Wednesday, February 8, 2023

*🌴संसारी जीवनात व्यवहारिक अडचण अटळ असते...!!!* 🌴🙏


*☘️ माणूस कितीही सधन असला तरी तो अडचणीत येणारच नाही असे होत नाही.करोडपती असलेले बांधकाम व्यवसायीक, उद्योगपती रस्त्यावर आलेली उदाहरणे आहेत. लोकांचे आणि बँकांचे पैसे बुडविले म्हणून काही परदेशात पळून गेले तर काही तुरूंगात आहेत...!!!*

*☘️ राव असला तरी आणि रंक असला तरी पैशाच्या चणचणीचा अनुभव संसारात घ्यावाच लागतो, अशा चणचणीचा पहिला आघात हा स्वाभिमानावरच होत असतो...!!!*

*☘️ आज पैशासाठी स्वाभिमान विकाणारी, स्वाभिमान गहाण ठेवणारी अनेक माणसे आपल्याला भेटत असतात स्वाभिमान लंगडा झाला की लाचारी जीवनात प्रवेश करते आणि एकदा लाचारी जीवनात आली की ते आपले मानसिक मरण असते...!!!*

*☘️ अशी मनाने मेलेली माणसे कितीही कोटीच्या गाडीत फिरली तरी त्यांच्या चेहऱ्यावरची सुतकी कळा झाकत नाही, ही चालती बोलती फक्त प्रेते असतात. अशी प्रेतरूप माणसे कोणाचीही सेवा करू शकत नाहीत आणि यांचे कोणावरही प्रेम नसते...!!!*

*☘️ अहंकारी माणसांचा देव म्हणजे पैसा असतो आणि भक्ती म्हणजे लाचारी असते...!!!*
  
*☘️पराक्रमी आणि वीर पुरूष एकवेळ मरण पत्करेल पण आपल्या स्वाभिमानासी तडजोड करत नाही...!!!*

*☘️ अशी माणसे आपल्या कष्टाच्या जोरावर आपल्या जीवनातील आर्थिक चणचणीवर मात करतात आणि अगदीच अशक्य असेल तर आपल्या गरजा कमी करतात...!!!*

*☘️ राहणीमानात बदल करतात , जमेल तेवढी काटकसर करतात , एकवेळ उपाशी रहायची वेळ आली तरी तेही करतात, पण आपला स्वाभिमान सोडत नाहीत...!!!* 

*☘️ अशी माणसे फाटक्या कपड्यात असूद्यात, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे स्वाभिमानाचे तेज अजिंक्य वीराचे असते आणि हे तेज विकत घेता येत नाही आणि कोणत्याही मेकअपने निर्माण करता येत नाही...!!!*

*☘️ही जातीवंत योद्ध्याच्या रक्ताची ओळख आहे आणि हेच आपल्या काया वाचा मने जिवंत असल्याचे लक्षण आहे_ ....!!!*

*☘️ अशी माणसे जीवनातील कोणत्याही अडचणीला आव्हान समजतात आणि लढण्यासाठी यांचे बाहू कायम फुरफूरत असतात...!!!*
 
*☘️ आयुष्य थोडे असले तरी चालेल पण स्वाभिमानी वीराचे असावे, कारण लढणाऱ्याचा इतिहास घडत असतो आणि लाचाऱ्यांचा फक्त वापर होत असतो...!!!*


🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
: ☘️🍁☘️🍁☘️🍁☘️🍁☘️🍁
*💞 ह्रदयस्पर्शी सुविचार 💞
🍁☘️🍁☘️🍁☘️🍁☘️🍁☘️🍁

*🍁१) मदत करणाऱ्याला कधीच धोका देवू नका, आणि धोका देणाऱ्याला कधीच मदत करू नका...!!!* 

*🍁२) मुलगा आई-वडिलांपेक्षा जास्त कमवायला लागला की तो पैशापुढेही आपले आई वडील आहेत हे विसरलेला असतो...!!!*

 *🍁३) आयुष्यात कितीही मोठे बना ; पण माणुसकी सोडू नका...!!!* 

*🍁४) "मदत" एक अशी गोष्ट आहे की केली तर लोक लगेच विसरतात आणि मदत नाही केली तर कायम लक्षात ठेवतात...!!!*
 
*🍁५) रात्री शांत झोप येणे सहज गोष्ट नाही ; त्यासाठी संपूर्ण दिवसभर प्रामाणिक असावे लागते...!!!*
 
*🍁६) पायाला झालेली जखम सावध जपून चालायला शिकवते ; आणि मनाला झालेली जखम आयुष्य कसे जगायचे हे शिकवते...!!!*
 
