Saturday, December 10, 2022

 🌺 

*ताकद आणि पैसा...*
*हे जीवनाचे फळ आहे.*
*परंतु कुटुंब आणि मित्र,*
*हे जीवनाचे मुळ आहे.*
*आपण एक वेळ फळाशिवाय राहू शकतो.*
*पण मुळाशिवाय उभे नाही राहू शकत.*
*कारण...*
*मुळ कुजले की मोठे वृक्षही उनमळतात.*
*तेव्हा नाते जपा,*
*कठीण प्रसंगी तेच कामी येतात...*
*सगळ्यांचा आयुष्यात,*
*दोन प्रकारचे लोक येतात.*
*एक म्हणजे तुम्ही चुकलात,*
*तर ती चूक सुधारण्यासाठी,*
*मार्गदर्शन करणारे...*
*आणि दुसरे असतात,*
*ते म्हणजे तुमची एक चूक कधी होईल,*
*आणि तुम्ही कधी लोकांच्या नजरेत वाईट होणार ₹,*
*ह्याची वाट बघणारे...*
*आपल्या निःस्वार्थी कर्माने,*
*दुसऱ्यांच्या मनात घर करून जगणे.*
*हीच जीवनातील सर्वात मोठी कमाई आहे.*
*काही वेळा"आपली चुक नसतांनाही,*
*शांत बसणं योग्य असतं,*
*कारण...*
*जोपर्यंत समोरच्याचं मन,*
*मोकळं होत नाही,*
*तो पर्यंत त्याला त्याची चुक लक्षात येत नाही.*
*मोडतोड करायला ज्ञान लागत नाही,*
*परंतु तडजोड करायला मात्र,*
*खुप शहाणपण लागते...*
*ना दूर रहने से रिश्ते टूट जाते हैं;*
                    *और;*
*ना पास रहने से जुड़ पाते हैं;*
*यह तो एहसास के पक्के धागे है;*
                     *जो;*
     *बस खास लोगों को ही;*
             *समझ में आते है;*

                🙏🏻🌹🙏🏻

🌺 
*अनुभवामुळेच चांगला निर्णय घेता येतो,*
*मात्र दुर्भाग्य हे आहे की,*
*अनुभवाचा जन्म...*
*नेहमी चुकीच्या निर्णयामुळेच होतो.*
*पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा,*
*आयुष्याची पलटणारी पानं,*
*ही खूप काही शिकवून जातात.*
*वेळेवर वेळ देणारा माणूस,*
*वेळेवर भेटला की,*
*चांगली वेळ यायला वेळ लागत नाही.*
*किंमत न बघता वस्तू विकत घ्यायची असेल,*
*तर वेळ न बघता मेहनत करावी लागते.*
*हे वेळ निघून गेल्यावरच लोकांना कळतं.*
*जपलं असतं तर संपलं नसतं,*
*मग ती संपत्ती असो किंवा नाती.*
*आपल्या आयुष्यात येणारी माणसंही,*
*झाडांच्या अवयवासारखीच असतात.*
*काही फांदीसारखी,*
*जास्त जोर दिला की तुटणारी.*
*काही पानासारखी,*
*अर्ध्यावर साथ सोडणारी.*
*काही काट्यासारखी,*
*सोबत असून टोचत राहणारी.*
*आणि काही मुळांसारखी,*
*न दिसताही सुरुवातीपासुन,*
*शेवटपर्यंत साथ देणारी.*
*एखादी व्यक्ती अशी का वागते,*
*हे शोधण्यात,*
*अन्वय लावण्यात,*
*खूप एनर्जी वाया जाते.*
*वेळ जातो.*
*स्वत:चा तो पराभव पचवता येत नाही.*
*जगात कितीही प्रकारचे आनंद असले,*
*तरी त्यातला सर्वात मोठा आनंद,*
*आपण समोरच्या व्यक्तीला करेक्ट ओळखलं,*
*हाच असावा.*
*त्यात अहंकाराची तृप्ती असते,*
*म्हणून तो आनंद सर्वश्रेष्ठ.*
*प्रत्युत्तर द्यायलाच सामर्थ्य लागतं.*
*असं नाही...*
*तर कधी कधी सहन करून,*
*शांत राहायला सुद्धा,*
*सामर्थ्य लागतं...*
*प्रॉब्लेम्स नसतात कुणाला.?*
*ते शेवटपर्यंत असतात.*
*पण प्रत्त्येक प्राॅब्लेमला,*
*उत्तर हे असतंच.*
*ते सोडवायला कधी वेळ हवा असतो,*
*माणसाचं वय दिवसांनी मोजणं चुकीचं आहे.*
*कुणी किती सोसलं,*
*त्याप्रमाणात वय मोजणं आवश्यक आहे.*
*वेदना ह्या दिसत नाही,*
*तरी रडून जातात...*
*आठवणी ह्या थांबत नाही,*
*तरी जीव गुंतून जातात...*
*मन हे समजत नाही,*
*तरी जाणीव करून जातात...*
*ह्रदय हे दिसत नाही,*
*तरी लोक ह्रदयात घर करून जातात,*
*दु:खाने आयुष्याच्या चिंध्या जरी झाल्या,*
*तरी त्यातुन सुध्दा तलम वस्त्र,*
*निर्माण करण्याची हिंमत आपल्यात असावी.*
*सुंदर आयुष्य सहज घडत नसतं,*
*तर ते जाणीवपूर्वक घडवावं लागतं,*
*ते म्हणजे प्रार्थनेतून, माणुसकीतून,*
*प्रेमातून,*
*त्यागातून,*
*आणि सर्वात महत्वाचे म्हणजे,*
*कृतीतून घडत असतं...!!*

