1. कारमध्ये 3 व्यक्ती बसले असतील तर त्यांना कोरोना पकडणार नाही, पण कारमध्ये चौथा व्यक्ती बसला तर कोरोना त्याच्याकडे आकर्षित होतो 

2. बसमध्ये बसलेले 30 व्यक्ती सुरक्षित असतात एकतीसावा व्यक्ती कोरोनाचा वाहक असु शकतो 

3. दुचाकी वर मागील व्यक्ती हा कोरोनाच्या निशाण्यावर असु शकतो, पुढचा व्यक्ती सुरक्षित असतो 

4. कोरोना संध्याकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत फिरत असतो 

5. रविवारी कोरोना खुप सतर्क असतो
इतर दिवशी आराम करतो
इतर दिवशी आराम करतो6. तुमच्याकडे पास असेल तर तुम्ही एका झोन मधून दुसऱ्या झोन मध्ये जाऊ शकता, कोरोना तुम्हाला काहीच करत नाही कारण तुमच्याकडे पास असेल, तुमच्याकडे पास नसेल तर कोरोना तुम्हाला पकडणार म्हणजे पकडणार. 

7. जर तुम्ही हॉटेल मध्ये बसुन जेवत असाल तर कोरोना तुम्हाला पकडणार आणि जर रांगेत उभे राहुन पार्सल घेऊन घरी जेवले तर कोरोना तुम्हाला पकडणार नाही 

8. जर तुम्ही रांगेत उभे राहुन दारू घरी जाऊन पिले तर कोरोना वाईट वाटून घेणार नाही पण तुम्ही एकाद्या बार मध्ये बसुन दारू पिले तर कोरोना वाईट वाटून घेतो
9. श्रीमंतांच्या लग्नाला थोडेफार जास्त लोकं आली तर कोरोना वाईट वाटून घेत नाही पण गरिबाच्या लग्नाला 50 चे 51 जरी झाले तर कोरोना वाईट वाटून घेतो
म्हणून सावधान रहा, सुरक्षित रहा, घरी रहा आणि काळजी घ्या...





