महाराजांच नाम घेताना सहज सुचल ते मांडण्याचा प्रयत्न केलाय.
गुरूनामाचा महिमा अलौकिक अाहे. गुरूनामाने जड जीवांचा उध्दार होतो.
याच गुरूनामातील प्रत्येक अक्षरातून बोध घेतला अाणि त्याचा अंगीकार केला तर असीम अानंदात हसत हसत हा भवसागर तरणे सहज शक्य होईल.
अ— अहंकाराचा त्याग करा.
नं— नंतर करू न म्हणता वेळेत काम करा.
त— तरतमभाव जागृत ठेवा.
को—कोणाचीही निंदा नालस्ती नको.
टि— टिका टिप्पणी करणे वर्ज करा.
ब्र— ब्रम्हचैतन्याचा वास सर्वांत अाहे ही जाणीव ठेवून वर्तन करा.
म्हां — म्हातारपणी मिळतेजूळते घेऊन रहा.
ड— डगमगून न जाता संकटांचा सामना करा.
ना— नाम जपो वाचा नित्य, श्वासातही नाम अशी स्थिती व्हावी.
य— यत्किंचितही लोभ धरू नको.
क— कर्तृत्वावर विश्वास ठेव. कष्ट कर.
गु—गुरूवर निरंतर श्रध्दा असावी.
रू— रूपापेक्षा गुणांना महत्त्व द्या.
ग— गर्व नको. गरजूंना मदत करा.
जा — जात पात धर्म पंथ विसरून माणूसकी जपा.
न— नसेल त्याचे दूःख करण्यापेक्षा असेल त्यात समाधानी रहा.
न— नम्रता अंगी बाणा.
म — मन प्रेमळ,निर्मळ असू द्या.
मनातील वाईट विचारांवर अंकुश घाला.
हा— हाव लालसा दूर सारा.
रा— रात्रंदिन गुरूअाज्ञेचे पालन करा.
ज— जनमानसात अापली प्रतीमा स्वच्छ ठेवा.
न — नजरेत सर्वांप्रती दया,कणव असावी.
मो— मोहमायेला भूलू नका.
स्तु — स्तुती व्हावी म्हणून कर्म करू नये. स्तुतीने हुरळूनही जाऊ नये.
ते — तेजोमय जीवन बनवा.
जय गजानन🌹🙏
No comments:
Post a Comment