Saturday, December 10, 2022

: ✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨

_*तुमचा स्वभावच लोकांमध्ये विश्वास निर्माण करतो. दुरावा कोणतंही नातं संपवत नाही. आणि जवळीक कोणतही नातं घट्ट करत नाही. तर नात्यांची घेतलेली काळजी आणि केलेला सन्मान यामुळे नातं अधिक मजबूत होतं आणि टिकतं देखील. जीवन खुप सुंदर आहे. फक्त तसं जगायला हवं...!!*_
✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨

✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨
_*मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला, कोणत्याही नावाची गरज नसते… कारण, न सांगता जुळणाऱ्या नात्यांची, परिभाषाच काही वेगळी असते… विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा, कुठे तरी काही चांगले घडत असते…*_
✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨

✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨
_*माणूस अपयशाला भीत नाही. अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही.? तर याची त्याला भिती वाटते. बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोहचणं ही शोकांतिका जास्त भयाण. खरं तर सगळे कागद सारखेच… त्याला अहंकार चिकटला की, त्याचे सर्टिफिकेट होते. रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही. त्याचा त्रास होतो. पण त्याही पेक्षा जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही याचा होतो.*_
✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨

: ✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨
_*जीवनात काही मिळवायचे असेल तर निश्चितच नम्र, लीन असावे लागते. जे खोटं असते, ते ऐकायला गोड असल्याने सर्वांना आवडते, पण सत्य मात्र बहुधा कडू असल्याने कुणालाही पचवता येत नाही. विहीर खणत असताना काठावर बसणाऱ्या लोकांचं लक्ष विहिरीतील दगडाकडे नसतं तर त्या दगडामध्येही कुठ तरी पाणी दिसतंय का हेच ते पाहत असतात, आपल्या आयुष्यात येणाऱ्या माणसाचं निरीक्षण करतानाही त्यांच्यातील वाईट गोष्टी ऐवजी चांगले गुण शोधण्याचा प्रयत्न करा, नक्कीच चांगल्या गोष्टी सुद्धा सापडतील..!*_
✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨

✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨
_*जगण्याचा तोल हा असा असतो. कुणाला क्षणभराचे रंग मिळतात.. कुणाला सुंदर क्षण मिळतात.. कुणाकडे जग सहज मान उंचावून पाहते.. तर कुणाला मिळते फक्त जगण्याचं बीज.. त्यातून आपण फुलायची जादू मात्र शिकून घ्यायची असते.. एकदा ती जादू आली की रंग कुणाकडे मागावे लागत नाहीत.. ते उमलत राहतात.. बहरत राहतात...*_
✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...