Friday, July 1, 2022

  चार युगांचे अनंत फेरे सुरुच राहणार. प्रत्येक युगातील सृष्टीच्या उत्पत्ती.. स्थिती आणि लय याचे स्वामी म्हणजे ब्रह्मदेव.. विष्णू आणि महेश. जे या विश्वाला आधार देण्यासाठी श्रीदत्त स्वरुपात प्रकटलेत.

       राग.. लोभ.. मोह.. व्देष.. मत्सर हे सर्वांना जन्मतःच सोबत येतात, मग कुणी कितीही श्रेष्ठ असो. अगदी जगताची धूरा सांभाळणाऱ्यां ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांच्या पत्नींचीही यातून सुटका नव्हती. पण जेव्हा अहंकाराचा अतिरेक झाला तेव्हा मात्र सत्वगुण रक्षणासाठी श्री दत्तात्रेयांना प्रकट व्हावेच लागले. या जीवनात या तिन्ही गुणाचे तारतम्य रहावे.. त्यामुळे जीवन आनंदी व्हावे हा उपदेश देण्यासाठी श्रीदत्त गुरु प्रकटले.

        जेव्हा प्रत्यक्ष ब्रम्हा, विष्णू, महेश हे बालरुपात अत्री ऋषींच्या आश्रमात रांगत होते, तिघांनाही अनसूया माता घास भरवत होती, तेव्हाचे हे दृश्य आजही सुखावते. ते आश्रमातील दृश्य बघून आजही सारे हर्षभरीत होतात.

         श्री दत्तगुरुंचे कोणत्याही फोटोतील सुंदर रुप बघताच अंतरंगात भक्तीभाव उचंबळतो. सोबतचे ते चारही श्वान जे वेदांचे प्रतीक आहेत, ते सुद्धा कृतज्ञतेने नतमस्तक झाले आहेत. तर जगन्माता गाय ही त्यांना कौतुकाने बघतेय. 

        जेव्हा दत्तगुरुंची शुंभकर पाऊले या घराला लागतात तेव्हा घराचे मंदिर होते. आनंदाला पारावर नसतो. हे हृदयपाखरु स्वानंदात घरभर फिरते. हे देवा ही सारी तुमचीच किमया आहे. सभोवती तुम्हीच विहारासाठी आनंद तरंग निर्माण केलेत.

        आज हे खेबूडकर यांचे भक्तीगीत अत्यंत लोकप्रिय आहे. पण चित्रपटातील प्रसंगाची गरज म्हणून ते त्यांनी लिहलेय. जगात सारेच पापभिरु. पोटासाठी कधीकधी मार्ग बदलला तरीही पुन्हा मनात मूळ सदप्रवृत्ती कायमच असते. याच सद्सद्विवेक बुद्धीने चित्रपट कथेतील चोर ज्या घरात नाव न सांगता राहतात.. त्या घरात त्यांना प्रेम आपुलकी लाभते. चांगल्या घरचे अन्न खाल्ल्याने त्या चोरांचे मनपरीवर्तन होते. ते चोर त्या घरातील समस्या सोडवून आनंद निर्माण करतात. 

        तेव्हा त्या चोरांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे हे गाणे जे आज भक्तीगीत ठरलेय. श्रीदत्त गुरुंनी ठरवले तर काय अशक्य आहे, जीवनात आमुलाग्र परिवर्तन घडते.. जीवन मनःशांतीने आनंदी होते, हेच इथे सांगायचे होते. ही होती खेबूडकर लेखणीची कमाल.


🌹🌼🔱🌺🛕🌺🔱🌼🌹

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...