*🍁७) लहानपणी वाटायचे, परीक्षा फक्त शाळेतच असतात ; आज समजलं, आयुष्य जगताना खूप परीक्षा द्याव्या लागतात...!!!*

 *🍁८) वाईट दिवस अनुभवल्या शिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही...!!!* 

*🍁९) लोखंडाने जरी सोन्याचे कितीही तुकडे केले तरी सोन्याची किंमत कमी होत नाही...!!!* 

*🍁१०) घर किती मोठं आहे याला महत्त्व नसून घरात 🏠 किती सुखी आहेत हे खूप महत्त्वाचे आहे...!!!* 

*🍁११) आपल्यामधील विश्र्वास पर्वतालाही हलवू शकतो ; परंतु आपल्या मनामधील शंका आपल्यासमोर पर्वत उभा करू शकतो...!!!*
 
*🍁१२) गोड बोलण्याचे सोंग करणारा माणूस कधीच कोणाचा हितचिंतक नसतो हे लक्षात ठेवा...!!!* 

*🍁१३) कुत्र्याचे सारे गुण माणसांनी घेतले ; पण इमानदारी नाही घेतली...!!!* 

*🍁१४) स्त्रीच्या गर्भातून जन्म घेवून त्यानेच पाटी लिहिली, "स्त्रियांना येथे प्रवेश नाही". कमाल आहे माणसा तुझी...!!!*
 
*जगांत तीन मुख्य आश्चर्ये आहेत...*

 *🌻"एक" आपण जन्मभर ज्या "मी" बरोबर राहतो, त्याचें स्वरूप आपल्याला कळत नाही...!!!*

*🌻 "दोन" जीवनाचें सारे व्यवहार ज्या मनाच्याद्वारें करतो, ते मन आपल्या ताब्यांत येत नाही...!!!*

*🌻"तीन" क्षणोक्षणीं प्रपंचांत सुख नाही अशी सर्वजण तक्रार करतात, पण तो प्रपंच सोडायला कोणी तयार नाही, हे तिसरें आश्चर्य होय!..!!!*  

*🌻मला कोणाची गरज नाही हा "अहंकार" आणि सर्वांना माझी गरज आहे हा "भ्रम" या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर माणूस आणि माणुसकी लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही...!!!* 

*🌺"हे तिन मंञ आजिवन पाऴा" ऊपाशी मरणार नाही...!!!*🌺

*1)कष्टाचं लावुनं खाऊ नका...!!!*
*2)फुकटचं वरपुनं खाऊ नका.!!!*
*3)चोरीच चुरूण खाऊ नका..!!!*

*🌻1)मरमर राबुन पुढील भविष्याच्या चिंतेने काटकसर करुन पोटमारुन जेवन करन्यात काहीच अर्थ नाही, कारण यामुळे आपल्याच तब्यतीवरती याचा परिणाम होऊन ते पोटतीङकिने साचवलेल आलगद ङाँक्टरच्या घशात घालाव लागेल...!!!*

*🌻2)फुकटच मिळालेल तर कधीच आधाशा सारखे खाऊ नका त्याचेही दुष्परिणाप वरिल पद्धतीनेच होतील...!!!*

*🌻3)जेवढं चोरुन लुटून किंवा लुबाङून खाल एक दिवस त्याची मुद्देमालच काय व्याजासहित भरपाई करावी लागेल चुकनार नाही...!!!*

🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
*🌹"मी आहे ना" एवढे जरी शब्ध ऐकले तरी अडचणीत धीर देण्यासाठी खुप मोलाचे व संजीवनी सारखे असतात...!!!🌹💐🙏*

*🌺आपल्या आयुष्यात आलेली माणसं ही काही उगाच आलेली नसतात.. प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं...!!!*

*🌺कुणाशी तरी काहीतरी आपले ऋणानुबंध जुळलेले असतात.. नाहीतर एकशेपस्तिस करोड लोकसंख्येच्या देशात नेमक्या याच व्यक्तींशी आपली ओळख का होते? याचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही...!!!*

*🌺जी नाती तयार होतात ती आपण जीवापाड जपावी.. आपल्या जगण्यासाठी ज्या प्राणवायूची गरज असते तो प्राणवायू म्हणजे ही आपली माणसे... रक्ताच्या नात्यांना काहीच चॉईस नसतो...!!!*

*🌺पण आपलेपणाच्या नात्यात तसं नसतं... .* *It's mutual relation... मन जुळलं की आपलेपणाचे नात होते... जे बंध खूप स्ट्रॉंग असतात ते कोणाच्याही सांगण्याने किंवा विपरीत परिस्थितीत कधीच तुटत नाहीत...!!!*

