हिंदुओं #जानो #अपने #धर्म और #संस्कृति के #बारे #मे
Pages
- Home
- प्रबोधन
- आपला भारत
- महत्वाच्या लिंक / वेबसाईट
- कायद्याची ओळख
- शैक्षणिक /करिअर मार्गदर्शन
- महिला वर्ग / ज्येष्ठ नागरिक विशेष
- महापुरुषांची ओळख
- शासन निर्णय /शासकीय योजना
- विविध संस्था माहिती
- ताज्या बातम्या व घडामोडी
- सोशल मिडिया
- ई -साहित्य -अंगण : PDF पुस्तके व अन्य माहिती
- जनरल नॉलेज
- फोटो गॅलरी
- अध्यात्मिक
- आयुर्वेद / आरोग्य विशेष
- संगीत विभाग
- अनमोल सुविचार
- खाद्य भ्रमंती
- बोधकथा
- कोरोना विशेष
- प्रेरणादायी
Friday, July 1, 2022
हिंदु संस्कृती
तिरुपती_बालाजी यांना गोविंदा म्हणून का म्हटले जाते ?
एक विस्मयकारक आणि अतिशय मनोरंजक गोष्ट आहे ....
गुरूनामाचा महिमा
महाराजांच नाम घेताना सहज सुचल ते मांडण्याचा प्रयत्न केलाय.
का वाचावी ज्ञानेश्वरी ?
ज्ञानेश्वरी वाचण्याचा उपयोग काय? रत्नागिरीच्या एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर असलेले श्रीयुत शाम चिकणे लिहितात “माझ्या मुलीला बोन मॅरो ट्रांस्प्लांटसाठी पुण्याच्या एका इस्पितळात चार महिने ठेवण्याची आमच्यावर वेळ आली. बोन मॅरो साठी मीच 'डोनर' होतो. मोठाच कठीण काळ. सहनशीलतेची परीक्षा घेणारा. हॉस्पिटल मध्ये कष्ट करत असताना आणि आतून चिंतांनी ग्रासलेला असूनही चेहरा सतत हसरा ठेवायची कसरत करायची होती. फ़क्त आणि फ़क्त ज्ञानेश्वरीच्या तत्त्वज्ञानाने या परीक्षेतून मला निभावून नेलं. वाचताना खूप सोपं साधं वाटतं सगळं. पण आयुष्यात जेव्हा असा कठीण काळ येतो तेव्हा शक्ती, ऊर्जा देणारं हे तत्त्वज्ञान आहे.” आयुष्य म्हणजे सरळ रेषा नव्हे. ECG वर सरळ रेषा उमटली की आयुष्य संपलं असं डॉक्टर म्हणतात. ज्याच्या आयुष्यात चढ उतार आले नाहीत तो तसाही जगला म्हणताच येत नाही. या कठीण काळाला 'लिमिट' ही नसतं. सिनेमाच्या अडीच तासा सारखं याला टाईम लिमिट नाही. आणि शेवटी हिरो जिंकणारच याची खात्रीही नाही. किंबहुना जिंकणं आणि हरणं असं काही नसतंच. असतं फ़क्त लढणं. अर्जुनासारखं. कधी शत्रूशी. कधी आप्तांशी. कधी स्वतःशी सुद्धा. म्हणून ज्ञानेश्वरी वाचावी.
पंढरीची युग संख्या
युग म्हणजे दीर्घकाळ, युग म्हणजे कृत, त्रेता, द्वापर आणि कली.युगाच्या प्रारंभीच्या संध्याकाळाला व अंतिम काळाला अंश (भाग, खंड) म्हणतात. या दोन्हींसह चार युगांचे चक्र पूर्ण होण्यास देवांक १२००० वर्षे लागतात. देवांच्या वर्षाप्रमाणे कृत (सत्य) ४८०० वर्षे, त्रेता ३६०० वर्षे, द्वापर २४०० वा
५६ भोग म्हणजे काय?
श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून अर्पण केल्या जाणा-या ५६ भोगाची माहिती.
देवाला ५६ प्रकारचे पक्वान्न वाढले जातात. त्यालाच छप्पन भोग असं म्हणतात. हे पक्वान्न रसगुल्ल्यापासून सुरू होतात त्यात दही, भात, पुरी, पापड असं सगळं असून ही सामग्री वेलचीवर संपते. अष्टोप्रहार भोजन करणा-या बालकृष्णाला अर्पण केल्या जाणा-या या ५६ भोगाच्या छान कथा आहेत.
