Friday, December 16, 2022

चल उठ मित्रा...


चल उठ मित्रा, आपणही बंड करू यापुढे एकमेकांचा व्देष करणं बंद करु

हातातील झेंडे ठेवून देऊ हाताला काहीतरी काम पाहु आता आपल्याच बापाला पाठींबा देऊ त्याच्याच खांदयाला खांदा लावून काम करु चल उठ मित्रा,....

घर माझही जळल, तुझही जळल लावणारा मात्र घरातुन बघल नाडी ही त्यांची आपल्याला कधी कळल चल ही चिंगारीच विहावनं सुरु करु चल उठ मित्रा,....

मी यांचा, तु त्यांचा आहे ते मात्र सर्व त्यांचेच आहे कळल कधी आपल्यला हा स्वार्थ आहे त्यांना बाकी सारे व्यर्थ आहे चल उठ मित्रा.....

तु तुझा ठेव, मी माझा ठेवतो धर्म, जात, पक्ष, संघटना बाजूला ठेऊ आपण सारे एकच, समाजाला संदेश देऊ एकमेकांच्या भावनांचा आदर करु चल उठ मित्रा,....

ना हार तुझी, ना जित माझी हे आता तरी उमजून घेऊ सारा हा डाव त्यांचा समजून घेऊ आयुष्याचा हा खेळ चल बंद करू चल उठ मित्रा.....

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...