========================================================
*"कोरोनाची सत्यता आणि लॉकडाऊनचे खुले रहस्य"*
भांडवलदारांच्या हिताकरीता नवीन आर्थिक योजना राबविण्यासाठी डब्ल्यूएचओ मार्फत कोरोना आणि लॉकडाउन षडयंत्र रचले गेले हे आता स्पष्ट झाले आहे. पुढे काही महत्त्वाचे आणि भक्कम पुरावे देण्यात आले आहे, जे कोरोना षडयंत्राची पोलखोल करण्यासाठी पुरेसे आहेत. हे पुरावे राष्ट्रीय स्तरावरील संस्था, आरोग्य तज्ञ संशोधकांनी केलेल्या अभ्यासावर आधारित असून हे असे Authentic आणि वास्तविक पुरावे आहेत ज्यामुळे जगभरातील सुज्ञ लोकांनी कोरोनाच्या षडयंत्राविरोधात आवाज उठवला आहे.
#1] "कोरोना हा एक कॉमन कोल्ड आहे. कॉमन कोल्ड म्हणजे साधा सर्दीचा आजार!" श्वसनमार्गाच्या ओलसर त्वचेला सूज येणे, नाक वाहणे, शिंका येणे, घसा खवखवणे, खोकला होणे इत्यादी या आजाराची मुख्य लक्षणे दिसतात. अनेक ग्रंथामध्ये त्याची ओळख कॉमन कोल्ड या नावाखालीच दिलेली आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त मेडिकल न्युट्रीशनिस्ट डॉ.बिश्वरुपराय चौधरी म्हणतात, हा आजार आतापर्यंत अनेकांना कितीतरी वेळा होऊन गेलेला असेल. लहाणपणापासून आपल्याला अनेकदा ताप आला आहे, त्यात कधी ना कधी कोरोना व्हायरसमुळे आलेला सर्दी ताप देखील होता. आणि कित्येकांना या विषाणूची लागण होऊनही काहीच लक्षणे न दिसल्याने आपोआप बराही झालेला असेल. सामान्य सर्दी आपल्याला ज्या प्रकारच्या व्हायरसमुळे होते. यापैकी 75% राइनोव्हायरसमुळे तर उर्वरित कोरोनाव्हायरसमुळे होते. कोरोनाव्हायरस हा एक फ्लू व्हायरस आहे म्हणजे तो संक्रमित होणारा आहे. मात्र जवळचा संपर्क असल्याशिवाय एखाद्या व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीकडे तो सहज जात नाही.
अर्थात, कोरोना हा इतर सामान्य आजारांसारखा एक सर्दीचा आजार आहे.
#2] ब्रिटन सरकार अंतर्गत न्यु अँड एमर्जिंग रिस्पेटरी व्हायरस थ्रेड ॲडव्हायजरी हा एक गृप असून त्यांची कमिटी आहे जीचे नाव ACDP म्हणजे द ॲडव्हायजरी कमिटी ऑन डेंजरस पॅथोजेन्स असे आहे. यात 16 वैज्ञानिक आहेत. एखादा व्हायरस किती परीणामकारक असेल याचा अनुमान काढणे या ॲडव्हायजरी कमिटीचे काम आहे. या कमिटीने असे सांगितले होते की, कोरोनामुळे पुढील चार महिन्यांत USA मध्ये 22 लाख तर UK मध्ये 5 लाख व भारतात 23 लाख लोक मेलेले असतील. अनेक देशांच्या अशा कमिट्या आहेत व त्यांच्याही कोरोनाविषयी शिफारशी असताना WHO ने केवळ याच कमिटीची शिफारस स्विकारली. (महामारी घोषित करण्यासाठी WHO ला तीच अपेक्षित असावी.) त्या कमिटीच्या शिफारशी वरुनच WHO ने कोरोनाला महामारी घोषित केले. तसेच लॉकडाऊन, स्टे ॲट होम, क्वारंटाईन.. इत्यादी प्रोटोकॉल बनविला. परंतु याच ॲडव्हायजरी कमिटीला जानेवारी 2020 मध्ये आपला अनुमान चुकल्याचे आढळले. सुरुवातीला कोरोनाव्हायरसला खतरनाक मानून त्याची HCID अर्थात हाय काँसिक्वेंंसेस इन्फेक्शस डिसीज ही कॅटेगरी ठरविण्यात आली होती. मात्र आता हा व्हायरस HCID कॅटेगरीत ठेवण्याइतका घातक नसून तो साधारण फ्लू असल्याचे मान्य करण्यात आले आणि कमिटीकडून चुक सुधारण्यात आली आहे. आता भारतासारख्या देशांमध्ये लॉकडाउनला आधार काय राहिला? प्रत्येक देशांप्रमाणे भारतात कोणतीही हेल्थ ॲडव्हायजरी कमिटी नाही त्यामुळे याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयच निर्णय घेते. हे मंत्रालय कोणतीही शहानिशा न करता WHO चे अंधपणे पालन करते. त्यामुळे कोरोना बाबतीत शासनाचे अनेक निर्णय तथ्यहिन असल्याचे सिद्ध होत आहेत.