दिवसाचे आठ प्रहर असतात. असं म्हटलं जातं की यशोदा बालकृष्णाला दिवसभरात आठ वेळ जेवायला वाढायची. इंद्राच्या प्रकोपामुळे लोकांना वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला होता तेव्हा जवळपास ७ दिवस अन्न आणि पाणी ग्रहण केलं नव्हतं. आठव्या दिवशी कृष्णाने इंद्राचा प्रकोप कमी झालेला पाहिला, पाऊस थांबला तेव्हा त्याने गाववाल्यांना घरी जायला सांगितलं.
मात्र कृष्णाने सात दिवस काहीच खाल्लेलं नाही याचं तिथल्या गावकऱ्यांना, यशोदेला अतिशय दु:ख झालं. म्हणूनच कृष्णाप्रती आपली भक्ती म्हणून गावकरी आणि यशोदेने ७ दिवस आणि ८ प्रहर (वेळा) असे ७ ७ ८ = ५६ इतके पदार्थ करून कृष्णासमोर ठेवले. श्रीमद् भगवदनुसार गोपिकांनी श्रीकृष्णासारखा पती मिळावा म्हणून एक महिना यमुना नदीत स्नान केलं आणि कालीमातेची प्रार्थनाही केली.
कृष्णानेही त्यांना तशीच संमती दिली. त्यांच्या व्रताची समाप्ती झाल्यावर गोपिकांनी आनंदाने कृष्णासाठी छप्पन भोग दिले. हे छप्पन भोग म्हणजे त्याच्या ५६ मैत्रिणी होत्या. असंही म्हटलं जातं की त्या काळात कृष्ण राधासंगे एक मोठया कमळावर बसायचे. त्या कमळाला तीन भाग होते.
एका भागात आठ, दुस-या भागात सोळा आणि तिस-या भागात बत्तीस पाकळ्या होत्या. प्रत्येक पाकळीवर एक प्रमुख सखी आणि मध्यभागी श्रीकृष्ण स्वत: विराजमान होत असत. याप्रमाणे पूर्ण पाकळ्यांची संख्या छप्पन होत असे. असाच याचा अर्थ सांगितला जातो. हे छप्पन भोग पुढीलप्रमाणे आहेत.:-
» भक्त (भात),
» सूप (डाळ),
» प्रलेह (चटणी),
» सदिका (कढी),
» दधिशाकजा (दही-ताकाची कढी),
» सिखरिणी (शिखरण),
» अवलेह (सरबत),
» बालका (बाटी),
» इक्षू खेरिणी (मुरंबा),
» त्रिकोण (शर्करायुक्त),
» बटक (वडा),
» मधू शीर्षक (मठरी),
» फेणिका (फेणी),
» परिष्ट (पुरी),
» शतपत्र (खजला),
» सधिद्रक (घेवर),
» चक्राम (मालपुआ),
» चिल्डिका (चोला),
» सुधाकुंडलिका (जिलेबी),
» धृतपूर (मेसू),
» वायुपूर (रसगुल्ला),
» चन्द्रकला (पगी हुई),
» दधि (महारायता),
» स्थूली (थुली),
» कर्पूरनाडी (लौंगपुरी- लवंगलतिका),
» खंड मंडल (खुरमा),
» गोधूम (दलिया),
» परिखा,
» सुफलाढया (सौंफयुक्त),
» दधिरूप (बिलसारू),
» मोदक (लड्ड),
» शाक (साग),
» सौधान (अधानौ अचार),
» मंडका (मोठ),
» पायस (खीर)
» दधि (दही),
» गोघृत,
» हैयंगपीनम (मक्खन),
» मंडुरी (मलाई),
» कूपिका (रबडी),
» पर्पट (पापड),
» शक्तिका (सीरा),
» लसिका (लस्सी),
» सुवत,
» संघाय (मोहन),
» सुफला (सुपारी),
» सीता (वेलची),
» फल,
» तांबूल,
» मोहन भोग,
» लवण,(मीठ)
» कषाय,
» मधुर,
» तिक्त,
» कटू,
» अम्ल
चार युगांचे अनंत फेरे सुरुच राहणार. प्रत्येक युगातील सृष्टीच्या उत्पत्ती.. स्थिती आणि लय याचे स्वामी म्हणजे ब्रह्मदेव.. विष्णू आणि महेश. जे या विश्वाला आधार देण्यासाठी श्रीदत्त स्वरुपात प्रकटलेत.
