Wednesday, February 8, 2023

🌹प्रतिपूर्ती उपकाराची जाणीव ठेवा...!!! 🌺🙏


*☘️प्रतिपूर्ती हा शब्द फारसा परिचित नाही.. पण कुठलं ही नाते टिकवायचे असेल, तर प्रतिपूर्ती किवा reciprocation आवश्यकच आहे...!!!*

*☘️मी त्याच्यासाठी इतकं केलं, त्याने माझ्यासाठी काय केल?' ही अशी वाक्यं आपण नेहमीच ऐकतो.... प्रतिपूर्ती किंवा reciprocation चा अभाव हेच त्याचे खरे कारण...!!!*

*☘️समाजात राहातांना, नाते संबंध जपतांना, एकमेकांसाठी काहीना काही, करावे लागते. त्या शिवाय नाती टिकूच शकत नाहीत... हे काहीतरी करणे म्हणजेच प्रतिपूर्ती .. अर्थात याचा अर्थ दर वेळेला कुठले तरी काम करणे असे नसून , त्या व्यक्तीशी चांगलं वागणं, बोलणं , शब्दातून धीर देणं अश्या स्वरुपात ही असू शकतं ...!!!*

*☘️माणूस जसा जसा प्रगती करु लागला तस तसा त्याच्यातील "मी" पणा वाढायला लागला.. आपल्या माणसाचा वापर करुन घेणे सुद्धा त्याला कळले... समाजात धूर्त , कपटी माणसे आहेत, तशीच साधी भोळी देव माणसे सुद्धा अजून आहेत. अश्या लोकांचा मग पध्दतशीर पणे नात्यांमधे वापर होवू लागला...!!!*

*☘️गोड गोड बोलून आपली कामे साधण्या पुरता त्या व्यक्तीचा उपयोग केला जाऊ लागला. नाती सांभाळायची, तर जाऊ द्या.. विसरुंन जाऊ . ह्या शब्दांचा पद्धतशीर पणे वापर होऊ लागला...!!!*

*☘️पण कुठेतरी, कधीतरी एक वेळ येतेच. त्या वेळी केलेल्या कामाच्या पोच पावतीची अपेक्षा केली जाते... "जाऊ दे" चा कधीतरी कंटाळा येतो...!!!*

*☘️एकतर्फी नाती टिकवण्याचे अथक प्रयत्न अखेर निष्फळच होतात, आणि एक ना एक दिवस नाती दुभंगतात. म्हणूनच नात्यांमधे प्रतिपूर्तीला महत्व आहेच...!!!*

 *☘️प्रतिपूर्ती ही प्रत्येक वेळी मोठमोठ्या gifts देऊनच होते असे नाही. आपलेपणा, आत्मीयता या गोष्टीची किंमत करताच येत नसते. वृद्ध सासू सासऱ्यांची सेवा करणाऱ्या सुनेला "तू आमच्या साठी खूप करतेस" असे म्हणणे/ तिच्या सेवेची पावती देणे सुद्धा प्रतिपूर्तीच आहे...!!!*

*☘️म्हातारपणात कुठलीही शारिरिक मदत शक्य नसते. पण मुलाला आणि सुनेला, "आम्ही घरी थांबतो... तुम्ही दोघे निश्चिंत मनाने बाहेर जा....." अशा आश्वासक शब्दाने सुद्धा प्रतिपूर्ती होत असते...!!!*

*☘️परदेशात राहणाऱ्या भावाने, भारतात रहाणार्‍या अणि वेळोवेळी आई वडीलांच्या मदतीला धाऊन जाणाऱ्या बहिणीला/भावाला ... तू आहेस म्हणून मला आई बाबांची काळजी नाही हे म्हणणे, म्हणजे एक प्रकारे प्रतिपूर्तीच आहे...!!!*

*☘️सुखात आणि दुःखातही माणसाला आपल्या माणसाची गरज असतेच. नाती टिकवणं ही जरी काळाची गरज असली, तरी, प्रतिपूर्तीचा अभाव असेल, तर नात्यां मधे तणाव निर्माण होतोच...!!!*

*☘️एकतर्फी नाती कधीच टिकू शकत नाहीत. सहानभूती, आणि सांत्वनाचे फक्त दोन शब्दही, दुःखाच्या काळात मनाच्या जखमेवर फुंकर घालुन जखम भरण्याचे काम करतात...!!!*

