चला ‘सीड बॉल’ तयार करूया,धरतीला हिरवेगार बनवूया...
*काय आहे सीड बॉल?*
कोणत्याही प्रकारच्या बियाणांना माती आणि शेणखताच्या सहाय्याने गोळे तयार करून सुरक्षित करणे म्हणजे सीड बॉल होय.
*सीड बॉलचा उपयोग काय?*
सीड बॉलचा उपयोग करून टेकडी, मोकळी मैदाने आदी ठिकाणी हिरवळ/वन/वनराई तयार करता येऊ शकते. आतापर्यंत जांभळ, आंबा, सीताफळ, कडुलिंब, करंज आदी प्रकारातील झाडाच्या बिया साठवून त्या मोकळ्या मैदान अथवा टेकडीवर फेकल्या जात होत्या. मात्र त्यामुळे या बिया पावसामुळे वाहून जाण्याचा धोका होता. आता सीड बॉलमुळे या बिया वाहून न जाता मातीमुळे त्या जमिनीला घट्ट चिकटून राहतात. पाऊस आल्यानंतर या बिया वाहून न जाता उगविण्यास मदत होते.
मागील वर्षी पायलट प्रोजेक्ट हाती घेऊन आपण सीड बॉल तयार केले होते. ज्याठिकाणी आपण हे सीड बॉल फेकले होते त्या ठिकाणी भेट दिली तेव्हा यातील बहुतांश झाडे आली आहेत हे दिसले. त्यामुळे आत्मविश्वास वाढला. या उपक्रमात लहानमोठ्या सर्वांनी सहभागी व्हावे ही काळाची गरज आहे. खेळत-खेळत नाते निसर्गाशी जोडले जावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्याचबरोबर पर्यावरणाचेही रक्षण होईल. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने यात सहभाग घ्यावा.
*तुम्हीही व्हा सहभागी*
सीड बॉल तयार करण्याच्या उपक्रमात शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, त्यांचे पालक, सामाजिक संस्था, निसर्गप्रेमी, सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, उद्योजक, डॉक्टर, वकील, पत्रकार आदी विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांचे स्वागत आहे.
*कोणाला देणार हे सीड बॉल..*
१. सायकल ग्रुप
२. ट्रेकर ग्रुप
३. शाळा आणि महाविद्यालय
४. कॉर्पोरेट कंपन्या आणि औद्योगिक वसाहती
५. शेतकरी
६. तुम्ही स्वतः हे सीड बॉल विविध ठिकाणी ठेवू शकता.
अधिक माहितीसाठी अक्षर मानव पर्यावरण विभागाशी संपर्क करावा.
- अरुण मापारी
8888022099
राज्य पर्यावरण विभागप्रमुख, अक्षर मानव
No comments:
Post a Comment