Wednesday, January 18, 2023

 *🚩🌀♐🈺♎ 🉑 ⛎🈚♐🌀🚩


*🔲 शिवकाळातील जमिनीची*
       *प्रतवारी व सारा आकारणी.*
      *~~~~~~~~~~~~~~~~*
         *🚩*
        *🏇 शिवकाळात .......*

      *एखादा प्रांत पहिल्यांदाच स्वराज्यात दाखल झाला, तर "स्वराज्याचे भूमापन अधिकारी" त्या प्रांतात जाऊन जमिन मोजणी व तिची प्रतवारी करुन मग शेतसारा ठरवला जाई.*

  *"स्वराज्यातील जमिन मोजण्याचे साधन म्हणजे काठी". याला "शिवशाही काठी" बोलले जाई.व याच काठीने जमीन मापली ( मोजली ) जात असे.* 

*📝 मोजमाप :----*

*०१) ५ हात ५ मुठी = १ काठी.*
*०२) १ काठी = ८२ तसू*
*०३) २०x२० काठ्यांचा =*
        *१ बिघा.*
*०४) १२० बिघे = १ चावर* 

*अशा पद्धतीने जमिन मोजली जाई.*

  *🚩 प्रामुख्याने स्वराज्यात......*
        *जमिनीच्या १२ प्रति*
        *ठरिवल्या होत्या.*

*(१) अव्वल (२) दूम (३) सीम*
*(४) च्यार सीम*
*(५) बावील किंवा बावूल*
*(६) खारवट (७) रहू (८) खारी*
*(९) कुड्याट ( किंवा खुरियत )* *(१०) राजपाळ (११) तुरखटे* व *(१२) मनूत.*

 ▪️यापैकी......
*▪️राजपाळ = झुडुपाची,*
*▪️खारवट = समुद्राकाठची,*
*▪️खारी = खाडीजवळची,*
*▪️बावल = खडकाळ,*
*▪️खुरी = दगडाळ,*
*▪️तुरवटे = द्विदल धान्ये व*
                     *ताग पिकवणारी,*
*▪️मनूत = झाडांच्या मुळ्या*
                    *असलेली व साफ*
                    *न केलेली.* 

*🌀 या शिवाय ..........* 

*● वजत म्हणजे नापीक,* व
*● वरकस म्हणजे डोंगरी* 
    *हे ही प्रकार दिसतात.*

*🔲 जमिनीच्या प्रतवारीवरून*
       *तिची सारा-आकारणी केली*
        *जाई.*

*● हि सारा आकारणी दोन प्रकारात केली जाई*

*१) नगदी - रोख रकमेत.* व
*२) गला - धान्य स्वरुपात.*

*दर बिघ्याला अव्वल - १२ मण,* *दुय्यम - १० मण,*
*सीम-८ मण,*
*च्यार सीम ६ मण,*
*राजपाळ-८ मण,*
*खारवट - ७ मण,*
*बावल ६ मण,*
*खुरी - ६ मण,*
*कुड्याट-६ मण,*
*रहू- ५ मण,*
*तुरवटे व मनूतही ५ मण.*

*🌀 वजत व वरकस*
       *जमिनीवरील आकारणी*
       *बिघ्याऐवजी नांगराप्रमाणे*
       *केली जाई......*

*▪️१ नांगर = साधारणत :--*
     *६-७ बिघे. एवढ्या जमिनीला*
     *एक बिघा समजून आकार*
     *घेतला जाई.*

 *हा सारा ही नजरमान ( तज्ञ )*
 *अशा ५ लोकांनी जमीन तपासून खंडीचे पिकावरून स्थळ नजरेस येईल, त्याप्रमाणे धारावसुली ठरविली जाई.*

