Sunday, January 22, 2023

गड दुर्गनाम कोडे....

 *गड दुर्गनाम कोडे....*

*किल्ल्यांची नावे ओळखा*

चला आठवा इतिहास... 
1 घेतली आन, मोडुनी भान 
  मुक्त करी देश
  गड बेलाग, त्यावरी आग 
  दिला संदेश ।।

2 लढविले तट, उधळला कट 
    माणसे कैशी
    जरी भुईकोट ,भेदिले गोट 
    गावे चौऱ्याऐंशी ।।

3 नाव हिरकणी, बाळ तिचे गुणी 
   उतरली रात्री
   राजा बांधे बुरुज, नाव दिले     
   तिज करुनिया खात्री ।।

4 उचलला भार, लावली पहार 
   नाद होई ठण्ण
   देवीची कृपा ,होतसे नृपा 
    गवसती होन ।।

5 उंचहा कडा ,त्यावरी वाडा 
   असा बाले किल्ला
   सैन्यासह वस्ती ,दुष्मना धास्ती 
   ना करी हल्ला ।।

6 धिप्पाड शरीर बळात ,
   रौद्र जळात  सागरी लंका
    तरंगती होडी , लावू कशी    
    शिडी येते मनी शंका ।।

7 भोरप्याचा प्रबळ डोंगर ,
   झेंडा बुरुजावर अवघड जागा
   फाडिले पोट ,उधळला गोट 
   मारिली पागा ।।

8 सज्ज आरमार, बेट कुरट्यावर 
   शिशाचा पाया
   उठवला दुर्ग दर्यात, असे रेतीत 
   धोंडा मोरया ।।

9 दमयंती सवे तो बसे, गाली मग 
    हसे महाली पाणी
   कोसळती नरमादी ,धबाबा   
   आदी प्रपाती गाणी ।।

10 इतकासा असुनी हा किल्ला, 
      सहा साल लढला 
      अशी हातघाई
     मुघलांनी करुनि जिहाद ,
     नाही दिली दाद 
     रामे बादशाही ।।

11लढवून भव्य हा किल्ला , 
    उतरुनि गेला राजा पावसात
     निश्चये करुनि प्रचंड ,राखली 
     खिंड नाही केला घात ।।

12 शिलाहार बांधती दुर्ग, 
     भासे जो स्वर्ग असा घेरिया
     हेलियमचा लावूनी शोध ,
     घेतसे बोध कुणी अवलिया ।।

13 पाकळ्या असती या सोळा, 
  मधोमधे गोळा असे हिरण्याचा 
      देखणे भोवती तळे ,
सिद्ध योग बळे प्रदेश पुण्याचा ।।

14 वेली घनदाट, असे हा घाट  
      दगडी रांजण 
       बैलांचे दिसती तांडे, स्वेद 
       जरी सांडे तुडवती जन ।।

15 आकाशी जातसे कळस, 
      मंदिरी पळस कडा अनुल्लंघ
      चढताना लागते धाप ,
      होई अनुताप तरी मन दंग ।।

16 वारेवा खोल किती कडा, कोकणी पडा लागु  नये नजर 
     रोहिदास तारामती जोडी,  
     शिखरे खडी दिसे इंद्रवज्र ।।
      
17 रुधिराने सिंचली माची, रणकार्याची लावली बाजी
 तुटले जरी किती , माळेतील 
 मोती राज्याचे काजी

18 कातळा करुनिया भंग , उभा तुरुंग सात हौदांचा 
 असह्य सुळका , ये न कुणा पुळका राजकैद्यांचा ।।

19 रानात वेढती रिस, जिथे रात्रं दिस तेलीणी सोटा
 जाहला बापू का खस्ता, काढता रस्ता सांभाळी कासोटा ।।

20 पायथ्याशी याच मैदानात, राव आणि पंत पराक्रमी सक्ती 
 घेतला मोठा हा घास ,मुघली इखलास पराजय प्राप्ती ।।
...SSS...

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...