Monday, January 9, 2023

मी मिसेस कोरोना....

 *मी मिसेस कोरोना* 

*=============*
       *मी मिरवणार अन्*
 ‌‌ *समद्यांची जिरवणार...😀*

Audi बी जागेवर.. मर्सिडीज बी जागेवर ...
मोर लांडोर नाचताहेत त्यांच्याच टपावर.. 
Five star वाल्यांची बोलतीच बंद तर ..
 मी मिऱ्या वाटणार राजकारण्यांच्या डोक्यावर.. 
     *मी मिरवणार अन्*
          *समद्यांची जिरवणार... 😀*

गरीब श्रीमंत एकत्र जेवणार.. 
जात पात न जुमानता प्रेतं एकत्र जळणार.. 
भाजी पाल्यासाठी रांगच रांग तर ...
मेड आहेत म्हणून मिरवणाऱ्या धुणी भांडी करणार ..
सगळा माज इथच उतरवणार ...
     *मी मात्र मिरवणार अन्*
 ‌‌‌ *‌‌‌समद्यांची जिरवणार..😀.*

दाग दागिने .. कपडे कपाटातच रडणार.... 
चड्डी न बरमुडा गालातच हसणार.. 
लुबाडलेल्या जमिनी हिरव्यागार होणार.. 
स्वच्छ आभाळ वसुंधरेच्या प्रेमात पडणार.. 
घाबरून समदे घरातच बसणार...
       *मी मात्र मिरवणार अन्*
           *समद्यांची जिरवणार..😀*

हिरो हिरोइनचा मेकअप उरवणार.. 
सेलीब्रिटी म्हणवणार्याना फरशी पुसाया लावणार.. 
किटी पार्टीवाल्या पोळ्या लाटणार
 आणि नेल स्पा वाल्या झाडु पोछा करणार...
      *मी मात्र तोऱ्यात मिरवणार अन्*
  ‌‌‌‌ *तुम्हा समद्यांची जिरवणार..😀*

दारु वाले सरबत पिणार.. 
पिझ्झा वाले भाकरी खाणार...
वाढदिवस साजरे घरातच होणार.. 
      *मी मात्र नाकावर टिचुन मिरवणार अन्* 
 ‌‌ *तुमच्या समद्यांची जिरवणार..😀*

नद्या नाले हसणार.. 
फुलं पानं बहरणार.. 
प्राणी पक्षी नाचणार ...
 पैसा संपत्ती जागेवर राहणार.. 
          *मी मात्र मिरवणार आणि*
 ‌ *तुमची चांगलीच जिरवणार..😀😀😀😀😀😀*

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...