Friday, December 16, 2022

 🌺 

*आयुष्यात संगतीला फार महत्त्व असते.*
*संगतीचा परिणाम विनासायास,*
*आणि बराचसा नकळत होत असतो.*
*संतसंगती लाभणे...*
*ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे.*
*ती पूर्वपुण्याईमुळेच लाभते.*
*ज्यांच्याशी आपण संगत करातो,*
*त्याचे गुणधर्म आपल्याला येऊन चिकटतात.*
*देहाच्या संगतीने सामान्य माणसाचेही गुणधर्म आपल्यात येतात,*
*तर संतसंगतीचा परिणाम,*
*किती होत असला पाहिजे ?*
*व्यसनी किंवा विषयी माणसाची संगत,*
*ही अशी तापदायक, घातक असते.*
*"सत्पुरूषाची संगत ही उत्तम,*
*लाभदायी ठरते.*
*संतसंगतीपासून 'सद्‌भावना',*
*आणि 'सद्‌विचार' प्राप्त होतात.*
*आपली वृत्ती अशी असावी की,*
*कुणाला आनंद पाहिजे असेल,*
*तर त्याने आपल्याकडे धाव घ्यावी.*
*इतर संपत्ती कितीही दिली तरी,*
*पुरी पडत नाही,*
*पण वृत्तीचा आनंद देऊन,*
*कधीच संपत नाही.*
*वृत्तीचे समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण आहे.*
*मानवी जीवन हे अशाश्वत आहे.*
*या जीवनात आपले खरे पाठीराखे,*
*जीवलग जर कोणी असतील,*
*तर ते सद्गुरूच होय.*
*ईश्वरच होय.*
*कारण...*
*ते शाश्वत आहेत.*
*मानवी जीवनातील,*
*कोणत्याही प्रसंगातून 'सद्गुरू,*
*आणि प्रभुरामराय हेच माझे सखे सोबती आहेत,*
*याचा साक्षात्कार घडणे,*
*त्याची खात्री पटणे,*
*हे परमार्थाच्या वाटेवर,*
*गती घेण्यासारखेच आहे...!!*

                 🙏🏻🌹🙏🏻

🌺 
*माणसाला सगळ्यात जास्त त्रास,*
*कधी होतो...*
*ज्यावेळी तो नाते टिकविण्याचा,*
*अतिशय प्रयत्न करतो तेंव्हा.*
*त्याला वाटते,*
*आपण समोरच्या माणसाची,*
*प्रत्येक गोष्ट दुर्लक्षित केली,*
*तर वाईटपणा येणार नाही.*
*पण लक्षात घ्या,*
*टाळी कधीही एका हाताने वाजत नाही.*
*समोरची व्यक्ती मानाने कितीही मोठी असोत,*
*ती आपल्याला सन्मानाने वागवत नसेल,*
*तर अशा व्यक्तीला कायमचा,*
*रामराम करणे कधीही चांगलेच.*
*कारण...*
*तरच आपला आत्मसन्मान टिकून राहतो.*
*तसेही अशी 'तथाकथित मोठी' व्यक्ती,*
*आपल्या मित्र परिवारात असून,*
*उपयोग काय,?*
*जर ती कायम आपले खच्चीकरण,*
*करण्याचा प्रयत्न करत असेल?*
*आपण एखाद्या व्यक्तीला मान देतो,*
*याचा अर्थ असा नाही की,*
*त्याच्या सगळ्या गोष्टी बरोबरच असतात.*
*अनेकदा तो मान फक्त त्याच्या वयाचा,*
*नात्याचा किंवा प्रेमाचा असतो.*
*अनेकदा ही मते लोकांना पटत नाहीत.*
*त्यांच्या मते अशी व्यक्ती,*
*अतिशहाणी किंवा गर्विष्ठ आहे.*
*त्यांच्या दृष्टीने तसे असेलही,*
*पण मला वाटते जशात तसे वागणे,*
*गर्विष्ठपणा नसून,*
*आत्मसन्मान आहे.*
*बाकी ज्यांना नावेच ठेवायची,*
*ते नावे ठेवणारच...*
*त्यांना नाशिकच्या भाषेत,*
*'तीन टाईम' उडत लावा.*
*ध्यानात ठेवा,*
*आजच्या काळात,*
*मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवायचे असेल,*
*तर आपल्याला आत्मसन्मानाची जाणीव असणे,*
*जास्त महत्वाचे आहे...!!*

                 🙏🏻🌹🙏🏻

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...