Sunday, December 11, 2022

 🌺

*गढुळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा,*
*त्याला शांत राहू द्या,*
*गाळ आपोआप खाली बसतो.*
*तसेच जीवनात कितीही ताण तणाव असले,*
*तरी डोकं शांत ठेवा...*
*मार्ग नक्कीच निघतो.*
*जीवनात मागे बघाल,*
*तर अनुभव मिळेल,*
*पुढे बघाल तर आशा मिळेल,*
*आजूबाजूला बघाल,*
*तर सत्य मिळेल,*
*आणि अंतर्मनात बघाल,*
*तर आत्मविश्वास मिळेल.*
*वाद घालायचाच ठरवला तर,*
*छोट्यातल्या छोट्या गोष्टीवरही वाद घालता येऊ शकतो.*
*पण समजून घ्यायचेच ठरवले,*
*तर मोठ्यातली मोठी गोष्टही समजून घेता येऊ शकते.*
*दगड तोपर्यंत सुरक्षित राहातो,*
*जोपर्यंत तो डोंगराबरोबर राहातो.*
*पान तोपर्यंत सुरक्षित राहाते,*
*जोपर्यंत ते झाडाबरोबर राहाते.*
*आणि माणूस तोपर्यंत* *सुरक्षित राहातो,*
*जोपर्यंत तो कुटुंबाबरोबर राहातो.*
*कारण...*
*कुटुंबातून विभक्त होऊन,*
*स्वातंत्र्य तर मिळते...*
*पण संस्कार मात्र लोप पावतात !!*
*चांगली माणसं आपल्या जीवनात येणं,*
*हे आपली "भाग्यता"असते.*
*आणि त्यांना आपल्या जीवनात जपुन ठेवणं,*
*हे आपल्यातली "योग्यता"असते !!*