अर्थात, कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय WHO ने कोरोनाला महामारी म्हणून कायम ठेवले आहे.
#3] 16 एप्रिलची टाइम्स ऑफ इंडियातील बातमी बघा, खुद्द डब्ल्यूएचओने देखील मान्य केले आहे की, कोरोनाव्हायरस मुळे होणारा आजार हा महामारी पसरण्या इतका भयंकर नाही. जितका की तो सुरुवातीला सांगण्यात आला होता. त्यात मृत्यूचे प्रमाण तेवढेच आहे जितके की सर्वसाधारण तापात असते.
अर्थात, पसरविण्यात आलेली कोरोनाची भीती ही केवळ एक भ्रम आहे याशिवाय काही नाही.
#4] सर्वात मोठे वास्तव असे की, इटलीच्या नॅशनल हेल्थ ऑथोरिटी ऑफ इटली या संस्थेने आपला 'न्यु डेेथ रिपोर्ट ऑफ कोविड-19 पेशंट्स इटली स्टडी' हा रिपोर्ट 17 मार्च रोजी प्रसिद्ध केला. त्यानुसार, इटलीत कोरोनोवायरसने मेलेल्या लोकांपैकी 99% पेक्षा जास्त लोक असे होते की जे इतर आजाराने पीडित होते असे म्हटले आहे. या संस्थेने देशातील कोरोनो बाधित मृत्यूंपैकी सुमारे 18% लोकांच्या वैद्यकीय नोंदी तपासल्या, ज्यामध्ये असे आढळले की केवळ 0.8 टक्के म्हणजे 3 लोकांना पूर्वीचा कोणताही आजार नव्हता. आणि ते स्पष्टपणे कोविड-19 मुळे मरण पावले आहेत. मेलेल्या निम्म्या व्यक्तींना कमीतकमी दोन-तीन पूर्वीचे आजार होते. तर 75 टक्के पेक्षा जास्त जणांना उच्च रक्तदाब व 35 टक्के लोकांना मधुमेह आणि हृदयविकाराचा त्रास होता. संक्रमित लोकांचे सरासरी वय 63 आहे परंतु मरणाऱ्यांपैकी बहुतेक हे 80 च्या वयाचे असल्याचे या अभ्यासात दिसून आले.
अर्थात, इटलीत झालेल्या ज्या मृत्यूंचा प्रचार कोरोनाच्या नावाने केला गेला ते मृत्यू इतर आजारांमुळे झाले होते.
#5] चीन मधील वास्तव हे आहे की, CCDC ने 17 फेब्रुवारी रोजी चीन मधील संशोधकांचा अहवाल, चायनीज जर्नल ऑफ एपिडिमियोलॉजीमध्ये प्रकाशित केला. त्यानुसार, संक्रमितांपैकी सुमारे 80.9 टक्के कोरोना रुग्ण हे सौम्य प्रकारचे म्हणून वर्गीकृत करण्यात आले, तर 13.8 टक्के तीव्र स्वरुपाचे, आणि केवळ 4.7 टक्के असे की ज्यांना आधीच्या आजारासोबतच इतर रोगाचा सर्वाधिक धोका आहे, ते गंभीर म्हणून वर्गीकृत केले. म्हणजेच केवळ 20 टक्के लोकांनाच रुग्णालयात उपचारांची आवश्यकता आहे. बाकी 80 टक्के संक्रमित व्यक्तींना सौम्य लक्षणे दिसतात, जे स्वत: घरी बरे होऊ शकतात. सर्वाधिक मृत्यू दर 80 किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये आढळला, जे 14.8 टक्के आहे. एकूणच कोरोना विषाणू मुळे मृत्यूचे प्रमाण फक्त 2.3 टक्के इतकाच होते.
अर्थात कोरोना एक सामान्य आजार आहे असे हा रिपोर्ट सांगतो.
