Friday, December 16, 2022

--नाते--

 ️🌹नाते🌹


*नाते नवरा बायकोचे हे सात जन्मासाठीचे असावे पण एकमेकांनच्या अंत:करणापासुंन मरेपर्यंत एकत्र असावे.*

*नवरा किंवा बायको म्हणून सात जन्म हवी असलेली व्यक्ती मधूनच सुटून जाते, तेव्हा काय वाटतं. याला शब्दात मांडता येत नाही. खरचं सांगायचं तर प्रचंड राग येतो. 'एकटेपणा' इतकं असह्य जगात दुसरं काहीही नसावं आणि तो एकटेपणा देणारा माणूस आपल्याच नशीबी येणं, हे प्रचंड त्रासदायक आहे.*

 *'मीच का' 'मलाच का' 'माझी चूक काय?' पासून तर 'सोबतच राहायचं नव्हतं तर आयुष्यात आलेच कशाला?' पर्यंत सगळेच प्रश्न फेर धरून दररोज एकदातरी मनात येतात. त्यात तुम्हाला मुलं असेल तर त्याच्या डोळ्यात मधूनच दिसणारं अनाथपण, जी जाणीव देतं, ती शब्दातही मांडता येतं नाही.*
 
*एक पालक म्हणून तुम्ही एकतर 'आई' असता नाहीतर 'वडील' . मीच माझ्या मुलासाठी 'आईवडील' दोन्ही आहे, हे नुसतचं बोलण्यापुरतं असतं. मुलांच्या नजरेत तुम्ही एकावेळी फक्त एकच असता.. आणि दुसरी जागा खाली असते.*
 
*वयाच्या कुठल्याही टप्प्यावर जिथे आपल्याला आपल्या आईवडीलांची गरज सतत जाणवते तिथे लहान मुलांना ती गरज जाणवू नये, असा कितीही प्रयत्न केला तरी तो कमीच पडतो. त्यातल्या त्यात टिनएजर मुलाचे डोळे तर सतत दुसर्‍याच्या वडीलात, आईत 'आपले पप्पा कसे असले असते?' 'आपली आई कशी वागली असती?' असाच शोध घेत असतात. जे ते सांगत नसले , लपवत असले तरी दिसतचं.*

*फार फार तर आईवडीलांनी पटत नाही म्हणून नवराबायको म्हणून वेगळं व्हावं, पण मुलांसाठी 'आईवडील' म्हणून कायम एकत्र असावं, समोर असूनही 'आयुष्यात कुठेच नसणं'... 'नसणंच' किंवा 'जे आहे' ते ' आपलं असूनही आपलं न वाटणं' हे सहन करणं, अशक्य असं अवघड आहे.*

*एखाद्याला सोडून देण्याची हजार कारणे असू शकतात. एकामेकानांच् मनःपासून' निस्वार्थ प्रेम नाही', 'काहीतरी व्यवहार पटत नाही' ' काहीतरी आवडत नाही' ' घरातल्यां कुटुंबाशी वाद आहेत' काहीही... पण एकदा सोबती म्हणून निवडलेल्या व्यक्तीने कितीही भांडलं तरी सोबतच राहावं, राग ही प्रेमाची दुसरी बाजू असते, हे समजून उमजून एकमेकांना सहन करावं, ऐकून घ्यावं, प्रेम करण्याच्या गरजेला तितकाच आर्त प्रतिसाद द्यावा... असं वाटणं... ही किती छोटी गरज आहे. पण त्या गरजाही अपूर्णच राहातात.*
     
*सोडून जाणारे, मरणारे, दुर्लक्ष करणारे, निष्काळजी किंवा मग प्रेमच न करणारे लोक दुसर्‍यांचं आयुष्य जोडीदार म्हणून पूर्णपणे त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करत असतात. मनाची शांतीच खाऊन टाकतात. जगताही येत नाही, मरताही येत नाही, प्रेमावर विश्वासही ठेवावासा वाटत नाही, नव्याने कुणाशी जुळलं तरी कायम मनात धाकधूक राहावी अशाच अस्थिर वळणावर ही माणसे आपल्याला आणून सोडतात.*

*हाती फक्त भिरभिर घेऊन दिवस कसाबसा ढकलणं आणि रात्र पुरती अंगावर येणं, कुठल्याही क्षणी फक्त 'एकटं वाटतं' हीच एक भावना आयुष्यात उरणं, आनंदातही डोळ्यात फक्त पाणीच असणं, कसाका असेना पण 'बोलायला सोबती हवाच' हे सतत जाणवणं, 'साधे दोन शब्द बोलायलाही आपलं कुणीच नसल्याची जाणीव' माणसांतून उठवणं, कुणी काही बोललं तरी होणारी चिडचिड,' न बोललं ' तरी सहन न होणारी जीवघेणी शांतता, 'भयानक टोकाचा चिडकेपणा ' लपवतांना होणारी दमछाक, 'फक्त क्षणभर का असेना ' पण कुणीतरी जीव लावणारं हवं म्हणून दरक्षणी तुटणारा जीव. हे सगळं एका क्षणानंतर सोसणंही अशक्य होऊन जातं.*

*ज्यांची घरी वाट पाहाणारं कुणीतरी आहे , त्यांना आजारी पडलेल्या माणसालाही जेव्हा दवाखान्यात एकट्याने बसावं लागतं, तेव्हा काय वाटतं. 'काय झालं' हे विचारणारंही कुणी नसतं , तेव्हा काय वाटतं. मरण्याच्या क्षणीही नेमका शेवटचा फोन ऐकणारं कुणी भेटेलचं , आणि भेटला जरी तरी त्यांना त्यांच्या जाण्याचं दुःख असेलच याची खात्री नसणं, हे कळून हातातल्या फोनकडे रोज बघतांना काय वाटतं, हे ऐकणार्‍याला कळतं नसतं, ते फक्त भोगणार्‍यालाचं कळतं.*

*ऐकणार्‍या, वाचणार्‍याला त्या फक्त गोष्टी वाटतात, सांत्वनासाठीच लिहीलेल्या गोष्टी, इतकंच...!!!*🌿🌹🌾

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...