Monday, January 9, 2023

😃एक माणूस *मानसोपचार तज्ञाकडे* जातो

*डाँ* : बोला काय त्रास आहे तुम्हांला ?

*पेशंट* : डाँ, मी रात्री बेड वर झोपल्यानंतर मला सतत जाणवतं की बेड खाली कोणी तरी आहे. मी रात्र भर उठून बघतो, पण तीथे कोणी नसतं

*डाँ* : ठीक आहे, मी तुम्हांला गोळ्या देतो, त्या घ्या, आणी पुढचे सहा महीने आठवड्यातून दोन रात्र दवाखान्यात झोपाला या, म्हणजे मला योग्य निदान करता येईल

*पेशंट* : ठीक आहे, तुमची एकंदर फी किती होईल ?

*डाँ* : गोळ्यांचे ५ हजार व सहा महीने दवाखान्यात झोपण्याचे एका वेळचे १५०० रूपये प्रमाणे होतात ७२,००० हजार, एकंदर ७७,००० हजार

*पेशंट*: ठीक आहे डाँ, मी उद्या पासून येतो.

*पुढे एक वर्षांनी तो पेशंट डाँक्टर ना रसत्यात भेटतो*

*डाँ*: अरे, तुम्ही आलाच नाहीत उपचार घेण्यासाठी

*पेशंट*: डाँ त्याच दिवशी मी मित्रांसोबत बार मध्ये बसलो. त्यांनी सल्ला दिला, व मी पूर्ण बरा झालो.

*डाँ* : काय सल्ला दिला.

*पेशंट* : मित्र म्हणाले, डाँ ला ऐवढे पैसे देण्यापेक्षा, बेड आजच विकून टाक, मी तसेच केले, व गादी जमीनीवर टाकून झोपायला सुरवात केली, त्यामुळे बेड खाली कुणी तरी आहे, ही भिती गेली व ७७,००० तुमची फी वाचली व बेड चे सहा हजार आले.


*सारांश*

 डाँ किंवा वकील यांच्या कडे गरजे नुसार जरूर जा पण बाकी प्रश्न मित्रांसोबत टेबलवर बसून सुटतात.

😂😂🤣🤣🤣🤣🤣
 आज सकाळी सकाळी लवकर उठून गॅलरीत बसलो...😊😊



रोज सकाळपासूनच न भिता दिवसभर चिमण्यांचा मुक्त संचार सुरूच असतो...💃


आजही चिमणा चिमणी जोडी सकाळीच हजर झाले...😄



चिमणा टाकलेले दाणे टिपण्यात दंग होता...

तर चिमणी कुंडीतील मिळालेली एक छोटी काडी चोचीत धरून सारखी चिवचिवत होती...

तिच्या भाषेत काय बोलत असावी काय कळत नव्हतं...🤔🤔



मी विचारच करत होतो चिमणी नक्की काय बोलत असावी बरं....
🤔🤔


तेवढ्यात बायको चहा घेऊन आली...
मी बायकोला विचारले, "अगं, ती चिमणी चोचीत काडी धरून चिमण्याशी काय बोलत असेल बरं..."😊😊



बायको म्हणाली, "अहो, ती चिमणी काडी चोचीत धरून म्हणतेय की चिमण्या, तू घरात काडीचं काम करत नाही..."🤨🤨


अशाप्रकारे ती चहा ठेवून किचनमध्ये निघून गेली...😨😨

*जनरल गप्पा मारायची पण सोय राहिलेली नाही हल्ली ...*😝😝

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...