Friday, December 16, 2022

 गुरुपौर्णिमा निमित्त सह्याद्रीच्या पायावर

     ‌. 🙏🏻 शतकोटी नमन 🙏🏻
गुरुकृपा म्हणजे काय?

पैसा, गाडी, बंगला म्हणजे गुरुकृपा नव्हे...

आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्या नकळत टळून जातात. ते टळलेले संकट म्हणजे गुरुकृपा..!!

गाडीवरून जाताना कुणाचा धक्का लागून पडता पडता आपण स्वतःला सावरतो ते सावरणे म्हणजे गुरुकृपा..!!

कोसळलेल्या दुःख रुपी डोंगराला पेलण्याची जी ताकद आपल्यात निर्माण होते, ती ताकद म्हणजे गुरुकृपा..!!

आता सर्व संपलं असं वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते. ती उमेद म्हणजे गुरुकृपा..!!

अडचणीमध्ये सर्वजण साथ सोडून गेले असता तू लढ, आम्ही आहोत सोबत. हे गुरुबंधू चे शब्द म्हणजे गुरुकृपा..!!

प्रसिद्धीच्या शिखरावर असताना तिथूनच हवेत ना उडता. पाय जमिनीवर पाय जमिनीवर राहणे म्हणजे गुरुकृपा..!!

पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजे सद्गुरू कृपा नव्हे.
ते नसताना आयुष्यात असलेले समाधान म्हणजे गुरुकृपा..!!

🌹🙏🏻🌹🙏🏻🌹

अशी गुरुकृपा आपणास लाभो. हीच आजच्या दिवशी सदिच्छा.

*🌹सुप्रभात🌹*

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...