                  🙏🏻🌹🙏🏻

🌺 

*एखादा माणूस माझ्या मनातून उतरला की,*
*मी आयुष्यभर त्याच्याकडे ढुंकूनही बघणार नाही.*
*ह्या अशा स्वतःच्या ग्रेट स्वभावाचा,*
*काही लोकांना प्रचंड गर्व असतो,*
*म्हणूनच हा मेसेज मला सगळ्यांबरोबर शेअर करावासा वाटला.*
*कधी तरी निवांत बसून आयुष्यात येऊन गेलेल्या,*
*आणि दुरावलेल्या नात्यांचा,*
*डोळसपणे अभ्यास केला की,*
*लक्षात येतं की,*
*असे अनेकजण ज्यांनी,*
*आपल्याला दुखावलं म्हणून,*
*आपल्या आयुष्यातून,*
*आपण त्यांना वजा केलं होतं,*
*ते अनेकदा समर्थनीय नव्हतंच !*
*भावना दुखावल्या,*
*असं म्हणत आपण आपल्या अहंकाराला,*
*विनाकारण जोपासत बसलो,*
*आणि सोन्यासारखी माणसं,*
*आपल्या प्रतिक्षेला कंटाळून,*
*आपापल्या मार्गे निघूनही गेली.*
*त्यांची एखादी कृती चूक,*
*हा जणूकाही जन्म-मरणाचा प्रश्न बनवून,*
*ती हकनाक आपल्या अहंकाराची बळी कधी झाली,*
*हे कळलंच नाही.*
*आपण जसे-जसे परिपक्व होत जातो,*
*तसं तसं लक्षात येतं की,*
*भावना आणि अहंकार ह्यांच्यात असलेली सूक्ष्म रेषा,*
*योग्य वेळी जाणून वागायला हवं होतं.*
*त्या माणसांनी आपल्यासाठी,*
*केलेल्या चांगल्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या होत्या.*
*स्वतःच्या चुकासुद्धा आठवून,*
*निदान स्वतःशी तरी मान्य करायला हव्या होत्या.*
*भावना क्षमाशील असते,*
*तर अहंकार मात्र एक घाव दोन तुकडे करून मोकळा होतो.*
*भावना दुखावली,असं आपण म्हणतो,*
*तेंव्हा खूप वेळा भावना नाही,*
*तर अहंकार दुखावलेला असतो !*
*अगदी एखादी आनंदाची बातमी जरी कुणी आपल्याला उशिरा दिली,*
*तर त्या गोष्टीचं दुःख आणि राग म्हणून,*
*त्यांचं अभिनंदनही आपण केलेलं नसतं,*
*आणि हे अनेकदा घडतं.*
*जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं नसतं,*
*तर त्या जगण्यालाही स्वतःचं असं वेगळं रूप,*
*आणि अस्तित्त्व असतं.*
*कुणाचंच कुणावाचून काही अडत नाही,*
*पण आयुष्यात आलेली चांगली माणसं,*
*जेंव्हा गैरसमजुतींमुळे दुरावतात,*
*तेंव्हा मात्र जर ती माणसं आपल्या आयुष्यात राहिली असती,*
*तर जगणं अजून सुंदर,*
*आणि अर्थपूर्ण झालं असतं,*
*असं मात्र नक्कीच वाटून जातं.*
*क्षणभंगुर आयुष्याचे लाड करताना,*
*आपल्या जगण्याचा दर्जा आपण राखायला हवा,*
*आणि ह्यासाठीच ते जगणं सुसंस्कृत,*
*आणि अर्थपूर्ण बनवणाऱ्या,*
*चांगल्या माणसांची ओळख,जोपासना करणं,*
*आणि अहंकारामुळे त्यांना न गमावणे,*
*हे जाणीवपूर्वक आपण करावं,*
*असं मनापासून वाटतं.*
*बऱ्याचदा तर समोरच्या* *व्यक्तिच्या वागण्याचा आपण आपल्या मतानुसार अर्थ काढतो,*
*तसा विचारही समोरच्याचा नसतो,*
*तो सहज आपलं म्हणून वागत असतो,*
*परंतु आपण चुकीचा अर्थ काढून,*
*समोरच्याला आयुष्यातून सहज काढून टाकतो,*
*अन् आपला अहंकार आपल्याला,*
*या गोष्टीची जाणीवही होऊ देत नाही.*
*म्हणून...*
*कुणाची कितीही मोठी चूक असली,*
*तरी ती आयुष्यापेक्षा,*
*व नात्यापेक्षा मोठी नाहीच...!!*

                🙏🏻🌹🙏🏻

🌺
*प्रत्येक व्यक्तीने...*
*आपल्या बाबतीत घडणाऱ्या बऱ्यावाईट गोष्टी,*
*परमेश्वराच्या किंवा आपल्या गुरूंच्या इच्छेने होतात,*
*ही जाणीव ठेवावी.*
*म्हणजे त्याला भिती वा दुःख वाटणार नाही,*
*तसेच चांगल्या गोष्टी घडल्या तरी,*
*त्याबाबत आनंदात्तिरेकही होणार नाही.*
*याकरिता सदासर्वकाळ,*
*भगवंताचे चिंतन करावे.*
*आपल्या विचाराने,*
*ठरल्याप्रमाणे झाल्याने सुखच मिळते असे नाही.*
*काही वेळेस...*
*आपल्या विचाराच्या उलट होऊनही,*
*मागाहून तसे झाल्यानेच बरे वाटते.*
*म्हणजे कोणत्याही गोष्टीचे सुखदुःख,*
*तात्काळ कळत नाही हेच खरे.*
*म्हणून जरा वेळ थांबून,*
*सुख किंवा दुःख मानू या.*
*कर्ज फिटताना जसा आपल्याला आनंद होतो,*
*तसा देहभोग भोगताना,*
*आपल्याला आनंद झाला पाहिजे.*
*प्रारब्ध टाळणे म्हणजे,*
*लोकांचे कर्ज बुडविणेच होय.*
*आपला म्हणजे 'मी' पणाचा नाश,*
*आणि प्रारब्धाचा नाश,*
*बरोबर होतोच...!!*

                  🙏🏻🌹🙏🏻

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...