 *🌺आपण खूप वाईट परिस्थितीतून जात असताना नातेसंबंधित मित्राणचे किंवा मैत्रिणीचे* " *मी आहे ना* " *एवढे शब्द संजीवनी सारखे काम करतात.. अगदी प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष सोबत असणं खूप सकारात्मक ऊर्जा देणारं असतं...!!!*

*🌺आयुष्यात कधी वाईट वेळ आलीच नसती तर आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले नातेसंबंधित मित्र कोण हे कधीच कळलेच नसते...!!!*

*🌺आपल्या माणसांसोबत वेळ कसा व कधी जातो हे कळत नाही. पण वेळेसोबत आपली माणसं नक्कीच कळतात...!!!*

*🌺स्वप्न पुर्ण झाल नाही म्हणुन रडायच नसत, रंग उडले म्हणुन चित्र फाडायच नसत, फक्त लक्षात ठेवायच असत. सर्व काही आपल नसत, आपल्या दुःखात कदाचित दुसऱ्याच सुख देखील असू शकत...!!!*
   
 *🌺सत्याच्या मार्गावर चालणे फायद्याचे, कारण या मार्गावर गर्दी फारच कमी असते...!!!*

*🌺जीवन म्हणजे गुडघाभर चिखलात चालण्या सारखे असते. कारण चिखलात जोरात चालता येतं नाही, आणि दमलो म्हणून खाली बसता ही येतं नाही...!!!*

 *🌺ज्यांच्याकडे संयमाची शक्ती असते, त्याच्याकडील शक्तीचा कुणीच मुकाबला करू शकत नाही...!!!*

*🌺कोणाचा सरळ स्वभाव हा त्याचा कमकुवतपणा नसतो, ते त्याचे सुसंस्कार असतात...!!!*

*🌺सत्य नेहमीच निर्णय करणारे असते, मात्र असत्य नेहमी माणसांमध्ये दुरावा व दुश्मनी निर्माण करते...!!!*

 *🌺सच्ची मैत्री ही निरामय, निरागस आरोग्यसारखी आहे .जेव्हा आपण ती मैत्री गमावून बसतो तेव्हाच तिचे खरे महत्त्व कळते...!!!*

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
🌳🌴🌳🌴🌳🌴🌳🌴🌳🌴

*🌹आता समाजाला खरी जनजागृतीची गरज आहे. लोकांनी काही करून कामधंदा, व्यवसाय, नोकरी मधून पैसा कमवायला शिकले पाहिजे. नाहीं तर पुढच्या पिढीकडे भूमिहीन होऊनच राहावे लागेल असे वाटते. आजी आजोबा व वाडवडीलांनी सांभाळून ठेवलेली जमीन जागा प्रॉपर्टी विकुन बिनमेहनीतिने झटपट श्रीमंत होण्याची समाजात चढ़ावोढ चालू आहे. त्यामुळे जमीन प्रॉपर्टी विकुन आता लोक भूमिहीन होऊ लागले आहेत त्यांना वाचवा. नाहीतर पुढच्या पिढीकडे व शेतकऱ्यांकड़े एक गुंठाही जमीन व प्रॉपर्टी शिल्लक राहणार नाही याचा खाली दिलेले एक ते पाच टप्पे आहेत ते जरूर मनःपासून वाचून विचार करा...!!!*🌹🙏

*🌳टप्पा १:- १९५० ते १९७५*
*==================*

*या कालावधीत मराठी माणसाकडे गावाकडे भरपूर जमीन होती. सरासरी प्रत्येक कुटुंब २०-३० एकर जमिनीचे मालक... मोठे वाडे... दांडगा रुबाब... निसर्गावर चालणारी शेती... अगदी १० वी-१२ वी शिकलेले शिक्षक, मिलिटरी भरती, पोलीस भरती झाले तसेच स्पर्धा परीक्षेत सहज यश मिळायचे. अनेक पदवीधर PSI, Dy. SP , तहसीलदार त्या काळात झाले. नाही जरी नोकरी लागली तर आहे की 20-30 एकर शेती... उत्तम शेती, दुय्य्म नोकरी, तृतीय व्यापार अशी म्हण होती. हा काळ म्हणजे मराठी माणूस राजा होता...!!!* 

*🌳टप्पा २ :- १९७५ ते १९९५*
*==================*

*देश उद्योग व आधुनिकतेकडे जाऊ लागला, १९७४ च्या दुष्काळापासून निसर्गाने झटका द्यायला सुरुवात केली. शेतीची विभागणी सुरु झाली,*