                🙏🏻🌹🙏🏻


🌺 
*आयुष्य ही फार अवघड शाळा आहे,*
*कॉपी करता येत नाही,*
*कारण...*
*प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते.*
*आयुष्य जगायला मिळणं,*
*हा प्रत्येकाच्या नशिबाचा भाग आहे.*
*मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे.*
*पण लोकांच्या मनात जिवंत राहणं,*
*हा फक्त कर्माचा भाग आहे,*
*एकट्या सुईचा स्वभाव,*
*टोचणारा असतो,*
*परंतु धागा सोबतीला आला की,*
*हाच स्वभाव बदलून,*
*एक दुसऱ्यांना जोडणारा बनतो.*
*नकारात्मक दृष्टिकोन हा,*
*पंक्चर झालेल्या टायरसारखा असतो,*
*त्याला बदलल्याशिवाय,*
*तुम्ही पुढे जाऊ शकत नाही.*
*चूक ही आयुष्याचं एक पान आहे.*
*पण नाती म्हणजे...*
*आयुष्याच पुस्तक आहे.*
*गरज पडली तर चुकीचं पान,*
*फाडून टाका...*
*पण एका पानासाठी,*
*अख्खं पुस्तक गमावू नका.*
*आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे,*
*जी जन्मापासून मृत्यूपर्यंत,*
*सुख दुःखाच्या फलाटांवर थांबते,*
*आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी,*
*प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पडते!*
*आयुष्य जगायचे असेल,*
*तर त्रास हा होणारच,*
*नाहीतर मेल्यावर,*
*आगीचे चटके सुद्धा जाणवत नाहीत.*
*मनाप्रमाणे एखादी गोष्ट घडली की,*
*आपण आनंदी होतो,*
*विरोधात घडली की दुःखी होतो,*
*आणि स्वतःविषयीच नाराज होतो.*
*पण आयुष्य हे असेच असते.*
*सुखदुःखाचे हेलकावे घेतच चालावे लागते.*
*आकाशात जेव्हा ऊन,*
*आणि पावसाचा संघर्ष असतो,*
*तेंव्हाच इंद्रधनुष्य तयार होते.*
*आयुष्य सजवायचे असते,*
*ते अशा इंद्रधनुष्यांनी.*
*तडजोडीमुळे नुकसान होत नाही,*
*तर संधी मिळते,*
*इंद्रधनुष्य फुलवण्याची.*
*दुस-याच्या नशिबाची बरोबरी,*
*आपल्या नशिबाशी करत बसू नका.*
*आपलं सुख कशात आहे,*
*हे शोधा...*
*आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा.*
*कारण...*
*सदगुरु सांगून गेलेत,*
*जगी सर्व सुखी असा कोण आहे.*
*विचारी मना तूच शोधुनी पाहे!!*
*आयुष्याची गणितं खरंतर,*
*बोटावर सोडवण्याइतकी सोपी असतात,*
*पण भीतीचे आकडे,*
*समाजाची काळजी,*
*आणि क्षणिक सुखाची ओढ,*
*अख्खा हिशोब चूकवतात.*
*माना की वक़्त,*
*सता रहा है;*
*मगर कैसे जीना है;*
*वो भी तो बता रहा है;*
*जीवनाचा प्रवास हा असाच असतो,*
*चढ आला तर कष्टाने चढायचा,*
*आणि उतार आला तर,*
*त्याचा आनंद लुटायचा...*
*सगळीच स्वप्न पुर्ण होत नसतात,*
*ती फक्त पहायची असतात,*
*कधी कधी त्यात रंग*
*भरायचे असतात,*
*पण...*
*स्वप्न पुर्ण झालं नाही,*
*तर दुखी व्हायच नसतं.*
*रंग उडाले म्हणुन चित्र फाडायचं नसतं,*
*फक्त लक्षात ठेवायच असतं,*
*सर्वच काही आपल नसतं.*
*पढ़ो और समझो...*
*धुंआ दर्द बयाँ करता है;*
*और राख कहानियां छोड़ जाती है;*
*कुछ लोगों की बातों में भी दम नहीं होता;*
*और*
*कुछ लोगों की खामोशी भी;*
*निशानियां छोड़ जाती है;*
*दुनिया का दस्तूर भी कितना अजीब है;*
*लोग इतनी जल्दी बात नहीं मानते हैं;*
*जितनी जल्दी बुरा मान जाते हैं;*
*असंख्य दुःखांना लपवून,*
*चेहऱ्यावर स्मित हास्य निर्माण करणं,*
*या सारखं बोलकं नाटक,*
*कोणतं असू शकतं.*
*सहकार्य आणि सत्कर्म,*
*आवाज न करता केले तर,*
*त्यातून निर्माण होणारे*
*माधुर्य,*
*आणि समाधान,*
*हे अतुलनीय असते...!!*

