Thursday, December 22, 2022

 [5/19/2020, 5:59 PM] +91 91586 70262: *Covid-19 आणि वसंत ऋतु*

    👨‍👨‍👦‍👦😷 🌿🌺
         *भाग 1*

वसंत ऋतूचे आगमन होऊन पंधरा दिवस उलटून गेलेले आहेत. वातावरण हळुहळू तापू लागले आहे ,शरीरातील उष्णता वाढायला लागली आहे . त्याचबरोबर हवेतील ओलावा, दमटपणाही वाढला आहे . घामाच्या धारा लागत नसल्या , तरी अंग चिकट होऊ लागले आहे . 

थंडीच्या काळात शरीरात जमून राहिलेला *कफदोष* वसंत ऋतूमध्ये पातळ होतो व त्यामुळे *सर्दी, ताप, खोकला, दमा ,गोवर कांजिण्या, डोळे येणे* अशा प्रकारच्या आजाराच्या साथी या काळात दरवर्षीचं येतात, *परंतु या वर्षी covid-19 पँडेमिकची एक गडद छाया या सर्व वातावरणावर पडलेली आहे* .

 लॉक डाउनमुळे घराबाहेर येणे जाणे बंद , हालचाली साहाजिकच कमी , व्यायाम फार नाही त्यात वाढलेली चिंता व नैराश्य यामुळे आपला अग्नि (म्हणजेच सोप्या भाषेत पचनशक्ती ) मंद झालेला आहे. 
कधी कधी भूक भरपूर लागली आहे असे जरी वाटले , तरी खाल्लेले अन्न नीट पचत नसल्यामुळे , शरीरात *आमदोष* (म्हणजेच न पचलेल्या अन्नाचा चिकटा) आणि *दूषित कफ* वाढतो आणि वर उल्लेख केलेल्या ताप ,सर्दी,खोकला या सारख्या रोगांच्या वाढीसाठी पोषक असे वातावरण शरीरात आपसूकच तयार होते .

 आयुर्वेदात रोग झाल्यावर त्याची चिकित्सा तर केली जातेच , पण *मुळात रोगराई होऊच नये म्हणून काय करायचे* ,
*याचे मार्गदर्शन, आयुर्वेद शास्त्रात उत्तम प्रकारे करण्यात आले आहे* .

हे सर्व जाणून घेण्याची व अमलात आणण्याची आज समाजाला तातडीची गरज आहे .
कोरोना संक्रमणाच्या शंकेमुळे isolate करण्यात आलेले लोक, होम क्वारंटाईन मध्ये असणारे लोक , हाय रिस्क गटातील लोक व समाजातील सर्वसामान्य सर्वचं लोकांना, *आपल्याला तर कोरोनाची बाधा होणार नाही ना???* या भीतीने ग्रासलेले आहे.
आपल्या कडे जुनी म्हण आहेचं
*भित्यापाठी ब्रह्मराक्षस* 

तेव्हा आता आपले घोष वाक्य असावे 
*काळजी करू नका, तर काळजी घ्या*

*ती काळजी कशी घ्यायची हे सांगण्यासाठी आयुर्वेदासारखे उत्तम शास्त्र* आपल्या देशात हजारो वर्षापासून रुजलेले आहे. 

*फक्त गरज आहे बासनात गुंडाळून ठेवलेल्या या अमूल्य ठेव्यावरील धूळ झटकण्याची ,या जुन्या ज्ञानाची पुन्हा नव्याने ओळख करून घेण्याची व सर्वात महत्वाचे त्याचा आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष उपयोग करण्याची*!

 चला तर मग जाणून घेऊया , की सध्याच्या या कठीण काळात कोरोना व अन्यही रोगांपासून स्वतःच्या व घरच्यांच्या रक्षणासाठी
*आहार विहार कसा असावा , आयुर्वेदातील कोणते अन्य उपक्रम करावे*  
पुढच्या काही भागातून .

*वैद्य उर्मिला पिटकर*
   मुंबई 
   9829339548
[5/19/2020, 5:59 PM] +91 91586 70262: *Covid-19 आणि वसंत ऋतू* 
           *भाग 2*
     👨‍👨‍👦‍👦😷 🌿🌺

लॉकडाऊनमुळे सर्वजण आपापली कामे बंद करून घरी बसले असले तरीही , जिला कधीच सुट्टी नसते ती व्यक्ती म्हणजे *गृहिणी* सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आज स्वयंपाक काय करायचा ?? घरात सगळ्यांची रसना कशी तृप्त करायची? याचं विवंचनेनत ती असते. त्यात सध्या (कामवाल्याही नाहीत आणि हो, स्विगी ही नाही ?? )

घरात जशी *गृहिणी* तसा आपल्या शरीरामध्ये *ग्रहणी* नावाचा अवयव असतो , जो 24 तास 365 दिवस आपण घेतलेल्या अन्नाचे नीट पचन करण्यामध्ये गुंतलेला असतो. 
आपण ऋतूनुसार,योग्य वेळेत व योग्य आहार घेतला तर ग्रहणी व गृहिणी दोघींवरचा ताण कमी होईल व आपले घर व आरोग्य दोन्ही सुरक्षित राहील .

आधीच वाढलेला उन्हाळा , त्यात होणारी तहान तहान ,तोंडाला चव नाही , हालचाली कमी व हाताशी वेळ भरपूर असल्यामुळे 
सतत काहीतरी चमचमीत खावं ,असं सगळ्यांनाच वाटतं राहतं.

पण या ऋतूचा विचार करता आणि सध्या पसरलेल्या साथीच्या आजाराचा विचार करता आदरणीय कै.वैद्य खडिवाले म्हणतं त्याप्रमाणे
*संयम से स्वास्थ्य* हाच मंत्र जपावा लागेल

 आता *कधी जेवावे ,काय जेवावे, कसे जेवावे* याबद्दल थोडी चर्चा करूया .

