*माझा शाळेचा तो रस्ता...*
*भल्या पहाटे त्या रस्त्याने एक दुधाची गाडी जाई, घोडा सायकल ढकलत ढकलत पेपरवाला गठ्ठे नेई...*
*वळणावरच्या जुन्या मंदिरी रोज दिसे तो वृद्ध पुजारी अन बाजूच्या फुटपाथावर निजलेले ते चार भिकारी...*
*पुढे जरा मग जाता लागे बंद उभा गिरणीचा भोंगा ज्याच्या अगदी समोर होता, घोड्याविन गंजलेला टांगा...*
*तिथून पुढे मग वाटेत येई एक छोटेसे अजब दुकान आम्हा मुलांना तिथे सापडे, जे जे लागे ते सामान...*
*शाळेपाशी येता येता उभी असे एक हातगाडी चिंचा, बोरे, आवळे, पेरू देई बडीशेप ची काडी...*
*घरापलिकडे अपुली दुनिया ह्या वाटेने झाली सुरू, उनाड किस्से धमाल गमती हृदयामध्ये बंद करू...*
*सात समुद्रापार उडालो, वर्षे गेली बघता बघता तरी अजून ही स्मरणी आहे, माझा शाळेचा तो रस्ता माझा शाळेचा तो रस्ता...*
=================================================

सुखाचीखरेदी

माणूसकीच्या बाजारामध्ये;
'दिखावेपणाची' लयलूट आहे,
सापडेल का हो दुकान एखादं
जिथे 'सुखावरती' सुट आहे..
अगदीच जिर्ण 'झोळी' माझी;
पायी 'बुजरेपणाचं बुट' आहे,
सरळमार्गी जगण्यामध्ये;
किचकट भारी 'Root' आहे,
दुःखावरती एक्सेंज ऑफर;
'आनंदाने' भरली 'मुठ' आहे,
शोधतोय असं दुकान नवखं;
जिथे 'अपेक्षाभंग' झूट आहे,
गर्दी नको 'आडमुठेपणाची';
आणि 'समंजसपणाची' तिथे 'तुट' आहे,
सापडेल का हो दुकान एखादं
जिथे 'सुखावरती' सुट आहे
===============================
*एक साल ऐसा भी*
ना अचारों की खुशबू,
ना मुरब्बे की मिठास,
ना अनाज का भंडार,
ना दालों का स्टॉक,
एक साल ऐसा भी
ना आइसक्रीम की ठंडक,
ना बर्फ की चुस्की,
ना गन्ने का रस,
ना मटके की कुल्फी,
एक साल ऐसा भी ।
ना ऑरेंज की कैंडी,
ना केरी की लौंजी,
ना सैर या चौपाटी,
ना गोलगप्पों की गिनती,
एक साल ऐसा भी ।
ना शादियों के कार्ड,
ना लिफाफों पर नाम,
ना तिये का उठावना,
ना दसवे की बैठक,
एक साल ऐसा भी ।
ना साड़ी की खरीदारी,
ना मेकअप का सामान,
ना जूतों की फरमाइश,
ना गहनों की लिस्ट,
एक साल ऐसा भी ।
ना ट्रेन की टिकट,
ना बस का किराया,
ना फ्लाइट की बुकिंग,
ना टेक्सी का भाड़ा,
एक साल ऐसा भी ।
ना नानी का घर,
ना मामा की मस्ती,
ना मामी का प्यार,
ना नाना का दुलार,
एक साल ऐसा भी ।
ना पिता का आंगन,
ना माँ का स्वाद,
ना भाभी की मनुहार,
ना भाई का उल्लास
एक साल ऐसा भी ।
ना मंदिर की घंटी,
ना पूजा की थाली,
ना भक्तों की कतार,
ना भगवान का प्रसाद,
एक साल ऐसा भी ।




