ओ साहेब....
कस काय सगळ सांभाळून घेता ओ
सडेतोड नाही पण एकदम झटका देता ओ
एकदा सांगा तरी तुम्ही आम्हाला फेमस कस व्हायचे
काही न करता आपसुकच आपले नाव मोठे करून घ्यायचे
मग आम्ही पण होऊ की तसच फेमस
इथे दोन भाकरी साठी रोज मरायचं
अवकाळी पावसाने नासलेल पिक घेऊन जगासोबत लढायचं
पाण्यावाचून तहानलेला घसा....
भुकेपाई पोटात पडलेली आग....
सांगा तरी साहेब....
ही तहान कशी भागवू....
अन् पोटातील आग कशी विजवू...
साहेब थोडस तर सांगा की आम्हाला देखील गाजायचयं
फक्त आपल्या माणसा मध्ये नव्हे तर
साऱ्या समाजात आपली ओळख करून देऊन
समाजाला झटक्यात पाणी पाजायचयं
पदवीधर असूनही आम्ही बेरोजगार आहोत....
हक्काची शेती नसली तरी आम्ही शेतकरी आहोत.....
आकडेमोड येत नसली तरी आम्ही शिक्षित आहोत.....
आम्ही बरेच प्रयत्न करतो ओ फेमस व्हायचा
आमचा अविष्कार जगासमोर दाखवायचा
पण आम्हाला काहीच करता येत
समाजासमोर फेमस होता येत नाही
*आम्ही पण करु का हत्या एखादी...*
म्हणजे आम्ही होऊ फेमस
*आम्ही पण करु का अपहरण एखादे....*
म्हणजे आम्ही होऊ फेमस
*आम्ही पण करु का कुठे चोरी एखादी...*
म्हणजे आम्ही होऊ फेमस
*की आम्ही पण करू का बलात्कार एखादा...*
म्हणजे आम्ही होऊ फेमस
नाही ओ नाही होत हे सगळ काही करायची हिंमत
हे सगळ केल्याने आम्हाला मोजावी लागेल ओ किंमत
आम्हाला फेमस व्हायचयं....
जगासमोर यायचंय....
समाजातील प्रत्येकाला दाखवायचंय....
आम्ही पण फेमस होतोय कुठे तरी
त्यामुळे जरा लक्ष द्या आमच्यावर...
*द्या रोजगार बेरोजगारांना...*
*द्या योग्य हमीभाव शेतकरी बांधवांना ....*
*द्या भांडवल व्यवसायासाठी अशिक्षित तरुणांना...*
बाकी काहीच नको ओ....
फेमस तर आम्ही काल पण होतो आज ही आहे
फक्त आम्हाला देखील अस फेमस होऊ द्या....
जसे तुम्ही फेमस करता
*त्या चोराला....*
*त्या आतंकवादीला...*
*त्या कट्टर गुंडाला...*
*अन् त्या बलात्काऱ्याला....*
*प्रतिक कांबळे,पवई,९७०२२०६३७२*
No comments:
Post a Comment