सर्वप्रथम म्हणजे आहार *ताजा ,गरम व पचायला हलका* असावा .एकावेळी आवश्यक तेवढेच अन्न शिजवावे ,उगाच फ्रिजची बेगमी करण्यासाठी जास्तीचे अन्न शिजवून ठेवू नये.
अनेक वेळा व्हिजिटला घरी गेल्यावर, मी रुग्णाआधी घरातील फ्रीज तपासते, म्हणजे रोगाचे कारण झटकन सापडते !

 असो ,दोन्ही वेळा ताजे जेवण्याची चैन, सध्यातरी आपण नक्कीच करू शकतो . *अर्थात रांधताना गृहिणी बरोबर गृहस्थांनीही भाग घेतल्यास, जेवणाची लज्जत अधिक वाढेल यात काही शंकाच नाही*.

जेवणाच्या बाबतीत सर्वात महत्वाचा key factor आहे 
*जेवणाच्या वेळा*  

*जेव्हा आकाशात सूर्य असतो , तेव्हा आपल्या पोटातील अग्नीही उत्तम प्रज्वलित असतो* ,पोटातील
चूल चांगली पेटलेली असते तेव्हाच आपली पोळी भाजून घेणे (म्हणजे जेवून घेणे) शहाणपणाचे !

 म्हणून
 *सकाळी 11 ते 12 व संध्याकाळी 6 ते 7 च्या दरम्यान जेवणे उत्तम!* 

*दिव्यात वात आणि तोंडात हात*
 ही आपल्याकडील जुनी म्हण अगदी योग्यच आहे 
*रात्री उशिरा जेवणे म्हणजे अजीर्णाला आमंत्रण!* 
त्यामुळे शरीरात न पचलेल्या अन्नापासून *आमदोष* *(एक प्रकारचा चिकटा) तयार होतो, जो सर्व प्रकारच्या रोगांना अनुकूल वातावरण शरीरात तयार करून ठेवतो*

वेळेवर जेवले व पचवून टाकले, तर रोगजंतू शरीरात शिरले ,तरी त्यांना अनुकूल वातावरणच नसल्यामुळे, ते शरीरात टिकाव धरुच शकतं नाहीत . कारण त्यांना टिकाव धरायला, काही रसदच शिल्लक नसते .
*न रहेगा बास न बजेगी बासुरी* 

*त्यामुळे निरोगी राहायचे असेल, तर सायंकाळी लवकर जेवणे हा महामंत्र आहे*

 *काय जेवायचे ? कसे जेवायचे?* ते पुढील भागात,
कारण आता सहा वाजत आले ,
आमचीही जेवणाची वेळ झाली ना !

*वैद्य उर्मिला पिटकर*
मुंबई
9820339548
[5/19/2020, 5:59 PM] +91 91586 70262: *कोविद19 आणि वसंत ऋतू*
      *भाग 4*
  👨‍👨‍👦‍👦😷 🌿🌺

दवाखान्यात बरेचदा असा अनुभव येतो ,की औषध दिल्यावर रुग्णाकडून लगेच विचारणा होते की, 'डॉक्टर मी पथ्य काय करू ?' मग 10-15 मिनिटे खर्चून , रुग्णाला सर्व पथ्यापथ्य नीट समजावून सांगत असताना , मन लावून रुग्ण सर्व ऐकून घेतात आणि दवाखान्यातून बाहेर पडताच मात्र काही जणं , कोपऱ्यावरच्या
गाडीवर वडापाव नाहीतर पाणीपुरीवर यथेच्छ ताव मारतात !

यात कुणाची कुचेष्टा करण्याचा किंवा कुणाला दोष देण्याचा हेतू खचितचं नाही , खरंतर हा मानवी स्वभाव आहे. एखाद्या गोष्टीवर बंधन घातले ,की तीच गोष्ट माणसाला सर्वात जास्त हवीहवीशी वाटते.  

या सध्याच्या संकटकाळात साथीपासून बचाव करण्यासाठी नक्की *काय काय पदार्थ खायचे ,काय नाही*
 हा विषय अजून येतचं नाही , हे बघून बरेच मेसेज कालपासून येऊ लागले . आहाराविषयी जाणून घेण्यास लोक एवढे उत्सुक आहेत ,याबद्दल आनंद वाटला, पण या गोष्टी अमलात आणण्यासाठी जर उत्साह टिकून राहिला तर जास्त हिताचे ठरेल .

  मला माहीत आहे की आज ही माहिती मिळाल्यावर , उद्यापासून सगळे असेच खायला प्यायला लागतील असे नाही ,पण आयुर्वेद शास्त्र व त्यामागचे तत्व (logic) लोकांपर्यंत पोचवणे , हे काम यथाशक्ती आपण करायचे ,त्यातील काय व किती अमलात आणायचे हे ज्याने त्याने ठरवायचे .

पथ्ये सति गदार्तस्य किम् औषध निषेवणैः ।
पथ्ये असति गदार्तस्य किम् औषध निषेवणैः।।
*(पथ्य करणाऱ्याला औषधांची काय गरज? पथ्य न पाळणाऱ्याला औषधांचा काय उपयोग ??)*

सध्याच्या रोगाला तर औषधच नाही , तेव्हा पथ्य पाळण्याला पर्याय नाही हे मात्र खरे !

वसंत ऋतूत शिशिरात घट्ट झालेला कफदोष पातळ होतो व सर्दी,खोकला ,ताप,डोळे येणे या स्वरूपाच्या आजाराच्या साथींचा प्रादुर्भाव होतो, हे आपण मागील भागात पाहिले आहेच .
कफ म्हणजे प्रामुख्याने *आप* व *पृथ्वी* महाभूतांचा संयोग.
 *वसंत ऋतूतील पातळ झालेल्या कफात जलांश जास्त प्रमाणात असतो*.