*आजचे एकांत पसाय दान*
आता सर्वात्मके देवे ।
विनाकारण न फिरावे ।
घरीच बैसोनि द्यावे ।
एकांतदान हे ॥ 1॥
एकमेका कर न मिळवावे ।
दुरुनीच नमस्कारावे ।
अंतर सुरक्षित राखावे ।
परस्परांमाजी ॥ 2॥
सदासर्वदा हात धुवावे ।
रुमालाविणा ना शिंकावे ।
कोमट जल प्राशावे ।
थंड वर्जावे सर्वथा ॥ 3॥
घरी बसण्याचा येता कंटाळा ।
जोपासावी एखादी कला ।
मदत करावी गृहिणीला ।
पुण्य लागे ॥ 4॥
करा स्वच्छता सदनाची ।
त्याच बरोबर तनाची ।
काढा जळमटे मनाची ।
शूचिर्भूत व्हावया ॥ 5॥
मनन आणि चिंतन ।
थोडा वेळ नामस्मरण ।
चुकविता येईल मरण ।
तुम्हासहित इतरांचे ॥ 6॥
आजपावेतो खूप पळाला ।
दे विश्रांती थोडी शरीराला ।
सादर व्हावे समयाला ।
संत वचन हे ॥ 7॥
आहे विषाणू चे संकट ।
करी मनाला बळकट ।
सकारात्मकतेचे उभारी तट ।
सभोवताली ॥ 8॥
वेळ नव्हती म्हणोन ।
केले नसेल वाचन ।
अभंगगाथा ग्रंथ पावन ।
आता तरी वाचावा ॥ 9॥
आयुष्यभर पुरेल ।
पुरोनिया उरेल ।
ग्रंथांची रेलचेल ।
संतकृपेकरोनी ॥ 10॥
आवाहन करी वारंवार ।
केंद्र व राज्य सरकार ।
धोका वाढेल फार ।
बेफिकीरिने ॥ 11॥
प्रशासन, पोलिस, डॉक्टर ।
सोबत स्वच्छता कामगार ।
काळजी घेती तत्पर ।
सकल जनांची ॥ 12॥
हेही दिस जातील निघोन ।
उद्या येईल आशेचा किरण ।
तोवर संयमाचे पालन ।
कर मानवा ॥ 13॥
येथ म्हणे श्री निसर्गरावो ।
कोरोना ना पसरावो ।
स्वच्छतेचे गीत गावो ।
जनकल्याणहेतू ॥ 14॥

[5/26/2020, 12:58 PM] +91 99697 65620: 











#बायका_फारच_हळव्या_असतात....।*
भडाभडा बोलतात...
घळाघळा रडतात...
खुदकन हसतात...
पटकन रुसतात....
आपल्या घराला जिवापाड जपतात....।
*बायका फारच हळव्या असतात....॥*
शब्द जिवास लावून घेतात.....
ओठांना शिवून घेतात...
बोलायचं ते बोलत नाहीत...
मनातलं सांगत नाहीत...
हवा पाणी, मुलंबाळं, घरदार ह्यांची आवड....
स्वयंपाकपाणी...
नवे पदार्थ..........
नको नको ते विषय काढून....,
नको तेव्हढं बोलत जातात.....
आतली सल दडवत जातात......
*बायका फार हळव्या असतात.....॥*
दुखलं खुपलं सांगत नाहीत.....
नको तेव्हढं सोसत जातात......
वर पुन्हा कुणीच दखल घेत नाही म्हणत -
रडत कुढत जातात...
कुणाला नसलं बरं....
तर-
पदर खोचून सिध्द होतात.......
औषधपाणी खाणंपिणं
निगुतीने देत जातात.....
आई होतात,दाई होतात, सखीसारखं जपत जातात......
किती झिजतेस माझ्यसाठी.......
शब्द ऐकण्यास आतूर असतात.......
तिचे कष्ट गृहीत धरून कोणीच काही बोलत नाही.......
आपली कोणास किंमत नाही......
सल सलत जातो....
वाटते तिला फुलं देऊन,
माझ्या वाट्यास काटेच असतात.......
*बायका फार हळव्या असतात.....*
प्रेम जेव्हा करतात ना
तेव्हा जिवापाड करतात.......
आभाळ होतात,
धरणी होतात,
पौर्णिमेचा चंद्र होतात,
चांदण्याची शीतलता,
सागराची अथांगता,
झर्याची निर्मळता,
जीवनाला ऊर्जा देत,
सदैव झिजत असतात.......
*बायका फार हळव्या असतात.....॥*
घराची शान असतात,
कुटुंबाचा प्राण असतात,
तबांदिवडिवाय घराच्या भिंती खचतात....
छप्पर उडते.......
त्यांचा हात फिरला की घराचा स्वर्ग होतो....
प्रेम करतात जिवापाड,
*फक्त एका गोड शब्दासाठी आतुरलेल्या असतात....।*
*बायका फार हळव्या असतात...॥*
खंबीर असतात, गंभीर असतात.......
प्रेमळ असतात, अल्लड असतात.....
खर्च जरी केला तरी -
चार पैसे बाळगून असतात........
जगण्याचा एक मंत्र सगळ्याच बायका जाणून असतात....
*नवरे जरी गप्प बसले तरी आतून प्रेमळ असतात......*
*बायका सगळ्या हळव्या असतात......॥*
आभाळाची सावली असतात.....
हिरवीगार पालवी असतात.....
माधवी बहर असतात,
वसंतातली झुळूक असतात,
*बायका फार हळव्या असतात...॥*
(#माझ्या_सर्व_मैत्रीणींसाठी)






(CP)
No comments:
Post a Comment