*कोणालाच...*
*जीवनाच्या कोणत्या वळणावर,*
*आपली कोणाशी गाठभेट होणार आहे,*
*याची पूर्वकल्पना नसते.*
*प्रत्येकाशी आपलं रक्ताचं नातं,*
*असू शकत नाही...*
*म्हणून ईश्वरी कृपेने काही माणसं,*
*अद्भुतरित्या आपल्या जवळ येतात,*
*जसं की नदीच्या प्रवाहात वाहताना,*
*दोन ओंडके अचानक एकत्र येतात.*
*सोबत कुठपर्यंत असेल,*
*ते काहीच निश्चित नाही.*
*पण काही काळ एकत्र प्रवास होऊन,*
*पुढे वेळ आल्यावर विलग होतात.*
*अशी नाती खरंच अद्भुत असतात,*
*पण फक्त ती जपण्याची जाणीव,*
*आणि आस्था...*
*आपल्यात असायला हवी.*
*नात्यांमध्ये आस्था असावी,*
*पण आसक्ती नाही...*
*कारण...*
*कोणीही सोबत जन्माला येत नसतं.*
*आपण एकटेच जन्माला आलो,*
*आणि एकटेच जाणार...*
*हे कायम लक्षात असू द्यावं,*
*मग आसक्ती निर्माण होत नाही.*
*मूळात आपला जन्म कशासाठी झाला आहे,*
*हे गूढ उकलता आलं,*
*तर पुढचा सर्वच प्रवास सुखकर होतो.*
*आणि ते उकलण्याचा एकमेव मार्ग,*
*ध्यान साधना...*
*प्रारब्धात ठरल्याप्रमाणे,*
*कोणाकडून काही घेणं असेल,*
*किंवा आपण कोणाचं देणं लागत असू,*
*तर वेळ आल्यावर त्या प्रत्येक जीवाच्या भेटीचं प्रयोजन कळतं,*
*म्हणून फक्त आपण,*
*कर्म करत राहावं इतकंच!*



No comments:
Post a Comment