*त्यामुळे उष्ण ,कोरडे, भाजके पदार्थ खाणे उत्तम , जे शरीरातील वाढलेल्या ओलाव्याचे शोषण करतात*.

  *कडू,तिखट,तुरट चवीचे पदार्थ आहारात प्रामुख्याने वापरावे (कारण हे तिन्ही रस कफदोष शामक , अग्नीला वाढवणारे आहेत)*

 *ज्वारी ,बाजरी ,जव* ही धान्ये किमान 1 वर्ष जुनी वापरावी , कारण नवीन धान्ये पचावयास जड असतात ,
कफदोषाची वृद्धी करतात . शक्यतो ही धान्ये भाजून किंवा कडक उन्हात वाळवून , नंतर दळावी , कारण भाजल्यामुळे त्यातील पाण्याचा अंश कमी होऊन कफदोष बनवण्याचा गुण कमी होतो किंवा या धान्यांची पीठे भाजून घेऊन मग त्याची भाकरी बनवावी .

 जवाची भाकरी विशेषतः चांगली , कारण जव हे कफदोषनाशक, पचायला अतिशय हलके,
अग्निवर्धक , स्थौल्य
 कमी करणारे आहे. *घरी बसून बसून लंबोदर झालेल्यांना तर जवाची भाकरी म्हणजे साक्षात वरदानचं आहे* !

*भाजून घेतलेल्या ,जुन्या तांदळाचा ,उघड्या पातेल्यात शिजवलेला, पेज काढून टाकलेला भात खावा*. या सर्व प्रक्रिया केल्याने भाताचा चिकटपणा कमी होतो व तो पचायला हलका होतो .
कुकरचा भात मात्र कफदोष, आमदोष करणारा जाडी व मधुमेह वाढवणारा आहे. 
वर्षानुवर्षे कोकणी माणूस पेज काढून पारंपारीक पद्धतीने भात खात होता ,तेव्हा बहुतेकांची पोट-पाठ सपाट दिसे. *त्यामुळे भात खाणे चुकीचे नाही, पण तो कोणते संस्कार करून खाल्ला जातो हे महत्वाचे!*
 
गव्हाचा वापर करायचा असेल तर घडीची पोळी किंवा पराठा करण्यापेक्षा फुलका, जो विस्तवावरच भाजलेला असतो तो पचायला अधिक हलका आणि त्यावर जर थोडे साजूक तूप लावून खाल्ले तर मग *सोने पे सुहागा* 

डाळीपैकी सदा पथ्यकर मुगाची डाळ! 
मुगाचे वरण, डाळ तांदुळ भाजून केलेली मुगाची खिचडी वर थोडे साजूक तूप घालून वा तेलाची फोडणी देऊन जरूर खावी.
 
 कडधान्ये भिजवून खाण्यापेक्षा *कुळीथ (हुलगे) ,हरभरा, मूग, तूर, मसूर या डाळी किंवा कडधान्ये भाजून, त्यात पाणी घालून, शिजवून त्याचे कढण, म्हणजे सूप करावे* . त्याला हिंग, जिरे, हळद ,कढीपत्ता अशी तेलाची फोडणी देऊन गरम गरम प्यावे. विशेषत *ज्यांना सर्दी , कफ ,दमा, खोकला अशा प्रकारचा त्रास आहे त्यांनी कडधान्यांची कढणे जरूर घ्यावी* .
 याशिवाय *तूर ,मसूर,मूग याची आमटी* जेवणात असावी.

भाज्यांपैकी *पडवळ,गवार,मुळा शिराळे, घोसाळे, कारलं ,लाल भोपळा ,वांगी, शेवग्याच्या शेंगा* यासारख्या किंचित कडू, तुरट रसाच्या व पटकन शिजणाऱ्या, पचायला हलक्या भाज्या जास्त उत्तम !
परंतु सध्याच्या लॉक डाउनच्या काळात जी मिळेल ती भाजी खावी लागेल हेच खरे ,त्यातल्या त्यात जी ताजी भाजी मिळेल ती वापरावी. पालेभाज्या फारशा नकोच पण अधूनमधून *मेथी ,चवळी(तांदळजा), पातीचा कांदा खाऊ शकतो ,मात्र *पालेभाजी बनवत असताना, जरा सढळपणे तेलाचा वापर करावा, कारण सर्व पालेभाज्या या पचायला जड आणि मलविष्टम्भि (कॉन्स्टिपशन करणाऱ्या) असतात हे लक्षात घ्यावे*. 

दही हे अग्नीला मंद करणारे व पचायला जड असल्यामुळे या काळात अजिबात वापरू नये. त्याऐवजी *दह्याच्या दुप्पट पाणी घातलेले,चांगले घुसळलेले पातळ ताक, मीठ जिरे,हिंग घालून किंवा तुपाची फोडणी देऊन* दुपारच्या जेवणात घ्यावे. रात्री मात्र दही-ताक अजिबात घेऊ नये. 

स्वयंपाकामध्ये *मोहरी,हिंग,हळद,लसूण,दालचिनी, तमालपत्र,धने,जिरे,ओवा ,सुंठ,मिरे* अशा मसाल्याचा विशेषत्वाने वापर करावा.कारण हे सर्व मसाले उष्ण तीक्ष्ण, कफनाशक ,अग्निवर्धक आहेत .

 *लसूण,आले,कांदा, कढीपत्ता ,कोथिंबीर* असा ओला मसाला चटण्या व 
ग्रेव्हीसाठी वापरावा. 
*पांढरा कांदा भाजून जेवणात सलाडप्रमाणे* वापरल्यास उन्हाळ्याचा त्रास होत नाही.

*स्वयंपाकात फोडणीसाठी तुपापेक्षा विशेषतः तेलाचा वापर करावा* , कारण तेल हे उष्ण व कफदोषनाशक आहे. अर्थात तेलही माफक प्रमाणातचं वापरावे .

