*#कोरोनाच्या_निमित्ताने*
बऱ्याच गोष्टी आपोआपच सिद्ध झाल्या. (ज्या बरेच जण मान्य करायला तयार नसतात.)
जसं :
● आजारापुढे कोणीही लहान/मोठा नाही. तुम्ही कितीही श्रीमंत असा किंवा गरीब ; पंतप्रधान / राष्ट्राध्यक्ष असा किंवा सामान्य माणूस ; राजकारणी असा , व्यावसायिक असा किंवा नोकरदार ; किंवा अगदी डॉक्टरही... आजार तुमच्यासाठी सौम्य होत नाही...
● कोरोनाने सगळ्या जगाला थांबायला भाग पाडलं. त्यामुळे , मी किती / कसा *#बीझी* असतो हा बऱ्याच जणांचा *#दुराभिमान* (अगदी गळून नसला पडला, तरी तो) तसा _'असल्याची'_ जाणीव प्रत्येकालाच झाली.
● *'हॉटेलिंग'* ही जीवनावश्यक गोष्ट नाही , हे पुन्हा सिद्ध झालं. २ महिने आपण आहोतच ना, हॉटेलिंग शिवाय !
● मुळातच आपल्या basic needs खूपच मोजक्या असतात. बाकी आपण ज्यांना आपल्या गरजा समजत असती , त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपण आपल्या सोयीसाठी , मजेसाठी तर काही गोष्टी स्वाभिमान कुरवळण्यासाठी उगाचच वाढवून ठेवलेल्या असतात. आज यातल्या बऱ्याचशा गोष्टी नसतानाही आपण २ महिने काढलेच ना !?!
● दारू सुद्धा जीवनावश्यक नाही हे सिद्ध झालं. शेवटी टॅक्स (की मार्जिन मनी ?) च्या नावाखाली ती पुन्हा सुरू झाली , तो विषय वेगळा.
● कामाच्या रगाड्यात अडकलेल्या बऱ्याच जणांना या लॉकडाऊन मुळे आपले छंद जोपासायला वेळ मिळाला.
● बऱ्याच जणांना आपल्या कुटुंबासाठी वेळ देता आला. एरवी खूप इच्छा असूनही कामामुळे हे शक्य होत नव्हतं.
● विमानं , कंपन्या , वाहनं आणि बऱ्याच प्रदूषणकारी गोष्टी बंद झाल्यामुळे प्रदूषण खूप कमी झालं. ओझोनचं छिद्रही थोडं भरून आल्याची बातमी आली. नद्या थोड्या तरी स्वच्छ झाल्या. अगदी ध्वनी प्रदूषण सुद्धा कमी झालं.
● सगळ्यात महत्त्वाची आणि गंभीर बाब , म्हणजे आपण एकूणच आत्तापर्यंत *#आरोग्य* व्यवस्थेला किती _'फाट्यावर मारलंय !'_ तेही आपल्या लक्षात आलंय. मग ते वैयक्तिक आरोग्य असेल , सामाजिक असेल ; देश म्हणून संघटनात्मक पातळीवरून असेल किंवा जागतिक निकषांवर...
अशा बऱ्याच गोष्टी सिद्ध झाल्यात या लॉकडाऊनच्या काळात. ज्या आपल्याला सुधारायची गरज आहे...
टप्याटप्याने पाहुच 

*© डॉ. अमेय गोखले.*
*९४२२६६२७७२.*
No comments:
Post a Comment