                🙏🏻🌹🙏🏻

🌺 
*II मनोमन देवाचे आभार मानावे II*
*मनुष्याच्या जीवनात केव्हातरी,*
*असा प्रसंग येतो की,*
*तो अतिशय हतबल होतो,*
*अशा या कठीण प्रसंगी तो,*
*देवाचा धावा करतो.*
*अनेक व्रते,उपवास करतो,*
*पण देव त्याला लवकर मदत करत नाही.*
*परंतु एक घटना मात्र निश्चित घडते,*
*आणि ती म्हणजे एखादी व्यक्ती,*
*आपल्या पाठीशी उभी रहाते,*
*आणि संकटात आपली इतकी मदत करते की,*
*त्या संकटातून आपण सहज बाहेर पडतो.*
*आपण नंतर म्हणतो सुध्दा की,*
*त्यांनी अगदी देवासारखी मदत केली,*
*येथे एक गोष्ट लक्षात ठेवावी की,*
*हे सर्व ईश्र्वराच्या मर्जीनुसार घडते,*
*आणि ती मदत सुध्दा,*
*ईश्र्वर करत असतो.*
*मदत करणाऱ्या व्यक्तीला,*
*बुध्दीयोग देण्याचे कार्य सुध्दा,*
*ईश्र्वराचेच आहे.*
*पुढे जेव्हा आपले भाग्य,*
*आपल्याला साथ देते,*
*व आपण वैभवाच्या उच्च शिखरावर जातो,*
*तेव्हा काळाच्या ओघात ही झालेली मदत,*
*आपण विसरतो...*
*असे घडू नये म्हणून,*
*वर्षातून किमान एकदा तरी,*
*आपण स्वतःअगदी एकटे बसावे,*
*आणि आपल्या कठीण प्रसंगी,*
*मदत केलेल्या व्यक्तींची आठवण करावी.*
*आणि मनोमन देवाचे आभार मानावे,*
*आणि एक निश्चय करावा की,*
*आपणही अशीच कोणाची मदत करू,*
*जेणेकरून ईश्र्वराची ही व्यवस्था,*
*अव्याहतपणे चालू राहील...!!*