 मधल्या वेळेच्या नाश्त्यासाठी *ज्वारीच्या किंवा भाताच्या कुरकुरीत केलेल्या फोडणी दिलेल्या लाह्या ,भाजक्या पोह्यांचा चिवडा ,कुरमुऱ्याची कैरी कांदा घातलेली चटकदार भेळ ,कधीकधी आंब्याची स्वादिष्ट डाळ,मुगाचे धिरडे, कमी तेलावर केलेले भाजणीचे थालीपीठ,कोथिंबीर वडी, भाजलेले चणे कुरमुरे ,राजगिरा लाडू, खाकरा* अशा पदार्थांचा नक्कीच आस्वाद घेऊ शकतो .सुटले ना तोंडाला पाणी ??
कोण म्हणतं आयुर्वेदातील पथ्य जिकिरीचे आहे म्हणून ,
आयुर्वेदात खऱ्या अर्थाने
*टेस्ट भी और हेल्थ भी* 
 चा सुरेख मेळ घातलेला आहे!

रात्रीचे जेवण मात्र हलके लवकर (7 च्या आत ) आणि कमी प्रमाणात घ्यावे.
*रात्रीच्या जेवणानंतर शक्यतो काहीही खाऊ पिऊ नये* .
नाहीतर घरी संध्याकाळी लवकर जेवून, मग रात्री बाहेर जाऊन मिल्कशेक, कुल्फी आईसक्रीम,ज्यू्स रिचवणारी मंडळीही काही कमी नाहीत .
आपण हे सर्व आपल्या उत्तम आरोग्यप्राप्तीसाठी करत आहोत ,त्यामुळे अशा भलत्या गोष्टी केल्याने ,आपला मूळ उद्देशचं फसणार आहे हे लक्षात घ्यावे .

 तरीही जर रात्री कधी फारच जास्त भूक लागलीचं तर *कुरमुरे चिवडा ,राजगिरा लाडू ,लाह्या* असे कोरडे पदार्थ थोडे खाऊ शकतो .

आहाराविषयी तूर्तास एवढेच ,
 बाकीचे पुढच्या भागात , नाहीतर माहितीचेही अजीर्ण व्हायचे !

*वैद्य उर्मिला पिटकर*,
  मुंबई
MD Ph.D (Ayurved)
9820339548
[5/19/2020, 5:59 PM] +91 91586 70262: *Covid19 आणि वसंत ऋतू*
  👨‍👨‍👦‍👦😷 🌿🌺
         *भाग 3* 

लहानपणी शाळेत पंचमहाभूते (पृथ्वी, आप तेज, वायू ,आकाश ) आपण सगळेच शिकलो आहोत, पण या पाच महाभूतांचा आपल्या आरोग्याशी असणारा संबंध आयुर्वेद शिकल्यावरचं समजला.

 *ही सर्व सृष्टी, आपले शरीर व आपले अन्नही या पंचमहाभूतांच्या कमी अधिक संयोगातून बनलेले आहे* .

यातील *पृथ्वी* हे महाभूत सर्वात *जड* व त्यापुढील आप, तेज, वायू ,आकाश हे क्रमाक्रमाने *हलके* होत जातात. त्यामुळे ज्या पदार्थात पृथ्वी (ठोस भाग) व पाणी जास्त ते पचायला जड व 
ज्या पदार्थात तेज,वायू ,
आकाश ही महाभूते जास्त ते पचायला हलके.

  म्हणून *ज्यात 80 टक्के पाणी असते ती फळे पचायला जड, तर भट्टीत भाजून ज्यातील पाणी पूर्णपणे काढून टाकलेले आहे,अशा लाह्या या तेज ,वायू ,आकाश प्रधान , वजनाने हलक्या व पचायला ही हलक्या आहेत* 
 अग्नी मंद झालेल्या , ताप,सर्दी,अजीर्ण इत्यादी रोग्यांसाठी ,लाह्या हा परम आहार (super food) आहे.

 आधी पोहे पाण्यात भिजवून ठेवून केलेले कांदेपोहे , पचायला जड तर कढईत भाजून कुरकुरीत केलेले पोहे त्यामानाने पचायला हलके .
पाण्यात भिजवून ठेवून मोड आणलेली कडधान्य पचायला जड , तर डाळी व तांदूळ भाजून केलेली भाजणी पचायला हलकी 

 पचायला जड की हलके हे ओळखण्याची आणखीन एक खूण म्हणजे, *जे पदार्थ बाहेर शिजायला जास्त वेळ व तीव्र अग्नी द्यावा लागतो ते पचायला जड*. उदा मुगाची डाळ उघड्या पातेल्यात दहा-पंधरा मिनिटात सहज शिजते ,त्यामानाने तूर ,चणा ,उडीद या डाळी शिजवायला कुकरच्या बऱ्याच शिट्ट्या कराव्या लागतात .

*वायू हा अग्निसखा आहे तर अग्नी आणि पाणी यांचे विळ्या-भोपळ्याचे नाते आहे*, हे आपण सर्व जाणताच . *आगीला वारा लागला तर ती पसरते ,पण आगीवर पाणी ओतले तर मात्र ती विझते*

   *यज्ञात अग्नीत जर थोडे थोडे तूप घातले तर तो चांगला प्रज्वलित होतो* .म्हणून गरम भाकरी ,भात, पोळी यावर साजूक तूप घातले, तर अग्नी उत्तम प्रज्वलित होतो व अन्नाचे पचन नीट होते . *तुपाला अन्नशुद्धी (food detoxifier) म्हणणारे आपले पूर्वज किती जाणते होते नाही का ?*
पावसाळ्यात वातावरण दमट असते म्हणून चूल नीट पेटत नाही , पण कोरडे सरपण असेल तर चांगली रसरशीत पेटते.