*☘️ज्याला दुःखाच्या दिवसातील आपल्या माणसांचे महत्त्व कळले... त्याला प्रतिपूर्ती कळली, असेच म्हणावे लागेल...!!!*

*☘️आयुष्य खुप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. सर्वानी आनंदात राहा आपला समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम राहो.....!!!* 

*☘️आपण प्रथम स्वतःची व आपल्या कुटुंबातील परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्या, आपल्यामुळे कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या. तसे त्याप्रमाणे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या. सरकारी नियमांचे व सुचनांचे सर्वानी प्रामाणीकपणे व काटेकोर पालन करा, सरकारला सहकार्य करा. खोट्या राजकारणी अफवापासून दूर व सावध राहा, प्रत्येकाने प्रथम स्वतःचा व परिवाराचा जीव वाचवा...!!!*

*जागृत राहा, सतर्क रहा, सुरक्षित रहा*. 

🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

*🧑‍🍼मुलांच्या मनासाठी पंचसूत्री🧑‍🍼💐🙏

*🌹सध्याच्या परिस्थितीत वातावरणं थोडं तंग आहे,लहान मुलांच्या मनावर ताण आहे, पिंज-यातल्या पक्ष्यांसारखी मनाची कुचंबणा होत आहे अशा परिस्थितीत मुलांच्या मनाचं आरोग्य जपण्यासाठी पंचसूत्री 😇*

*🌹1) सकाळी उठल्यावर पहिल्यांदा मुलांच्या कानावर कोणते आवाज जाताहेत याकडे लक्ष ठेवा, 😇बातम्या,नकारात्मक चर्चा यानं त्यांचा दिवस सुरु होणार नाही याची काळजी घ्या.🤷🏻‍♀️*
*छानसं गुड माॅर्निंग म्युझिक लावा, मंद आवाजात मंत्रपठण लावा.🥰*

*चल शाळा आहे,अभ्यास करायचाय अशा सूचना देऊन उठवणं असंवेदनशीलता आहे आपल्याला जवाबदा-यांचा पाढा वाचत कुणी उठवलं तर आवडेल का ? याचा विचार करा.🤷🏻‍♀️*

*पालकांच्या चेहे-यावर सकाळी पाहिलेलं प्रसन्न हास्य मुलांना All is well ची भावना देतं,🥰 त्यामुळे कितीही गडबडीत असाल तरी एक छानशी smile जरुर द्या.😊*
*अगदी लहान मुलांना निसर्गाची आठवण करुन देत उठवा, उदा. बघ सूर्य उगवला,🌞पक्षी उठले🕊️,चिमणी आली होती तू उठलीस का?🤔बघायला.😊 खिडकीतून बघ सकाळ झाली,या शब्दांनी त्यांना प्रसन्न वाटेल. निसर्गाच्या सान्निध्यानं मन प्रफुल्लित होतं ही सवय मोठेपणी उपयोगी ठरते.🥰*

*🌹2) दिवसभर मुलं घरात आहेत त्यामुळे चुका आणि दोष जास्त दिसत असतील🤷🏻‍♀️,आधी काही तास का होईना शाळेत जाणा-या मुलांना चुका करायला वेगळी जागा मिळायची आता नाही.😇*
*चुका करत शिकणं हा माणसाचा हक्क आहे,घर म्हणजे चुका करायला मिळणारी सेफ जागा!🥰 काही पडलं,सांडलं,तुटलं तर सौम्यता ठेवा,तू काय शिकलीस? / शिकलास? 🤔विचारा आणि विषय संपवा. सतत दडपणानं ताणतणाव वाढून मुलांच्या मनावर परिणाम होतो.🤷🏻‍♀️*

*🌹3) मुलांना उपदेश न करता चांगली उदाहरणं दाखवा,😊गोष्टीतून इनडायरेक्ट बोध द्या, आज्ञा देण्यापेक्षा कधीकधी,बघ करुन..., तुला आवडतंय का पहा..असे सजेशन्स द्या. प्रेशर नसेल तर नविन गोष्ट स्विकारण्याची शक्यता वाढते.😊*

*🌹4)घड्याळयाप्रमाणे चालणारं यंत्र म्हणजे शिस्तबध्द मूल नाही,👶🏻 मुलांना घड्याळाचा धाक दाखवू नका, मोठ्यांना जे जमत नाही ते लहानांना कसं जमेल?😊 वेळेची मुदत द्या उदा. जेवणाआधी अभ्यास कर, संध्याकाळ व्हायच्या आत आवर ...अशा सोप्या भाषेत बोला,तास आणि मिनिटांच्या धमक्यांनी ताण वाढतो.🤓*

