> *तलवार नको तराजू व तंत्रज्ञान घ्या कारण वाढती महागाई सर्वसामाण्याना जगू देणार नाही.*
------> *आज पैसा नाही कमावला तर,...उद्या नष्ट व्हाल!*
°----------------^-----------°
गेली ७५ वर्षे :
देश स्वतंत्र झाल्यापासून मराठी माणसाने तलवारीची भाषा केली, व्यापार व तंत्रज्ञानाकडे कधीही लक्ष दिले नाही. फक्त पोटाची खळगी भरण्यासाठी नोकऱ्या केल्या. याउलट बाकीच्यांनी व्यापार व तंत्रज्ञानाचा वापर करून संपत्ती निर्माण केली, महाराष्ट्रात जमिनी जागा विकत घेतल्या. आणि टोलेजंग इमारती बांधल्या किती टक्के मराठी लोक त्यात राहत आहेत आणि बाकीचे जे राहत आहेत त्यांच्या तीन पिढ्या ,१८० मधेच गेल्या
आज मुंबईत फक्त २% प्रॉपर्टी कार्डवर मराठी माणसाचे नाव आहे, ९८% जमिनी विकल्या गेल्या आहेत.
गेली ७५ वर्षे तलवारीची भाषा व महाराजांची घोषणा करून आपण काय मिळवले? हा विचार करा; कारण छत्रपतींच धोरण आम्हाला कधी समजलंच नाही किंबहुना महाराज आम्हाला कधी कळलेच नाहीत आणि आम्ही तसा प्रयत्न देखील केला नाही. कारण महाराजांन कडे काही नसताना अभेद्य असे जल दुर्ग गडकोट आरमार उभर ते कसं?
पोरांना नोकऱ्या नाहीत... दुष्काळ पडला, पैसा नाही... शेतकरी आत्महत्या करतोय... व्यापार तर दूरची गोष्ट...
म्हणजे गेल्या ७५ वर्षात आमची इतकी अधोगती झाली आहे की, विचारू नका *मित्रहो, कुठेतरी खूप मोठी चूक होत आहे.*
*तलवार :*
काळ बदलला आहे. तलवार, हिंसाचार व स्थानिक मसल पॉवरने राज्य, सत्ता, संपत्ती मिळवण्याचे व राखण्याचे दिवस केव्हाच निघून गेले. तलवारीची भाषा करणारे मुंबई बाहेर फेकले जात आहेत, मुंबईत त्यांची संख्या कमी होत आहे. तलवार पेलण्यासाठी पहिले पोट भरलेले असावे लागते हे आपण विसरलो. त्यामुळे आज पोट भरण्यासाठी मुंबई सोडून विरार, कल्याण, अंबरनाथला राहून मुंबईला लोकलचे धक्के खावून टुकार नोकऱ्या करण्याची वेळ आली आहे.
*तराजू :*
ज्यांनी तराजू हातात घेतला, छोटे मोठे व्यवसाय सुरू केले मग तो रद्दीचा व्यवसाय असो, किराणा दुकान असो, पाणीपुरी असो... तेच लोक पुणे, मुंबईतील जागा आढवून संपत्तीचे मालक झाले. त्यातलेच काही लोक मोठे उदयोजक, व्यापारी, बिल्डर्स झाले. मुख्य मुंबईतील म्हणजे नरीमन पॉईंट, अंधेरी, बांद्रा इत्यादी ठिकाणी ९९% हून अधिक संपत्ती व सत्ता तराजूवाल्यांची आहे.मग आपण मागे का राहिलो?
*तंत्रज्ञान :*
ज्यांनी तंत्रज्ञानाची कास धरली, त्यांनी जबरदस्त उडी घेतली व जगावर अधिराज्य गाजावायला सुरुवात केली. इथून पुढील दिवस त्यांचेच असतील. उदा. फेसबुक, गुगल, व्हॉटसअप, फ्लिपकार्ट इत्यादीची संपत्ती आज अरबोंच्या घरात गेली. तंत्रज्ञानातून प्रभावी माध्यम निर्माण करून आपल्या नाड्या त्यांनी त्यांच्या हातात घेतल्या. आज आपले माहिती स्वतंत्र त्यांच्या हातात आहे.
*अस्तित्व :*
*मित्रहो, आज जर आपल्याला आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर तलवारीची भाषा सोडा, चांगले शिक्षण घ्या ,तराजू हातात घ्या. व्यापार व व्यवसायाची कास धरा, पैसा कमवल्याशिवाय गत्यंतर नाही. आज पैसा नाही म्हणून मुंबईच्या बाहेर फेकला गेला आहात, उदया नष्ट व्हाल.*
मराठी माणसाने विचार करण्याची वेळ आहे .
No comments:
Post a Comment