 पंचमहाभूतांच्या या सर्व नियमबद्ध खेळाचे , सूक्ष्म निरीक्षण करूनच आयुर्वेदशास्त्र तयार झाले आहे. 
या निसर्गाचाच एक घटक आहे मानव ,
त्यामुळे *जे नियम निसर्गात आहेत, तेच नियम मानवाला पण लागू आहेत* व त्यानुसार वागण्यातच मानवाचे हित आहे हे ओळखून, आयुर्वेदाने आहार विहाराचे काही नियम सांगितलेले आहेत .

  शरीराकडून मागणी नसताना म्हणजेच *भूक लागलेली नसताना खाणे आणि तहान लागलेली नसताना विनाकारण पाणी पिणे* या दोन्हीमुळे शरीरातील अग्नीवर ताण पडून तो मंद होतो व अजीर्णाला कारण होतो, इथेच वेगवेगळ्या रोगांची पायाभरणी होतें.

 माझ्या माहितीतील एक जुने वैद्य नेहेमी म्हणत की 'जाऊ की नको?(मलविसर्जनाला) अशी शंका आली तर जरूर जावे आणि खाऊ की नको ? असा प्रश्न पडला, तर अजिबात खाऊ नये, म्हणजे आरोग्य उत्तम राहाते' .
आपण मात्र बहुधा उलटेचं वागतो !

असो , हे सर्व आख्यान लावण्याचे कारण असे की *आपला अग्नी उत्तम असला, म्हणजेचं पचन शक्ती उत्तमअसेल , तर अन्न व्यवस्थित पचून पुढील सर्व घटक (धातू ,मल इत्यादी ) योग्य प्रमाणात व योग्य प्रकारचे बनतात. ज्यामुळे आपल्याला *उत्तम बल* आणि *उत्तम व्याधीक्षमत्व* प्राप्त होते.

*Modern Dietetics gives more emphasis on Nutrition , while Ayurved empasise more on Digestion*
  केवळ विविध प्रकारच्या पौष्टिक वस्तू खाल्ल्याने प्रतिकारक्षमता वाढत नसून , खाल्लेल्या अन्नाचे आपल्या अग्निद्वारे नीट पचन होते आहे का, हे पाहणे जास्त आवश्यक आहे 

 *अग्नीचे रक्षण करणारे सर्व नियम पाळणे, म्हणजेचं आपले आरोग्य अबाधित ठेवणे व व्याधीक्षमत्व वाढवणे होय*

 वसंत ऋतूतील उष्ण, दमट हवामानामुळे, या काळात अग्नी मुळात मंद झालेला असतो , हे काल आपण पाहिलेचं आहे, त्यात सध्या covid19 सारख्या आजाराची साथ आलेली आहे, 

म्हणूनच या काळात आहारामध्ये *जुन्या, भाजलेल्या धान्यांचा व पचायला हलक्या पदार्थांचा वापर अधिक प्रमाणात करायला हवा*.

*भूक लागली तरचं जेवणे व तहान लागली तरच पाणी पिणे*
निरोगी राहायचे असेल तर हा नियम कसोशीने पाळायला हवा.

* विशेषतः ज्यांना सर्दी खोकला ,अजीर्ण ,
अम्लपित्त,ताप असे व्याधी आहेत किंवा व्हायची सवय आहे त्यांनी भूक नसेल तेव्हा ,अधून मधून एक *लंघन* करावे. म्हणजे शरीरात बॅलन्स असणारा आमदोष शरीर पचवून टाकते व रोगाच्या मुळावरच घाला घातला जातो . 

नेमके कोणते पदार्थ आहारात असावे ज्याची सर्व उत्सुकतेने वाट बघत आहीत , ते उद्या सांगणार आहे .

पण हे सर्व का करावे
 हे सांगण्यासाठी हे नमन !

 *नमनाला घडाभर तेल* खर्च केले हे खरे ,
पण ते गरजेचेचं होते .


*वैद्य उर्मिला पिटकर* 
MD.PhD (Ayurved)
मुंबई
9820339548
[5/19/2020, 5:59 PM] +91 91586 70262: *Covid 19 आणि वसंत ऋतु* 
     👨‍👨‍👦‍👦😷 🌿🌺
            *भाग 7*

सध्या असणाऱ्या Covid19 च्या पार्श्वभूमीवर विहाराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण या आजाराची सध्यातरी कोणतिही निश्चित औषधी योजना आपल्याजवळ नाही, त्यामुळे प्रतिबंधात्मक स्वरूपाची उपाययोजनाच, सध्या आपण करू शकतो.

 यात सर्वात महत्त्वाचे आहे *social distancing* म्हणजेच प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्यापासून शारीरिक दृष्ट्या काही अंतरावर राहाणे.

 सुश्रुत या आयुर्वेदाच्या महान शास्त्रज्ञांनी सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी , या संदर्भात जे लिहून ठेवले आहे ते बघणे फार उद्बोधक ठरेल
*प्रसंगात् गात्रसंस्पर्शात् निश्वासात् सहभोजनात्। सहशय्यासनात् चैव वस्त्रमाल्यानुलेपनात्।* *कुष्ठ ज्वरश्च शोषश्च नेत्राभिष्यंद एव च।*
*औपसर्गिक रोगाश्च संक्रामंति नरात् नरम्*।।
कुष्ठ (म्हणजे विविध त्वचारोग) , ताप,
श्वसनाचे विकार , डोळे येणे यासारखे रोग, जे एका व्यक्तीपासून 
दुसऱ्या व्यक्तीला , संपर्कामुळे होऊ शकतात ,
त्यांना *औपसर्गिक रोग* असे आयुर्वेदाने म्हटलेले आहे.

