*
मुंबईतील सर्वांत प्रसिद्ध चर्चेसपैकी एक आहे बांद्रे येथील माउंट मेरी चर्च. सप्टेंबरमध्ये दरवर्षी येथे माउंट मेरीची जत्रा भरते. यावर्षीही 8 सप्टेंबर रोजी ही जत्रा सुरू झाली आहे. 15 सप्टेंबरपर्यंत ही जत्रा असेल. या जत्रेला सर्वधर्मियांची मोठी गर्दी असते.*
*माउंट मेरी जत्रेचं वैशिष्ट्य*
*माउंट मेरी हे देशातल्या सर्वांत सुंदर चर्चेसपैकी एक मानलं जातं.*
*16 व्या शतकात पोर्तुगालहून मदर मेरीची मूर्ती येथे आणली होती*
*तिच्यासाठीच हे भव्य चर्च टेकडीवर उभारण्यात आलं.*
*मात्र, इ.स. 1700 मध्ये अरबी चाच्यांनी या मूर्तीची नासधूस केली.*
*त्यानंतर अनेक वर्षांनी एका कोळ्याच्या स्वप्नात ही मूर्ती आली होती. समुद्रात ही मूर्ती मिळेल, असाही त्याला स्वप्नात दृष्टान्त झाला होता.*
*त्याला नंतर खरोखर ही मूर्ती समुद्रात आढळून आली.*
*त्यानंतर 1760 साली हे चर्च पुन्हा बांधण्यात आलं.*
*गेल्या 300 वर्षांपासून माउंट मेरी चर्च मुंबईमधील प्रसिद्ध चर्च म्हणून आपली ओळख जपतंय.*
*माउंट मेरी चर्च समुद्रपासून 80 मीटर उंचीवर आहे. या चर्चमधून अरबी समुद्राचं विहंगम दृश्य दिसतं.*
*8 सप्टेंबर नंतर येणाऱ्या रविवारी येथे आठवडाभर मोठी जत्रा साजरी केली जाते.*
*या जत्रेत वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाते.*
*लोक येथे मेणाचे अवयव दान करतात.*
*या जत्रेसाठी दररोज हजारो लोक गर्दी करतात.*

No comments:
Post a Comment