 *२० एकराचे मालक ५ एकरावर आले. बाहेरील राज्यातील कामगारांचे मुंबई शहरात शिरकाव सुरु झाले. शेती आता भांडवलदाराची होऊ लागली. विहिरी, मोटारी, पाईप लाईन आल्या. पाणी उपसण्याची स्पर्धा सुरु झाली.*
*राजकारण गावागावात घुसलं, पुढारपणाच्या नादात अनेकांनी जमीनी कवडी मोलाने विकल्या, बाई-बाटलीत अनेकजण बरबाद झाले.* 

*स्पर्धा वाढली, आता नोकरी सोपी राहिली नाही. हायस्कुलवर नोकरीचा दर २० लाख झाला. वाढणाऱ्या गरजेपोटी जमिनी विकायला सुरवात झाली. २० एकराचा मालक मोकळा झाला व गावच्या कट्ट्यावर विड्या फुकू लागला, पोरं बेकार फिरू लागली...!!!*

*🌳टप्पा ३ :- १९९५ -२००९*
*==================*

*हा काळ मराठी माणसाच्या जबरदस्त घसरगुंडीचा काळ. परराज्यातून मोठया प्रमाणात लोक आले. मोठे उद्योग यांनी काबीज केले, हॉटेल शेट्टी लोक, दूध- पेपर- भाजीपाला- टॅक्सी- पाणीपुरी- किरकोळ दुकानदारी उत्तरेतील लोकांनी काबीज केली.*
 
*सहकारी कारखाने, बँका, पेट्रोलपंप, बिअरबार, दारू दुकानें चाणाक्ष पुढाऱ्यांची झाली. मराठी माणूस मात्र अजूनही विहीर पाडतो... बोअर मारतो... स्पर्धा परीक्षा तयारी... भरतीला जातो... पोराला हायस्कुल वर चिटकवतो... ह्यातच गुंतलेला दिसला. २० एकर जमीन वाटण्या होऊन, मग विकून एकरावर आली तरी डोळे उघडतं नव्हते. अजूनही पाटीलकी, व जमीनदारीच्या दिवा स्वप्नात रमला होता...!!!* 

*🌳टप्पा ४ :- २००९ ते २०२०*
*===================*  

*ग्लोबलायझेशन झाले, जगाचे पैसे भारतात आले. पुणे, मुंबई, इतर शहराजवळील जमिनींना किंमती आल्या. मग काय* *जमिनी विकायची स्पर्धाच सुरु झाली. राजकीय कार्यकर्ते एजंट झाले व मराठी माणसाचा 'मुळशी पॅटर्न' झाला.जमीनदारी संपली... पोरं बेकार... पुणे-मुंबईत ८ - १० हजारांच्या नोकऱ्या करू लागली.*

*आता विकायलाही काही शिल्लक राहिलं नाही. खरी, बिकट गरिबी सुरु झाली. पोरांचा वापर शंभर- दोनशे देऊन राजकारणात सुरु झाला. बापाकडे लग्नाला पैसा नाही. मग पोरी हात धरून पळून जाऊ लागल्या. गावचा जमीनदार हमाली करू लागला. व्यापार तृतीय म्हणायचे. त्यांचेकडेच हे बडे जमीनदार, त्यांची पोरं वॉचमन, हमाली, क्लार्क, ड्रायव्हर अश्या नोकऱ्या करू लागली व जयंती साजरी करणेसाठी बड्या व्यापारी लोकांजवळ वर्गणी मागू लागली...!!!*

*🌳टप्पा ५:- २०२० ते २०३०*
*=================*

*इथून पुढील काळ फक्त पैश्याचा असेल. ज्यांचेकडे पैसा तोच सरपंच, तोच आमदार... नोकरी हा विषय संपला आहे, नोकरी शोधणारा त्यातच म्हातारा होईल.* 
*उच्च जातीचा हताश होऊन बघत बसेल. पैसा न कमविणाऱ्याकडे एक गुंठासुद्धा शिल्लक राहणार नाही. शेती, नोकरीसह जो व्यवसाय करेल तोच काही कमवू शकेल...!!!*

*म्हणून मराठी तरुणांना विनंती आहे अजून वेळ गेली नाही शेती सांभाळा शेती बरोबर जोडधंदे करा , नोकरी पेक्षा व्यवसाय करण्याचा विचार करा...!!!*

*जो चूक करतो तो माणूस... तीच तीच चूक परत करतो तो वेडा माणूस... जो दुसऱ्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस...!!!*

*आता वेळ आहे झालेल्या चुका सुधारून त्या चूका पुन्हा होणार नाहीत हे पहाणेची... आजची ही सत्य परिस्थिती आहे याचा सर्व समाजाने गंभीर विचार केलाच पाहिजे व आवश्यक ते उपाय केलेच पाहिजेत. पुढच्या पिढीला आपण शेतकरी होतो व आहोत याची जाणीव राहीली पाहिजे..!!!*


🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...