#6] एखादी व्यक्ती कोरोना बाधित आहे की नाही हे समजण्यासाठी जी टेस्ट केली जाते तिला rt-PCR टेस्ट म्हणतात. सरकार कोरोना बाबतीत ज्या अमेरिका सरकारच्या cdc.gov साईटचा संदर्भ देऊन माहिती देत असते, त्या वेबसाईटवर स्पष्टपणे लिहिलेले आहे की, rt-PCR टेस्ट कोरोना व्हायरस ओळखू शकेल की नाही हे अजूनही प्रमाणित नाही. शिवाय rt-PCR टेस्ट किटच्या मॅन्युअल मधील पहिल्याच पानावर उल्लेख करण्यात आलेला आहे की, या टेस्टचा हेतू केवळ संशोधना पुरताच असून आजाराचे निदान करण्यासाठी नाही. विशेष म्हणजे ही टेस्ट पूर्णपणे दोषरहित नाही. त्यामुळे या टेस्ट मध्ये अनेक रुग्णांचा रिपोर्ट चुकुन खोटा म्हणजे फॉल्स पॉझिटिव्ह येण्याची शक्यता ही तब्बल 1 ते 80 टक्के इतकी आहे. म्हणजेच ज्या लोकांना कोरोना लागण झालेली नाही अशा लोकांनाही ही टेस्ट पॉझिटिव्ह दाखवू शकते. म्हणूनच cdc.gov सुद्धा या टेस्टच्या प्रमाणतेबद्दल हमी घेत नाहीये. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे या टेस्टचे संशोधक कॅरी म्यूलस यांनी 1985 मध्ये या टेस्टचा शोध लावला. ज्यासाठी त्यांना नोबेल पुरस्कार देखील मिळाला. ते म्हणतात की, "ही टेस्ट कुणाही व्यक्तीच्या शरीरात व्हायरस आहे की नाही याचे निदान करण्यासाठी बनवलेली नाही, तर ही टेस्ट केवळ एचआईव्ही आणि इतर व्हायरसच्या जेनेटिक्स सीक्वेंसचे संशोधन करण्याच्या उद्देशाने बनवलेली आहे."
अर्थात, मेडिकल टेस्टची पॉझिटिव निगेटिव घोषित आकडेवारी अगदी संशयास्पद आहे.
#7] अखेर आफ्रिकेतही सत्य समोर आलेेच. नुकतेच 3 मे 2020 रोजी, आफ्रिकेतील टांझानिया देशात कोरोना प्रकरणांची आकडेवारी अचानक वाढली. यावर टांझानियाचे अध्यक्ष जॉन मगूफुली यांना संशय आल्याने त्यांनी गुप्तपणे बकरी आणि पपई सारख्या फळाचे नमुने टेस्टसाठी लॅबमध्ये पाठवले. तेथे बकरी आणि पपईचे फळ कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आला. आणि हे सिद्ध झाले की देशातील अनेक पॉझिटिव्ह कोरोनाव्हायरस टेस्ट बनावट आहेत. त्यामुळे मगुफुली यांनी देशातील कोरोनाव्हायरस टेस्ट किटचे परिणाम बनावट म्हणून रद्द केले. तसेच देशात लॉकडाउन होणार नाही असे जाहीर केले.
अर्थात, आपण स्वत: तर्कबुद्धीचा उपयोग केला तर कोरोनाची चोरी पकडली जाऊ शकते.
ज्या माहितीच्या आधारे डब्ल्यूएचओने कोरोनाला महामारी घोषित केले आणि प्रोटोकॉल बनवले, ती माहितीच चुकीची ठरली असताना देखील डब्ल्यूएचओने आपला प्रोटोकॉल कायम का ठेवला? भारत सरकारने याच चुकीच्या माहितीच्या आधारे लॉकडाउनचा निर्णय जनतेवर लादला आणि जनतेला भयंकर धोका दिला, तसेच देशाचे आणि नागरिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान केले. आता ही बाब अगदी स्पष्ट होत आहे की, कोरोना आणि लॉकडाऊनचे वातावरण केवळ भांडवलदारांच्या हितात नवीन आर्थिक योजनांना लागू करण्यासाठी बनविण्यात आले आहे. यासाठी सरकार विरोधात नागरिकांनी तसेच सामाजिक संघटनांनी जनहित याचिका किंवा अन्य कोणती संविधानिक कारवाई करता येईल याबाबत आज ना उद्या विचार करावा लागेल.
"वास्तविक सत्य अनुसरा व आर्थिक राजकारणाच्या पाखंडी भ्रमातून..भयातून मुक्त व्हा..!"
संकलक- जर्नालिस्ट हर्षद रुपवते(संदर्भ : आर्टिकल- कोरोनाची षडयंत्रकारी क्रोनोलॉजी)
No comments:
Post a Comment