |     
      
_*उ*_काराचे पैंजण झुमझुम
पदकमलांच्यावरी |         

_*पूर्णविरामी*_ तिलोत्तम तो 
शोभे गालावरी ॥

*अनामिका*

मराठी भाषेचा श्रृंगार

 मनातलं सांगायला

तू ये माझ्याकडे ,
मला आहे वेळ 
तुझं सारं काही ऐकायला.

काही नवीन केलंस..?
दाखव ना मला:,
मला आहे वेळ 
तुला शाबासकी द्यायला.

जायचंय कुठे तुला..?
सांग ना मला,
मी येईन तू म्हणशील तिथे
तुला सोबत करायला.

एकटं वाटतंय खूप..?
बोल ना माझ्याशी,
मला आहे वेळ 
भरपूर गप्पा मारायला.

कधीही, केव्हाही 
साद घाल मला,
मी आहे तयार 
सदैव प्रतिसाद द्यायला.

बोलून टाक मनातलं,
व्यक्त कर सगळं,
एकटं नको समजू स्वतःला,
मी आहे ना साथ द्यायला.

तुझं नि माझं नातं काय..?
याचा विचार नको करू.
मनाचं नातं आहे मनाशी,
नाव माझं मैत्री..!

🌹
**********************************************************

 जिंकायचे जगाला इतकाच ध्यास होता,
वाटेत जीवनाच्या,खडतर प्रवास होता!

करतोस का उगा रे, तू काळजी कुणाची,
इतुका सवाल माझ्या, हळव्या मनास होता!

पोटात भूक तेव्हा, दाटून यायची पण,
दुरडीत भाकरीचा, नुसता सुवास होता!

कुठलेच दुःख नाही, नाही व्यथा कशाची, 
मग चेहरा तुझा का, इतका उदास होता!

शोधात मी सुखाच्या, आजन्म चालल्यावर,
नंतर कळून आले, चुकला प्रवास होता!

का द्यायचे अताही, निवडून सांग त्यांना,
कोऱ्याच कागदावर, ज्यांचा विकास होता!

नारी सशक्त आहे,सांगायचे जगाला,
पण आत उंबऱ्याच्या, दररोज त्रास होता!

वाटेत भेटल्यावर, ती हासली जराशी,
मग काल मारलेला, टोला कुणास होता!

बांधून ठेवणारा..... एकत्र माणसांना,
तो उंबरा शहाणा, माझ्या घरास होता!

🍂🍃धनाजी जाधव🍃🍂

बेताल वागतो मी, म्हणतात लोक सारे

मजलाच काय देवा , केलीस बंद दारे?

केला गुन्हा कशाचा ,गेलो न वाम मार्गी
माझ्याच पावलांना, का लाभती निखारे?

गरजू गरीब ज्यांना ,जाऊन धीर देतो
तळमळ बघून माझी ,रडतात का बिचारे?

माणूस धर्म माझा, माणूसकीच पाया
हळव्या मनास माझ्या, फुटतात हे धुमारे

छळतात कैक मजला, पर्वा मुळीच नाही
सरतील एकदाचे, रोगिष्ट सर्व वारे

निर्धार या मनाने केला विचार करुनी
प्रेमे "अनंत" सकला, फुलवीन मी फुलारे


अनंत केशव देवघरकर. 
अलिबाग.
९४२०६४५७२८.
==============================================
महा पंचाक्षरी*
*द्रौपदीची थाळी*

थंडीत भाज्या
मिळती ताज्या
खाव्यात रोज
म्हणती आज्या.... १

दिल्ली मटार
हिरवागार
करंज्या करा
चटकदार.... २

वांग भरीत
झणझणीत
घाला फोडणी
चरचरीत.... ३

खीर , हलवा
घालून खवा
काजू पिस्त्याने
मस्त सजवा.... ४

सार नी कढी
सांबर वडी
उंधियोमधे
वालपापडी.... ५

वरण भात
लिंबाची साथ
तुप हवेच
सढळ हात... ६

सलाड ,फळ
कधी उसळ
कधी झटका
शेव मिसळ... ७

मेथी लसूणी
डाळ घालूनी
पालक, चुका
ही बहुगुणी... ८

शिळी वा ताजी
अळूची भाजी
मसालेभात
मारतो बाजी... ९

चिंचेचे सार
सूप प्रकार
सोलकढीही
पाचक फार... १०

गाजर, मुळे
हादगा फुले
शेवगा शेंगा
खा कंदमुळे... ११

शेपू दोडका
घेवडा मका
या नाक मुळी
मुरडू नका.... १२

कडू कारले
करा आपले
आरोग्यासाठी
आहे चांगले... १३

माठ, चवळी
खावी टाकळी
केळफुल नी
घोळू,तांदळी.... १४

मुग कढण
भेंडी,सुरण
चिंच खोबरे
लावा वाटण.... १५

सुरळी वड्या
शुभ्र पापड्या
पापडा साथ
देती बापड्या... १६

बीट काकड्या
करा पचड्या
वाटली डाळ
कोबीच्या वड्या... १७

पोळी आमटी
लोणी दामटी
खर्ड्याची वर
थोडी चिमटी... १८

चटकदार
मसालेदार
जेवण कसे
खुमासदार... १९

कांदा,बटाटा
आलं टमाटा
व्यंजनी मोठा
असतो वाटा.... २०

मिर्ची लसूण
घाला वाटून
खा बिनधास्त
पण जपून.... २१

कढीपत्त्याची
नी पुदिन्याची
चटणी खावी
शेंगदाण्याची.... २२

चणा, वाटाणा
बेताने हाणा
गुळासवे खा
दाणा,फुटाणा.... २३

पॅटिस, वडे
भारी आवडे
कांद्याची भजी
फक्कड गडे... २४

तुप भिजली
स्वाद भरली
पुरणपोळी
पक्वान्नातली.... २५


लोणचे फोड
जिला न तोड
सुग्रास घासा
शोभेशी जोड... २६

भाजी नी पाव
कधी पुलाव
भाज्या घालून
खा चारीठाव.... २७


कधी मखाणे
पनीर खाणे
मश्रूम पण
योग्य प्रमाणे.... २८

मनमुराद
घ्यावा आस्वाद
मठ्ठा जिलबी
केशर स्वाद... २९

श्रीखंड पुरी
जाम जरुरी
बासुंदी विना
थाळी अपुरी... ३०

मांडी ठोकून
बसा वाकून
जेवणे शांत
मौन राखून...३१

देवाचा वास
वेळेला घास
समजावे ही
सुखाची रास.... ३२

बसे पंगत
येई रंगत
लज्जत 
खाशी संगत.... ३३

थंडीत मस्त
रहावे स्वस्थ
हे खवैय्यांनो 
तुम्ही समस्त.... ३४

नियम स्वस्त
व्यायाम सक्त
वर्ज आळस
राहणे व्यस्त.... ३५

थोडे जेवण
थोडे लवण
तब्बेतीसाठी
हवे स्मरण.. ३६

भागते भूक
हेच ते सुख
खाताना रहा
हसत मुख.... ३७


बांधावा चंग
व्यायामा संग
सांभाळा सारे
खाण्याचे ढंग.....३८

साहित्य कृती
ह्या पाककृती
जपूया सारे
खाद्य संस्कृती...३९

गृहिणी भाळी
तिन्ही त्रिकाळी
अन्नपूर्णेची
द्रौपदी थाळी... ४०

मुखी सकळ
मिळो कवळ
हिच प्रार्थना
हरिजवळ.... ४१

©प्रज्ञा नरेंद्र करंदीकर
बंगलोर

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...