राग.. लोभ.. मोह.. व्देष.. मत्सर हे सर्वांना जन्मतःच सोबत येतात, मग कुणी कितीही श्रेष्ठ असो. अगदी जगताची धूरा सांभाळणाऱ्यां ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांच्या पत्नींचीही यातून सुटका नव्हती. पण जेव्हा अहंकाराचा अतिरेक झाला तेव्हा मात्र सत्वगुण रक्षणासाठी श्री दत्तात्रेयांना प्रकट व्हावेच लागले. या जीवनात या तिन्ही गुणाचे तारतम्य रहावे.. त्यामुळे जीवन आनंदी व्हावे हा उपदेश देण्यासाठी श्रीदत्त गुरु प्रकटले.
जेव्हा प्रत्यक्ष ब्रम्हा, विष्णू, महेश हे बालरुपात अत्री ऋषींच्या आश्रमात रांगत होते, तिघांनाही अनसूया माता घास भरवत होती, तेव्हाचे हे दृश्य आजही सुखावते. ते आश्रमातील दृश्य बघून आजही सारे हर्षभरीत होतात.
श्री दत्तगुरुंचे कोणत्याही फोटोतील सुंदर रुप बघताच अंतरंगात भक्तीभाव उचंबळतो. सोबतचे ते चारही श्वान जे वेदांचे प्रतीक आहेत, ते सुद्धा कृतज्ञतेने नतमस्तक झाले आहेत. तर जगन्माता गाय ही त्यांना कौतुकाने बघतेय.
जेव्हा दत्तगुरुंची शुंभकर पाऊले या घराला लागतात तेव्हा घराचे मंदिर होते. आनंदाला पारावर नसतो. हे हृदयपाखरु स्वानंदात घरभर फिरते. हे देवा ही सारी तुमचीच किमया आहे. सभोवती तुम्हीच विहारासाठी आनंद तरंग निर्माण केलेत.
आज हे खेबूडकर यांचे भक्तीगीत अत्यंत लोकप्रिय आहे. पण चित्रपटातील प्रसंगाची गरज म्हणून ते त्यांनी लिहलेय. जगात सारेच पापभिरु. पोटासाठी कधीकधी मार्ग बदलला तरीही पुन्हा मनात मूळ सदप्रवृत्ती कायमच असते. याच सद्सद्विवेक बुद्धीने चित्रपट कथेतील चोर ज्या घरात नाव न सांगता राहतात.. त्या घरात त्यांना प्रेम आपुलकी लाभते. चांगल्या घरचे अन्न खाल्ल्याने त्या चोरांचे मनपरीवर्तन होते. ते चोर त्या घरातील समस्या सोडवून आनंद निर्माण करतात.
तेव्हा त्या चोरांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे हे गाणे जे आज भक्तीगीत ठरलेय. श्रीदत्त गुरुंनी ठरवले तर काय अशक्य आहे, जीवनात आमुलाग्र परिवर्तन घडते.. जीवन मनःशांतीने आनंदी होते, हेच इथे सांगायचे होते. ही होती खेबूडकर लेखणीची कमाल.
🌹🌼🔱🌺🛕🌺🔱🌼🌹
१. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...
-
प्रत्येक प्रवासाची सुरुवात आणि शेवट ठरलेला असतो, तसंच त्या प्रवासातले टप्पे किंवा थांबेही ठरलेले असतात. काही वेळा ते अगदी हक्काचे असतात, तर ...
-
*आता पर्यंत आपण धारा 370 बद्दल माहिती घेत होतो चला आता कलम 340 बद्दल माहिती जाणून घेऊ* —— कलम ३४० —— (ओ.बी.सी. च्या सत्यानाशाचे का...
-
☕ माझ्या हातात चहाचा कप होता, ऊभ्यानं चहा पित होतो. अचानक तोल गेला, कप सांभाळत पडल्यामुळे, हाताच्या कोपराला लागले. कपही फुटला. जर मी कप सोड...