










*विषय मिळवणे...*
*आणि त्या विषयांचा भोग घेणे,*
*हेच खरे जीवन आहे का.?*
*आपण संसारी माणसे,*
*संसारामध्ये जितका प्रयत्न,*
*पैसे मिळवण्याकरता करतो,*
*विषयांच्या प्राप्तीसाठी करतो,*
*मुलगा होण्यासाठी,*
*मानसन्मान,*
*प्रसिद्धी मिळण्यासाठी करतो.*
*तेवढा प्रयत्न...*
*भगवंताच्या प्राप्तीसाठी करीत नाही.*
*जे खरे सुख आहे,*
*त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न न करता,*
*जे दुःख आहे,*
*जे दुःख देणारे आहे,*
*त्या विषयांच्या प्राप्तीसाठी मात्र प्रयत्न करतो.*
*कोणत्याही सांसारिक विषयांनी,*
*कोणीही कधीही सुखी होऊ शकत नाही.*
*कारण...*
*संसारीक विषयामध्ये जर सुखच नाही,*
*तर सुख मिळणार कसे.?*
*जर झोळी भरणे म्हणजे विषय मिळवणे,*
*आणि झोळी खाली करणे म्हणजे,*
*विषय भोगून संपणे,*
*हेच जर जीवन आहे.*
*तर असे जीवन निरर्थक आहे.*
*अशा या जीवनाचा काय उपयोग आहे.?*
*असे समजा रात्री जेवलो म्हणजे,*
*पोटाची झोळी भरली,*
*आणि सकाळी बाथरूमला गेलो म्हणजे,*
*पोटाची झोळी रिकामी झाली.*
*जर ही पोटाची खळगी भरणे,*
*आणि रिकामे होणे हेच जर जीवन आहे,*
*तर अशा जीवनाचा उपयोग काय.?*
*माणसाने अशासाठी जगावे की,*
*आपणाला देवाचे दर्शन व्हावे.*
*त्याकरता त्याने साधन करण्याची गरज आहे,*
*परमार्थ करण्याची गरज आहे,*
*नाम घेण्याची गरज आहे.*
*माणसाने असे ज्ञानी बनावे की,*
*ज्यामुळे त्याला परमात्मा प्राप्त होईल.*
*पण असे ज्ञानी बनू नये,*
*ज्यामुळे विषयांची प्राप्ती होईल,*
*परमार्थ केला पाहिजे.*
*नाम घेतले पाहिजे.*
*आणि नाम घेता घेता जेव्हा भगवंताच्या ठिकाणी प्रेम निर्माण होईल,*
*तेव्हाच आपल्याला जे जीवन मिळाले,*
*त्याचे सार्थक होईल.*
*अशाच जीवनाचा उपयोग आहे,*
*आणि यालाच खरे जीवन,*
*जगणं असं म्हणतात...!!*



*कधी कधी आयुष्यामध्ये,*
*खूप दु:ख यातना सहन कराव्या लागतात,*
*असं वाटतं की, खरचं देव आहे का.?*
*इथपर्यंत शंका येतात,*
*पण खरंतर हीच वेळ,*
*आपल्या परीक्षेची असते.*
*विश्वास ठेवा...*
*इथूनच खेळ सुरू होतो,*
*फक्त विश्वास तुटू देऊ नका.*
*आई बाळाला हवेत भिरकवते.*
*काही क्षण ते हवेत ही असतं,*
*पण ते हसत असतं,*
*कारण...*
*त्याचा विश्वास असतो...*
*कोणी आहे...*
*ते आपल्याला पडू देणार नाही,*
*तोच विश्वास तुमचा परमेश्वरावर हवा.*
*कधी कधी वाटतं,*
*हे शक्य आहे का.?*
*पण हे लक्षात ठेवा,*
*तुम्ही तुमच्या बुध्दिच्या कुवतीवर,*
*शक्य आणि अशक्य ठरवता,*
*पण परमेश्वराला या जगात,*
*अशक्य काहीच नाही.*
*परमेश्वर तेच देतो,*
*जे तुमच्यासाठी योग्य आहे.*
*फक्त तुमचा...*
*त्यांच्यावर विश्वास पाहिजे...!!*



*

No comments:
Post a Comment