Friday, December 16, 2022

सुख व समाधान...**माणसे कधीही समाधानी होत नाहीत.*

*कारण...*
*ती सतत सुखाचा पाठलाग करत असतात,*
*आणि सतत बदल केल्याने,*
*आपण सुखी होऊ अशी त्यांची धारणा असते.*
*त्यामुळेच त्यांचे समाधान होत नसते.*
*ते एक नोकरी सोडून दुसरी नोकरी पकडतात,*
*एक धर्म किंवा सिध्दांत सोडून दुसरा स्वीकारतात.*
*त्यांना वाटते की,असा बदल केल्याने,*
*सुख मिळेल...*
*किंवा ते जीवनातला एखादा कानाकोपरा निवडून कुचंबून राहतात.*
*खरोखर समाधान वेगळीच गोष्ट आहे.*
*तुम्ही जेंव्हा कोणताही बदल करण्याची ईच्छा न बाळगता,*
*तिरस्कार व तुलना न करता,*
*स्वतः जसे आहे तसे स्वतःला पहाता,*
*तेंव्हाच समाधान अस्तित्वात येते.*
*तुम्ही जे पाहता त्याकडे डोळेझाक करावी,*
*असे नव्हे...*
*पण मन जेंव्हा तुलना करत नसते,*
*मूल्यमापन करत नसते,*
*आणि त्यामुळे जे काही आहे,*
*त्यात बदल करण्याची ईच्छा न धरता,*
*क्षणो-क्षणी ते स्पष्ट पाहण्याचे सामर्थ्य असते,*
*तेंव्हा त्या दर्शनातच समाधान म्हणजेच,*
*_चिरंतनाचा निवास असतो...!!_*

                🙏🏻🌹🙏🏻

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...