निवृत्त मी झालो,पण निवांत ती झाली*
सकाळच्या पहिल्या चहाची
जबाबदारी माझ्यावर आली
दूध ऊतू जाऊ न देण्याची
काळजी माझ्या शिरी आली
निवृत्त मी झालो,
निवांत ती झाली ।
आजचा नाष्टा ठरवायची
आणि, करायची पाळी माझ्यावर आली
कांदा चिरताना आसवे गाळायची
वेळ आता माझ्यावर आली,
निवृत्त मी झालो,
निवांत ती झाली ।
कुकरच्या शिट्यां मोजण्याची
आता मला सवय झाली
तव्यावरची गरम पोळीही
आताशा चटके देईना झाली
निवृत्त मी झालो,
निवांत ती झाली ।
दुधाचा खाडा,पेपरचा खाडा
फोन बिल,लाईट बिल
हिशोब ठेवताना माझी
त्रेधातिरपीट झाली
निवृत्त मी झालो,
निवांत ती झाली ।
घड्याळाच्या काट्याबरोबर
फिरण्यातून,ती मुक्त झाली
लवकर उठण्याची सवय
आता,तीने सोडून दिली
निवृत्त मी झालो
निवांत ती झाली ।
माझ्यासाठी धावणारी ती
आता जरा थकू लागली
थकलेल्या तिच्या पावलांची
आता मला चाहूल लागली
निवृत्त मी झालो
निवांत ती झाली ।
*~~~~~
~~~~~*
~~~~~*#################################################
*एक ओळ हिंदी आणि दुसरी मराठी असा प्रयोग मराठी गजलेत करणाऱ्या शायराला माझा दंडवत
*
*ऐ सनम आँखों को मेरी
खूबसुरत साज दे
येऊनी स्वप्नात माझ्या
एकदा आवाज दे...
आहटों से दिल की
बेचैनी मेरे बढ़ने लगी
ऐक आभासा मला
थोडा तरी अंदाज दे
ऐ खुदा मैं चाहता हूँ
हर कोई चाहे मुझे
गंध दे मजला फुलांचा,
हासणे निर्व्याज दे
लज्ज़त-ए-ग़म के सिवा
तूने मुझे सबकुछ दिया
वेदनांनी बहरलेली एक
सुंदर सांज दे...
उम्र अब ढलने लगी है,
कर लूँ कुछ बहरे-ए-खुदा
टाळ चिपळ्या दे इलाही,
आणखी पखवाज दे...
*-- इलाही जमादार.*
No comments:
Post a Comment