*🌹5)जशी सकाळची वेळ तशी रात्री झोपण्यापुर्वीची वेळ जपा,आनंदी हलकंफुलकं वातावरण ठेवा🥰,राग रुसवे फुगवे विसरुन जा,कितीही रागावले तरी शेवटी म्हणजे दिवसाच्या शेवटी पालकांचं आपल्यावर प्रेम आहे ही भावना घेऊनच मुलं झोपली पाहिजेत,🥰 कारण झोपताना जो शेवटचा विचार असतो त्यावर अंतर्मन रात्रभर काम करतं.😇*

*🌹दिवसभरातले आनंदी क्षण आठवत, छानसं वाद्य संगीत ऐकत,सकारात्मक चर्चा,एखादी चांगली गोष्ट,कौतुक ऐकत मुलं झोपली तर सकाळी फ्रेश उठतील.😍*

*🌹सध्या मुलांच्या आरोग्याची काळजी घेताना मनाची काळजी घेणं जास्त महत्वाचं आहे म्हणून शेअर करतेय, रोगप्रतिकारक शक्ती जपण्यासाठी आनंदी मन असणं आवश्यक आहे🥰.*
*आपण पैसे खर्च करतो,हवं ते देण्यासाठी धडपडतो पण त्यासोबत मनाचीही काळजी घेतली तर आणखी सकारात्मक फायदे मिळतील.😇*


🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
: ☘️🍁🌺☘️🍁🌺☘️🍁☘️🌺

*प्रत्येक माणसाच्या आयुष्यात यश,*
*आणि अपयशाचा खेळ चालुच असतो,*
*आणि खेळ हा जिंकायचाच असतो,*
*असे काही नसते.*
*पराजयाची ही इतिहासात नोंद होतच असते.*
*फक्त इतकेच,आपल्या संघर्षात,*
*दम असला पाहिजे.*
*नदीचा उगम छोटा असतो,*
*पण ती पुढे जाऊन जीवदायिनी बनते.*
*चांगल्या कामाची सुरुवात,*
*नेहमी छोटी असते,*
*मात्र सातत्य आणि विश्वासपूर्ण वाटचाल असेल,*
*तर निश्चित ध्येय गाठता येते.*
*माणसाजवळ त्याच्या आयुष्य भराची संपत्ती,*
*म्हणजे त्याचे चांगले विचार.*
*कारण...*
*धन आणि बळ...*
*कोणत्याही माणसाला,*
*वाईट मार्गावर नेऊ शकतात,*
*परंतु चांगले विचार...*
*माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी,*
*प्रेरित करित असतात...!!*

*
🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
*ठेविले अनंते तैसैची रहावे,चित्ती असावे समाधान!* 
सध्याच्या कालखंडात जे काही आजुबाजुला घडतंय त्याला अनुसरून!!!

जेवढं तुमच्याकडे असूनही *तुम्ही दुःखी आहात* तेवढं कुणाकडे नसूनही *ते सुखी आहेत*. न मिळालेल्या गोष्टींचा विचार करून दुःखी होण्यापेक्षा *जे आपल्याकडे आहे त्यात आनंदाने जगणे म्हणजेच खरे आयुष्य होय* .
 सुखासाठी साधनांची नाही तर *समाधानाची गरज असते* . परमेश्वराचे आभार माना आणि आनंदाने जगा.
            *हे जग असंच आहे.* *ज्याला जे पाहिजे त्याला ते मिळत नाही आणि ज्याच्याकडे जे आहे त्याला त्याची किंमत नाही* मेलेल्या माणसासमोर रडणारे बरेच असतात पण तोच *माणूस जिवंत असताना समजून घेणारे कुणीच नसतात* .
          एक गोष्ट लक्षात ठेवा . *जिथे तुमच्या मौनाची दखल घेतली जात नाही तिथे तुमच्या दुःखाचा पसारा मांडण्यात काहीच अर्थ नसतो* 

*चुकीच्या दारात भिक्षा आणि चुकीच्या माणसाकडून अपेक्षा*दोन्ही व्यर्थच!* 
समस्या असणं ही खरी समस्या नाही तर समस्ये बाबतचा *तुमचा दृष्टिकोन हीच खरी समस्या आहे*



🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...