Wednesday, February 8, 2023

 🌳🌹🌳🌹🌳🌹🌳🌹🌳🌹


*☘️नीतीने पैसा मिळवावा व त्याचा मोह बाळगू नये*🌹🙏 

     *🌺काही जण पैसा मिळत नाही म्हणून काळजी करतात, तर काही जण पैसा फार झाला तरी तो टिकून कसा ठेवावा? म्हणून काळजी करतात. "आणखी जास्त कसा पैसा मिळवता येईल?," याची काळजी काही मंडळीनां लागून राहते.*

 *🌺एकंदरित काय तर पैसा नसला, असला, तरी प्रत्येकाच्या काळजीचे ते कारण असते. असे का होते? याचा जर सूक्ष्म विचार केला तर एक गोष्ट अशी दिसून येते की पैसा हा मुळात चांगला किंवा वाईट नाही. तर त्याचा मोह हा घातक असतो! गरीबाला असे वाटते की पैश्यावाचून अडते. परंतु हा जर सिद्धांत म्हणून मानला, तर श्रीमंताचे जे अडते, त्याचे काय कारण ? त्यांच्याकडे पैसा-अडका मुबलक असतो.*

 *🌺यावरून हेच सिद्ध होते की सुखाच्या आड जर काही येत असेल, तर तो पैश्याचा अभाव नव्हे; तर विवेकाचा अभाव, कारण की विवेकी जो असतो, तो सदासर्वकाळ संतुष्ट स्थितीत राहतो. एखाद दिवस उपास पडला तरी तो विव्हळत नाही, तर दुसऱ्या दिवशी श्रीखंड-पुरीचे जेवण मिळाले तर तो हुरळूनहि जात नाही, मनाची ही स्थितप्रज्ञ दशा मिळवायला हवी, नाहीतर जीवनाला काय अर्थ?*

*🌺व्यवहारात पैसा हवा, तो लागतोच यात काही शंका नाही. पण पैसा कसा मिळवावा, किती मिळवावा आणि त्याचा विनियोग कसा करावा याचा मात्र तारतम्य-विवेक साधकाने केलाच पाहिजे. तसे ते भान सदोदित मनात तेवत ठेवले पाहिजे, तसे न केल्यास पैशाचा मोह हा इतका धोकादायक असतो की, त्यामुळे कसलाहि धरबंध रहात नाही. वाटेल त्या मार्गाने, अनीतिनेहि पैसा कमवायच्या मागे माणूस लागतो. मिळवलेला पैसा अनैतिक वर्तनात उधळून टाकतो; अथवा त्याला इतका काही जपतो की, स्वतःची ऐपत असून भुक्कडपणाचे जिणे जगतो!*

     *🌺'पैसा । पुरुन उरवावा' असे नीतिकारांनी सांगून ठेवले आहे. पण वास्तवात होते असे की, तो पुरतो नि आपल्या उरावर नाचतो. आपण त्याचे गुलाम बनतो. खरे पाहता आपण त्याला पुरावे नि उरावर नाचावे, तरच मोहावर विजय मिळवता येईल. तो मिळवल्याखेरीज साधक दशेचे काहीहि मोल नाही.*

 *🌺कुटुंबपोषणापुरता पैसा नैतिक मार्गाने मिळवावा. यदाकदाचित गरजेपेक्षा जास्त पैसा भाग्याने मिळालाच, तर त्याचा विनियोग सत्कार्यातच केला पाहिजे. गरजूंना मदत, धर्मकार्य, सत्पात्री दान हे करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. समाजऋण-धर्मत्रण हे देखील फेडावेच लागते. त्याखेरीज मुक्ति मिळणार नाही.*

 *🌺नशिबाने पैसा जास्त मिळाला तरी त्याची हाव धरु नये व तो आपला समजू नये. त्याच्यावर अनेकांचा अधिकार असतो, याची जाण ठेवली पाहिजे, "लक्ष्मीः भाग्यानुसारिणी" असे वचन आहे. पण नारायणाच्या स्मरणांत जर लक्ष्मी मिळविली, तरच ती तारक ठरते नि माणसाला आनंदात ठेवते, हे पक्के लक्षात असू द्यावे!* 

*🌺नामे होय गुरुकृपा । होसा मार्ग आहे सोपा ।।*
*नामी निर्मळ नामे निर्भय चित्त । नामी होय जीवन मुक्त ।।*
*श्री. प. पू. सद्गुरु सुव्रत (पृथ्वीराज भालेराव)*

🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...