   *"कोरडवाहू जमिनीला जिराईत" तर "ओलीताच्या जमिनीस बागाईत" असे म्हणत.*

    *बागाईत जमिनीतही मोटस्थळ, पाटस्थळ, बागमळा व राई असे पोटविभाग पाडले जात.*

    *जमिनीची पाहणी करणारा "जमिन कारकून", व मोजणी करणारा "काटकर" यांना सरकारकडून वेतन मिळे. म्हणजे "स्वराज्याच्या सरकारी कोशातून" मिळे. "पाहणीचा खर्च" मात्र रयतेवर आकारला जाई.*

    *बिघे,चावर,सीमा ठरली म्हणजे "चकबंदी" झाली. यानंतर जमिनीची काटेकोर मोजणी, प्रतवारी ठरवून मिरासदार, कुळे, शेतकरी यांच्या नावे "सनदा" दिल्या जात.*
    *गावाचा "जमिनझाडा" तयार केल्या नंतर "अनाजी पंत प्रभुनीकर" हे जातीने तपासणी करीत असत.*

  *जमिनीच्या "साऱ्याचा दर" हा मोगलांचा व स्वराज्याचा वेगळा वेगळा होता. मोगलांचा १/२ म्हणजे उत्पन्नाचे दोन भाग करुन एक भाग सरकार जमा व एक भाग शेकऱ्याला मिळत असे.*

    *मोगलाईत देशमुख, वतनदार "सारा वसुलीचे" काम करीत. ते हजार खंडी धान्य गोळा झाले तर त्यातील दोनशे खंडी सरकार जमा करीत. उरलेले स्वतःकडे ठेवीत असत. पण स्वराज्यात असा प्रकार नव्हता.*

     *स्वराज्यात शेतसारा वसुलीचा दर हा २/५ असा होता. म्हणजे एका शेतकऱ्याला पाच खंडी धान्य झाले तर, त्यातील दोन खंडी सरकार जमा होत होते व तीन खंडी स्वतः शेतकऱ्याला मिळत असे. हा शेतसारा वसुल करायला देशमुख वतनदार येत नसे. तर स्वराज्याचा सरकारी अधिकारी येत असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी "वतनदारी बंद" करुन रयतेला सुखी केले होते.*

     *सरकारजमा झालेले धान्य साठवून ठेवले जाई. दुष्काळात, अतिवृष्टीने, शत्रु सैन्याने पिकाची नासाडी केली तर अशा वेळी ते साठवून ठेवलेले धान्य रयतेला दिले जाई. तसेच उरलेले धान्य महागाईच्या काळात विकायला काढले जाई.*

   *आदिलशाही व मोगलशाही तील "जमिन धारा", "शेतसारा" पद्धती पाहिल्या, तर लक्षात येते की देशमुख वतनदार हे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत असत.*

    *हा सर्व भ्रष्टाचार शिवाजी महाराजांनी समुळ नष्ट करुन एका बाजुला शेतकऱ्यांवरील अतिरिक्त बोजा पूर्ण कमी केला व सरकारचे उत्पन्न वाढविले. शेतकऱ्यांसाठी शिवाजी महाराजांनी बंधारे, पाट, धरणे हि बांधली होती. "शेतीसाठी पाण्याची सोय" हे धोरण शिवाजी महाराजांनी उत्कृष्ट पद्धतीने राबविले होते. शिवाजी महाराजांचे हे शेतकऱ्यां विषयक व शेती विषयक धोरण अतिरिक्त अभ्यासनीय व उपयुक्त असेच आहे. आज बारकाईने पाहता भारतातच काय तर अनेक देशात शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण हे वापरले जाते.*
 
        *~~~~~~~~~~~*

      *▪️संकलन :---*
                 *दुर्गवेडा कृष्णा घाडगे*

 *▪️संदर्भ:--*
*● शककर्ते शिवराय खंड २*

*● लेखक- शिवकथाकार विजय*
                 *देशमुख* 

*● सभासद बखर*

*● राजवाडे खंड २०*
   *लेखांक- ५५, ५८* 

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🎠🎠🎠🎠🏇🏇🏇🏇🎠🎠🎠🎠

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...