 मुक्त शरीरसंबंध , दुसऱ्याच्या शरीराला वारंवार स्पर्श करणे (चुंबन आलिंगन, हस्तांदोलन इत्यादी) , एकमेकांचा श्वासोच्छ्वास, खोकला, शिंक इत्यादीतून, 
एकत्र भोजन केल्यामुळे (एकाच ताटात जेवणे, एकमेकांचे उष्टे खाणे, लग्नकार्यातील व हॉटेलमधील नीट न विसळलेल्या थाळ्या, वाट्यात खाणे इत्यादी) , एकच बिछाना वा एकच बसण्याचे आसन (कमोडची सीट ) वापरणे , एकाने वापरलेली वस्त्र ,आभूषणे दुसऱ्याने वापरल्यामुळे, तसेच एकाने वापरलेली प्रसाधनाची साधने (कंगवा ,टॉवेल ,ब्रश ,रेझर मेकअप ,लिपस्टीक,
पावडरचा पफ) दुसऱ्याने वापरल्यामुळे औपसर्गिक रोगांचे संक्रमण, एका व्यक्तीकडून दुसऱ्याला किंवा अनेक व्यक्तींना पसरू शकते.

या सर्व वर्णनावरून सहजपणे हे लक्षात येते की, *शुचिता व विलगिकरण*
याचे आरोग्याच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व पूर्वजांनी जाणलेले होते .

 म्हणूनच पूर्वीच्या काळापासून आपल्याकडे शौचालय घराबाहेर असायचे. बाहेरून आल्यावर लगेच हात-पाय धुऊन,कपडे बदलून मगच स्वयंपाक घरामध्ये जायचे ,
अंत्ययात्रेला जाऊन आल्यावर किंवा केस कापून झाल्यावर लगेच डोक्यावरून आंघोळ करायची , नवीन जन्म झाल्या घरी किंवा मृत्यू झालेल्या घरी 12 दिवस सोहेर वा सुतक पाळायचे. असे अनेक कौटुंबिक व सामाजिक संकेत (etiquettes) होते व ते निष्ठेने पाळलेही जातं होते. किंबहुना गावोगावी आजही या गोष्टी पाळल्या जातात . या सर्व नियमांमागे व्यक्तीचे,कुटुंबाचे व समाजाचे *आरोग्यरक्षण* हा महत्वाचा हेतू होता.

 अनेक घरात स्वयंपाकघरात येण्यापूर्वी वेणीफणी,आंघोळ करणे सक्तीचे असे.
 *स्वयम्* म्हणजे *स्वतः* आणि *पाक* म्हणजे *शिजवणे*. 
घरातील व्यक्तीने स्वतः रांधलेल्या जेवणालाच *स्वयंपाक* असे म्हटले जात असे , सध्या मात्र आपण पुरते *परपाकी* 🤔 (बाहेरचे जेवण्यात धन्यता मानणारे) झालो आहोत व ते किती धोक्याचे आहे , हे आता आपल्या चांगलेच लक्षात आलेले आहे.

सध्याच्या जीवनपद्धतीत काही वेळा बाहेरचे खाण्याला पर्याय नसतो , तेव्हा जेवण बनवणे व विकणे हा ज्यांचा व्यवसाय आहे त्यांनी व ग्राहकांनाही स्वच्छतेचे नियम अत्यंत कसोशीने पाळणे गरजेचे आहे. 

*हात वारंवार स्वच्छ धुणे*, 
*खोकताना वा शिंकताना नाकातोंडासमोर रुमाल धरणे* ,
*सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे*. 
*आपली केस ,नखे,त्वचा यांची योग्य स्वच्छता राखणे*
*आपले घर , आपला* 
*परीसर ,आपले गाव ,शहर जास्तीत जास्त स्वच्छ राहील यासाठी दक्ष राहणे* .
*ओला व सुका कचरा वेगळा करणे, तसेच शक्यतो घरातील* *ओल्या कचऱ्याचे घरातच खत बनवणे* ,
*साधी राहणी, नैसर्गिक स्त्रोतांचा काटकसरीने वापर , वस्तूंचा अनावश्यक संग्रह टाळणे* यासारख्या अनेक गोष्टी आता आपण सर्वांनी निष्ठापूर्वक करण्याची नितांत आवश्यकता आहे.

केवळ स्वतःपुरते बघून , आता तर चालणारचं नाही .
आपल्याला *स्वस्थ* (शारीरिक,मानसिक व सामाजिक दृष्ट्या) राहायचे असेल तर आपले कुटुंब ,आपला समाज ,आपला परिसर ,आपला देश किंबहुना ही सर्व पृथ्वी स्वस्थ राहिली ,तरच मीही स्वस्थ राहू शकेन हे लक्षात घ्यावे लागेल. 

*सर्व शुभ मे मेरा शुभ है* । 
या वैश्विक सत्याची स्पष्ट जाणीव , कोरोना नावाच्या या विषाणूने मानव जातीला नव्याने करून दिली आहे.

यावरून आपण योग्य तो धडा घेऊन , भारतीयांना प्राचीन काळापासून अपेक्षित असणारी
*सर्वेतु सुखिनः सन्तु ,सर्वे सन्तु निरामयः*
ही कामना सफल होईल अशी आशा व त्यासाठी एकत्रितपणे अथक प्रयत्न करूया .

*आता आजपर्यंत लिहिलेल्या या मालिकेच्या ,सहा भागातील महत्वाचे मुद्दे सारांश रुपात देत आहे* -

1. वसंत ऋतूत शिशिरात घट्ट असणारा कफदोष पातळ होतो , तसेच नेहमीप्रमाणे या ऋतूत येणाऱ्या सर्दी ,खोकला, ताप यांसारख्या आजाराबरोबरचं या वर्षी पसरलेल्या
 covid 19 च्या भयंकर महामारीमुळे स्वतःचा बचाव करण्यासाठी, आहार-विहाराकडे विशेष लक्ष देणे अत्यावश्यक आहे.

2 आहार ताजा ,गरम ,पचायला हलका ,भाजलेला ,
कोरडा, कडू तुरट,तिखट रसाचा असावा.

3.ज्वारी,जव,नाचणी यांची भाकरी ,गव्हाचा फुलका ,मूग,तांदूळ भाजून खिचडी,पेज काढून भात,पातळ ताक , लवंग ,मिरे ,दालचिनी ,
हळद ,जिरे इत्यादी मसाल्याचे पदार्थ ,पांढरा कांदा,लाह्या यांचा आहारात प्रामुख्याने उपयोग करावा.

