Sunday, January 22, 2023

---कोणासाठी तरी देव बना--


*अजूनही किती महीने कोरोनाचा कहर चालेल माहित नाही सुरूवातीला काही दिवस सहजतेने गेले आणि आता *संयमाचा बांध सुटत चालला आहे* एकमेकांना फोन करून *उधार उसनवारी* दिलेले पैसे मागायला सुरूवात झाली आहे, कोणी *व्याज* मागतोय तर कोणी राहत्या घराचे, व्यवसायाच्या जागेचे भाडे मागतोय ..
 *इतके दिवस थांबलो आता नाही थांबणार असे फोन सुरू झालेत* 
पण कोणाचं काहीच सुरू नाही मग मित्रांनो तुम्ही ज्याच्याकडे मागताय *तो देणार कोठून?* हा विचार आपण केलाय का? 
तो जिथ जगतोय तिथेच आपणही आहोत.
 *जे संकट त्याच्यावर आहे तेच तुमच्यावर आहे.* 
चूक कोणाचीच नाही *निर्सगाने* सर्वावर सारखीच *अवकृपा* केली आहे. थोडा माणुस म्हणून विचार करा जो आजारातून वाचेल तो ताण सहन नाही झाला तर *आत्महत्या* करेल *कोणाच्याही कुटुंबाला उध्वस्त करण्याचे पाप करू नका.* 
जगला वाचला तर आज ना उद्या देईल पैसे पण *माणूसकी हरवू नका* एवढीच विनंती आहे. 
आजारपण, मुलांच्या शाळा, बँकेचे हप्ते, जागेचे भाडे, टॅक्स, शेताचा खर्च, गावाकडे पाठवावे लागणारे पैसे, अनेक समस्या आहेत पण यासर्वातुन पुन्हा उभे रहावे लागेल... एकमेकांच्या मदतीने. 
ज्याच्या कडे तुमचे पैसे आहेत तो क्षणभर *मेला* असा विचार करा व त्याला संधी द्या. इतक्या वर्षाचे *संबंध क्षणात तोडू नका* हे दिवस *जगवण्याचे व जगण्याचे* आहेत. 
अनेक लोकांशी बोलताना जाणवतंय की ते आतून हललेत आणि *धास्तावले* आहेत. 
कस जगायचं यापेक्षा *लोकांना तोंड कसं द्यायचे* हाच विचार प्रत्येकजण करतोय. 
*माणसाचा जन्म मिळालाय गिधाडे होऊन विचार करू* नका या परिस्थितीत स्वतःला व इतरांना *सांभाळून घ्या* तो
माणूस तुमचे उपकार आयुष्यात कधीच विसणार नाही. 
*व्यवहार कोणालाही चुकला नाही* व चुकणारही नाही
 *देवांनीही देऊळ बंद केलेय* आता तुम्ही त्याचे काम करा कोणासाठी तरी देव बना कदाचीत देवालाही हेच अपेक्षित असेल.. *माझ्या दारात इतके दिवस येणारा माणूस खरच माणूस झालाय का हेच* अपेक्षित असेल त्याला. 
नाहीतरी तो हिशोब ठेवणारच आहे सर्वांचा. 
*मदत व सेवा हेच देवाचे दुसरे रूप* आहे....

*स्वतःची व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या, आपल्यामुळे कुणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या व तसे वागा*🙏

🙏🌳🙏🌳🙏🍁🌳🙏🌳🙏🌳

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...