Friday, December 16, 2022

 🌺  🌺  🌺  🌺  🌺  🌺  🌺  🌺  🌺  🌺 

*आत्मपरीक्षण करणे,*
*हा आपल्यात सुधारणा करण्याचा,*
*सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे.*
*पण ते कसे करायचे.?*
*हेच माहीत नसल्याने गोंधळ होतो.*
*आत्मपरीक्षणाची सुयोग्य पद्धत अशी की,*
*पहिल्यांदा आपल्या मनातील,*
*सद्विचारांचा पाठपुरावा करायला शिकावे.*
*ते विचार तातडीने अंमलात आणावेत.*
*आपली चूक कोणी लक्षात आणून दिली,*
*तर ती लगेच कबूल करावी.*
*व त्या चुकांची दुरुस्ती करण्यात,*
*आपला अहंकार अजिबात आड येऊ देऊ नये.*
*या तीन गोष्टी साधल्या तरच,*
*खरे आत्मपरीक्षण होऊन,*
*आपल्या स्वभावात, वागण्यात,*
*व विचारांमधे सकारात्मक बदल घडून,*
*आपले जीवन अधिक सुखकर होते.*
*सर्वसामान्यांबरोबरच साधकांसाठी तर,*
*आत्मपरीक्षण ही,*
*विशेष आवश्यक गोष्ट आहे...!!*

                 🙏🏻🌹🙏🏻

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...