सुखामागे धावता धावता विवेक पडतो गहाण
पाण्यात राहून माश्याची मग भागत नाही तहान
स्वप्न सत्यात आणता आणता दमछाक होते खूप
वाटी वाटीने ओतलं तरी कमीचं पडतं तूप
बायका पोरांसाठी चाललाय म्हणे हा खेळ
पैसा आणून ओततो पण मागू नका वेळ
करियर होतं जीवन मात्र जगायचं जमेना तंत्र
मुलं म्हणती बाप म्हणजे पेसा छापायचं यंत्र
चुकून सुट्टी घेतली तर स्वतः पाहुणा स्वतःच्याच घरी
दोन दिवसच कौतुक होतं नंतर होते डोकेदुखीच सारी
क्षणिक औदासीन्य येतं, मात्र पुन्हा सुरु होतं चक्र
करियर करियरचं दळण दळता स्वाथ्य होत वक्र
आयुष्याच्या संध्याकाळी मग जाणवू लागतं काही
सुखामागे धावता धावता श्वासच मुळी घेतला नाही
सगळं काही पाहताना आरश्यात पहायचं राहूनच गेलं
सुखाची तहान भागवताना समाधान दूर वाहून गेलं ...
No comments:
Post a Comment