
*आपले विचार हेच...*
*आपल्या भविष्याचा चेहरा आहे.*
*नकारात्मक विचार केला तर,*
*प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणीच दिसतील,*
*आणि सकारात्मक विचार केला तर,*
*प्रत्येक अडचणीमध्ये संधी* *दिसेल.*
*एखाद्या झाडाच्या फुलाला वाढण्यासाठी,*
*सुर्य प्रकाशाची जशी आवश्यकता असते.*
*तसेच...*
*आयुष्यात मानवाच्या व्यक्तीमत्व विकासासाठी,*
*चांगले विचार व नम्र संस्कारांची आवश्यकता असते.*
*रोपटे आणि मानवाला,*
*योग्य व आवश्यक गोष्टी मिळाल्या,*
*म्हणजे ते भरभरून फुलतात,*
*व खुलतात...*
*आणि समोरच्याचे लक्ष वेधून घेतात.*
*आपुलकीचे चार शब्द,*
*मनापासुन बोलता आले की,*
*आयुष्यात हितचिंतकांची,*
*कमतरता भासत नाही.*
*घड्याळाच्या गजरापेक्षा,*
*ज्यांना जबाबदारी जागं करते,*
*ती माणसे आयुष्यात,*
*योग्य दिशेने पावलं टाकत असतात.*
*सुखाच्या शोधात लोक,*
*आयुष्यभर वणवण फिरतात.*
*दमल्यावर जाणीव होते,*
*समाधानातच सुख आहे.*
*सुंदर आयुष्य सहज घडत नसतं.*
*तर ते जाणीवपूर्वक घडवावं लागतं,*
*ते म्हणजे प्रार्थनेतून,*
*माणुसकीतून,*
*त्यागातून,*
*आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कृतीतून घडत असतं.*
*माणसाजवळ त्याच्या आयुष्य भराची संपत्ती म्हणजे,*
*त्याचे चांगले विचार,*
*कारण...*
*धन आणि बळ कोणत्याही माणसाला,*
*वाईट मार्गावर नेऊ शकतात,*
*परंतु चांगले विचार,*
*माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी,*
*प्रेरित करीत असतात,*
*आयुष्य आनंदी ठेवायचे असेल,*
*तर स्वाद,आणि वाद,या दोन्ही गोष्टींचा त्याग केला पाहिजे.*
*स्वाद सोडला तर शरीराला फायदा,*
*आणि वाद सोडला...*
*तर नात्याला फायदा...!!*



*जगता आलं पाहिजे...*
*मरता केव्हाही येतं,*
*पण जगता आलं पाहिजे.*
*सुख भोगता केव्हाही येतं,*
*पण दुःख पचवता आलं पाहिजे.*
*रंग सावळा असला म्हणून काय झालं,*
*कर्तृत्व उजाळता आलं पाहिजे.*
*रंग गोरा असला म्हणून काय झालं,*
*मनावरील काजळी काढता आली पाहिजे.*
*यशानं माणूस उंच जातो,*
*पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजेत.*
*मिळालेल्या यशात समाधान मानून,*
*आनंदी जीवन जगता आलं पाहिजे.*
*पाप काय कसंही करता येतं,*
*पण पुण्य करता आलं पाहिजे,*
*ताठ काय कोणीही राहतं,*
*पण जरा झुकून वागता आलं पाहिजे.*
*ठेच जीवनात लागतेच,*
*ती सहन करता आली पाहिजे,*
*मलमपट्टी करून तिला,*
*पुन्हा चालता आलं पाहिजे.*
*शहाण्याचं सोंग घेऊन,*
*वेडं होता आलं पाहिजे.*
*कशालाही बळी न पडता,*
*आनंदी जगता आलं पाहिजे.*
*जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल,*
*ती उणीव भरुन काढता आली पाहिजे.*
*हास्य आणि अश्रूचा मिलाफ करून,*
*फक्त समाधानी राहता आलं पाहिजे.*
*आयुष्य खूप सुंदर आहे,*
*भरभरून जगता आलं पाहिजे...!!*



*आपुले आपण जाणावे स्वहित l*
*जेणे राहे चित्त समाधान ll*
*बहुरंगे असे माया विखुरली l*
*कुंठितची होता झाली बरी ll*
*पुजा ते अबोला चित्ताच्या प्रकारी l*
*भाव विश्वंभरी समर्पावा ll*
*तुका म्हणे गेला फिटोनिया भेद l*
*मग होतो देव मनाचाची ll*
*भावार्थ:-*
*आपले स्वतःचे हित,*
*कशामध्ये आहे,*
*ते आपले आपल्यालाच समजायला हवे.*
*आपल्या हिताची जी गोष्ट असेल,*
*तिच निवडता आली म्हणजे,*
*आपले मन समाधानी होईल.*
*या जगामध्ये अनेक रंगाढंगांमध्ये माया भरलेली आहे.*
*हे वेगवेगळे रंगढंग माणसाला चक्रावून टाकतात.*
*या मायाजालामध्ये,*
*स्वतः ला अडकवून न घेता,*
*आयुष्य जगता आले पाहिजे.*
*आपण मनापासून निश्चित केलेल्या ध्येयावर,*
*शांतपणे आपले सगळे लक्ष केंद्रित करावे.*
*आपले ध्येय म्हणजेच,*
*आपला परमेश्वर मानावा.*
*तुकाराम महाराज म्हणतात,*
*मनामध्ये निर्माण होणारे,*
*विचारांचे काहूर नाहिसे झाले म्हणजे,*
*आपल्या शुध्द अंतःकरणातच,*
*देव प्रकट होईल...!!*
*
रामकृष्णहरि 
*

रामकृष्णहरि 
*
No comments:
Post a Comment