4. तहान लागेल तेव्हाच व तेवढेच कोमट पाणी प्यावे . पाण्यात धणे ,सुंठ,हळद, दालचिनी इत्यादी एखादा मसाल्याचा पदार्थ घालावा .

5. संध्याकाळी 7 च्या आत जेवावे .भूक नसेल तर मध्ये मध्ये लंघन करावे.

6 .सकाळी सूर्योदयापूर्वी उठुन, मलमूत्र विसर्जनानंतर ,
नियमितपणे योगासने,प्राणायाम ,
सूर्यनमस्कार इत्यादी व्यायाम करावा.

7. नस्य - दिवसातून 2 ते 3 वेळा नाकाला आतून तिळाचे तेल किंवा तूप लावावे .

8. गंडूष- हळद ,मीठ ,गरम पाणी यात थेंबभर तूप घालून गुळण्या कराव्या .

 9.धूपन -
घरात सकाळ संध्याकाळी कडूनिम्ब ,करंज,कापूर, ओवा ,वेखंड,हळद इत्यादी औषधिनी धूपन करावे.


*Covid19 आणि वसंत ऋतू ही लेखमालिका आज येथे संपवत आहे* .
*या लेखमालिकेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया ,सूचना, शंका यांचे मनःपूर्वक स्वागत*.

*सर्व वाचकांनी आत्तापर्यंत दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल हार्दिक धन्यवाद* 
🙏🙏

*वैद्य उर्मिला पिटकर*
मुंबई
MD,PhD(Ayurveda)
आयुर्वेद व्यासपीठ,
कोकण विभाग अध्यक्ष 
9820339548
[5/19/2020, 5:59 PM] +91 91586 70262: *Covid19 आणि वसंत ऋतू*
    👨‍👨‍👦‍👦😷 🌿🌺
        *भाग 5*

आयुर्वेदाने ऋतुचर्येच्या दृष्टीने एकूण सहा ऋतुंचे वर्णनं केलेले आहे. *वसंत* (चैत्र -वैशाख), *ग्रीष्म* (ज्येष्ठ -आषाढ) *वर्षा* (श्रावण-भाद्रपद) *शरद* (आश्विन- कार्तिक)
 *हेमंत* (मार्गशीर्ष- पौष)
*शिशिर*( माघ- फाल्गुन)

परंतु भारतामध्ये उत्तर व पूर्वेकडील काही भाग वगळता, बहुतेक ठिकाणी, हिवाळा व पावसाळ्यापेक्षा 
उन्हाळा हाचं जास्त काळ आढळणारा ऋतू आहे. 12 पैकी जवळजवळ 7 ते 8 महिने असणाऱ्या या उन्हाळ्यात, वसंत ऋतूतला उन्हाळा वेगळा, ग्रीष्म ऋतूतला उन्हाळा वेगळा व पावसाळ्यानंतर येणाऱ्या शरद ऋतूतला उन्हाळा (ज्याला आपण 'ऑक्टोबर हीट' असे म्हणतो) तो अगदीच वेगळा ! त्यामुळे या प्रत्येक उन्हाळ्यातली ऋतुचर्याही वेगवेगळी आहे .

*आयुर्वेदात ऋतुचर्या सांगितली त्यामागचा मुख्य उद्देश आहे, प्रत्येक ऋतूनुसार बाह्य वातावरणात होणारे जे बदल आहेत त्या बदलांशी ,आपल्याला सहजपणे जुळवून घेता यावे, त्यासाठी शरीराची कमीत कमी शक्ती खर्ची पडावी व आपण कमीत कमी आजारी पडावे* !

अर्थातच हे सर्व ऋतुनुसार होणारे बदल, कॅलेंडरचे पान उलटताच ,बटण दाबल्याप्रमाणे , अमुक महिना चालू झाला की लगेच अमुक ऋतू सुरू, असे न होता ,हळूहळू होत असतात .

 *वसंत ऋतूतला उन्हाळा हा , हिवाळ्यानंतर सुरू होणारा पहिलाच उन्हाळा असतो , त्यामुळे एकदम शीताकडून उष्णाकडे झालेल्या ,या मोठ्या बदलाशी जुळवून घेण्यासाठी शरीराला त्रास होतो, जास्त वेळ लागतो.या मोठ्या स्थित्यंतरामुळे शरीराची प्रतिकारक्षमता थोडी कमी होते, त्यामुळे वसंत ऋतूत आजारांचे प्रमाण वाढते*.

असेच मोठे स्थित्यंतर वर्षाऋतुनंतर येणाऱ्या शरद ऋतूमध्ये होते, म्हणून *वसंताप्रमाणे शरद ऋतूतसुद्धा आजारांचे प्रमाण वाढलेले दिसते*. अशा वेळेस आहार- विहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक असते.
 
मागील लेखात लिहिल्याप्रमाणे वसंतऋतू मध्ये शिशिरात शरीरात थंडीमुळे घट्ट झालेला कफदोष ,वसंतातील उन्हाळ्यामुळे पातळ व्हायला लागतो. ह्या कफामध्ये द्रवगुण जास्त असल्यामुळे , वसंत ऋतूतील उन्हाळ्यामध्ये भाजके, कोरडे ,उष्ण असे कडू, तुरट,तिखट चवीचे, द्रवाला शोषणारे पदार्थ खाणे आवश्यक असते, ज्याविषयी आपण मागील भागात पाहिले .