                🙏🏻🌹🙏🏻

🌺 

*डोक्यावरचा कचरा...*
*साबण, शाम्पू अशा माध्यमांचा वापर करून,*
*सहज धुऊन टाकता येतो,*
*परंतु डोक्यात असलेला कचरा,*
*धुऊन टाकणे खूप अवघड आहे.*
*साबण, शाम्पूच्या आवाक्यातील ही गोष्ट नाही.*
*आपल्या मानसिक अवस्थेचे,*
*प्रतिबिंब आपल्या कृतीत उतरत असते.*
*मानसिक अवस्था म्हणजेच,*
*डोक्यातील कचरा असतो.*
*आपण कितीही सधन असलो,*
*कितीही बलवान असलो,*
*कितीही हुशार असलो,*
*तरीही आपले डोके,*
*आपण स्वच्छ आहे,*
*अशी खात्री,*
*यापैकी कोणालाच नसते.*
*डोक्यातील कचरा सर्वात जास्त,*
*आपल्या स्वतःलाच त्रास देत असतो.*
*आपण कितीही विसरायचा प्रयत्न केला,*
*तरी काही गोष्टी विसरत नाहीत.*
*घडून गेलेला प्रतिकूल प्रसंग,*
*त्या क्षणाला वेदना देऊन जातो,*
*पण ज्या क्षणाला तो आठवतो,*
*त्या क्षणाला तो पुन्हा तेवढीच वेदना देतो,*
*कदाचित प्रत्यक्ष प्रसंगाच्या वेळी,*
*होणाऱ्या वेदनेपेक्षा आठवण झाल्यानंतर होणारी वेदना,*
*ही जास्त तीव्र असते.*
*हा डोक्यातील कचरा,*
*कोणालाच नको असतो,*
*कोणालाही हा आवडत नाही,*
*परंतु हा जाता जात नाही.*
*अशा विचलित अवस्थेत विसरणे,*
*किंवा विसराळूपणा हा सुद्धा एक चांगला गुण आहे,*
*असे वाटून जाते.*
*डोक्यावर बसलेली माणसे,*
*फेकून देता येतात,*
*परंतु डोक्यात बसलेली माणसे,*
*काही केल्या निघत नाहीत.*
*ही सतत आपल्या डोक्यात वार करत राहतात,*
*आणि कायमची डोकेदुखी होऊन बसते.*
*जी माणसे आपल्या डोक्यात गेलेली असतात,*
*त्यांना याची कल्पनाही नसते,*
*कदाचित ती विसरूनही गेलेली असतात,*
*परंतु आपण मात्र त्यांना डोक्यात घेऊन फिरत असतो.*
*या अनुभवाला शक्यतो कोणीही सामान्य माणूस अपवाद असू शकत नाही.*
*डोक्यातील कचरा साफ करण्याची सोपी पद्धत आहे,*
*ती म्हणजे,आपल्या जीवनात येणारा कोणताही प्रसंग,*
*जसा आहे तसा स्वीकारावा.*
*प्रत्येक प्रसंगाला आपली प्रतिक्रिया ही शून्य असावी.*
*कारण घडून गेलेल्या प्रसंगाला बदलण्याची ताकद कोणातच नसते,*
*परंतु प्रसंगाला प्रतिक्रिया देणे,*
*नक्कीच आपल्या हातात असते.*
*या प्रतिक्रिया थयथयाट करणाऱ्या,*
*किंवा यशाने उन्मत्त होणारऱ्या असल्या,*
*तर आपल्या डोक्यात तो कचरा निश्चित घुसला,*
*असे समजावे.*
*प्रतिक्रिया शून्य असेल,*
*तर घडलेल्या प्रसंगाचा आपल्यावर वर्तमानात,*
*आणि भविष्यातही कोणताही परिणाम होत नाही.*
*जीवनात येणारा प्रसंग जसा आहे,*
*तसा स्वीकारण्यासाठी,*
*आणि त्याच्यावर आपली प्रतिक्रिया शून्य होण्यासाठी,*
*आपल्या जीवनात स्थितप्रज्ञता यावी लागते.*
*ही स्थितप्रज्ञता पैशाने, ज्ञानाने,व्यायामाने,प्रतिष्ठाने, पदाने येत नाही,*
*तर यासाठी साधना करावी लागते.*
*साधना करत असताना, माणूस अंतर्मुख होतो.*
*त्यामुळे त्याला देहाचे तदाम्य सोडता येते.*
*विदेही अवस्था प्राप्त झाली की,*
*देहाशी संबंधित असलेल्या सर्व दुःखाचे समूळ उच्चाटन होते.*
*आत्म्याचे स्वरूप आत्मसाक्षात्काराने प्रत्ययास येते,*
*आणि आपल्या आत्मिक सामर्थ्याचे ज्ञान होऊन,*
*सत्चिदानंद अवस्थेची प्राप्ती होते.*
*या अवस्थेत गेल्याशिवाय,*
*डोक्यातील कचरा कोणालाही,*
*साफ करता येत नाही...!!*

*आयुष्याच्या साधने ।*
*सत्चिदानंद पदवी घेणे ।।*
*तुका म्हणे पावटणी l* 
*करू स्वर्गाची निशाणी ।।*

                🙏🏻🌹🙏🏻

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...