 परंतु त्यापुढे येणाऱ्या ग्रीष्म ऋतूत उन्हाचा कडाका अधिक वाढतो वैशाखातले शेवटशेवटचे दिवस (साधारण मेचा उत्तरार्ध आणि जून महिन्याचा काळ) यामध्ये तहान-तहान होऊ लागते , भूक कमी होते,लवकर दमायला होते. या काळात वातावरणात रुक्षता वाढते तसेच शरीरातही रुक्षता वाढते ,जठराग्नी मंदच असतो परंतु वाढलेल्या रुक्षतेमुळे अधिक द्रव गुणाचा, रसाळ ,स्निग्ध, गोड ,आंबट व खारट चवीचा असा आहार घेणे आवश्यक असते.
 या काळात निसर्ग आंबे,फणस, कोकम ,जांब ,करवंदे,
जांभळे,कलिंगड,टरबूज,चिबुड ,द्राक्षे यासारख्या आंबट ,गोड रसाळ फळांच्या रुपात आपली गरज मोठ्या कौतुकाने भागवतो . 

    *मात्र सध्या चालू असणाऱ्या वसंतऋतूत द्रवगुणाचा कफदोष शरीरात वाढलेला असल्यामुळे थंड पाणी, फळे, सरबते ,लस्सी ,शहाळे पाणी ,उसाचा रस इत्यादी पिणे मात्र आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक ठरू शकते . तसेच सर्दी,खोकला,घसादुखी, अंगदुखी ,ताप यासारख्या आजारांना आमंत्रण देणारे ठरू शकते*.

तरीही ज्यांना फळे खायचीच आहेत त्यांनी निदान ती, दुपारी 3 ते 5 च्या मध्ये , एका भुकेच्या वेळी, दाताने नीट चावून किंवा चोखून ,थोडी मिरपूड, जिरेपूड ,मीठ किंवा चाट मसाला लावून खावी.
फळांचा ज्यूस मात्र बिलकुल नको, कारण तो झटकन कफ दोष वाढवणारा ठरतो . सकाळी ,जेवणानंतर व रात्री या कफकालात मात्र फळे अजिबात खाऊ नयेत .

परवाचा लेख वाचल्यावर बऱ्याच जणांचे कोणती फळे खावी ,सरबते प्यावी याविषयी विचारणा करणारे मेसेज आले . वरील विधान वाचल्यावर कदाचित या मंडळींचा थोडा हिरमोड होण्याची शक्यता आहे. *परंतु आपण आहार हा फक्त आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी करत नसून मुख्यतः शरीराच्या पोषणासाठी करतो हे तत्व जर एकदा स्वीकारले, तर ही बंधने मग फारशी जाचक वाटतं नाहित*
 टेस्ट व हेल्थ मध्ये प्राधान्य कुणाला द्यायचे?, हे आपण ठरवायचे एकाचवेळी दोन्ही साधतं असेल तर मग फारच छान !

येऊ घातलेल्या काळात ग्रीष्म ऋतूचे रुक्ष,कोरडे वातावरण सुरू होईल शरीराची लाही लाही होऊ लागेल,घशाला शोष पडू लागेल , वाढलेल्या तापमानामुळे व कोरडेपणामुळे शरीर पाणी मागू लागेल ,तेव्हा मात्र गरजेनुसार आपण या ऋतुत मिळणाऱ्या सर्व आंबट गोड फळांचा ,सरबतांचा आस्वाद नक्कीच घेऊ शकतो . 

*सध्याच्या काळात मात्र पाणीही गरजेप्रमाणे तहान लागेल तेव्हाचं व तेव्हढेच कोमट प्यावे . पिण्याचा पाण्यात थोडी हळद , सुंठ ,ओवा ,धणे, दालचिनी,मिरी ,लवंग असा एखादा मसाल्याचा पदार्थ आलटून पालटून टाकला ,तर रोज वेगवेगळ्या स्वादाचे असे , 'मसाला पाणी ' प्यायलाही मस्त वाटेल व औषधाचे कामही करेल* उत्तरेत प्रसिद्ध असलेले *जलजीरा* हे ही एक प्रकारचे मसाला पाणीच, जे उन्हाळ्यात पिण्यासाठी फार उत्तम !

कुणी उन्हात अत्यावश्यक कामानिमित्त बाहेर जाऊन आल्यास किंवा श्रमाचे काम करून आल्यास , त्याला गुळाचा खडा पाण्यासोबत द्यावा. गुळामुळे पटकन तरतरी येते आणि अंगातून गेलेली शक्ती लवकर भरूनही येते.
 .
*पाणी जेवणानंतर लगेच व रात्री झोपताना तर शक्यतोवर पिऊच नये* अग्नि व पाण्याचे नाते विरुद्ध आहे व आपल्याला आपल्या अग्नीचे संरक्षण करायचे आहे हे सदैव लक्षात असावे .
 रात्री खूपच तहान लागल्यास घोट दोन घोट कोमट पाणी घसा ओला होईल इतपतच प्यावे.

*झोपताना दूध तर नकोच नको , किंबहुना वसंत ऋतूत लहान मुले,गर्भार स्त्रिया व अतिवृद्ध व्यक्ती वगळता दिवसाही दूध पिऊ नये .ज्यांना दूध घेणे अत्यावश्यक आहे त्यांनी गाईचे दूध हळद ,सुंठ घालून उकळून खडीसाखर घालून गरम गरम घ्यावे*.

दुधापासून बनवलेल्या चीज, पनीर ,बटर, आईस्क्रीम ,लस्सी ,कुल्फी अशा पदार्थांना तर ,
या दिवसात रामराम ठोकलेलाच बरा !

*दह्याचा दुप्पट पाणी घातलेले ,चांगले घुसळलेले ताक दुपारच्या जेवणात, जिरे मीठ घालून थोड्या प्रमाणात घेण्यास हरकत नाही*. 

आहारानंतर आता पुढच्या भागात जाणून घेऊया वसंतऋतुतील विहाराविषयी .....

*वैद्य उर्मिला पिटकर*
  मुंबई
 MD.Ph.D (Ayurved)
आयुर्वेद व्यासपीठ कोकण विभाग अध्यक्ष
9820339548

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...