Thursday, December 8, 2022

*🌱तुळशी विवाह सप्ताह....तुळशीचं रोप / म्हणजे मुलगी आणि मुलगी म्हणजेच महालक्ष्मी....🌷💁‍♀️🌷*

*दारा समोर अंगणा मधे*
*सुबक रांगोळी दिसावी..*
*प्रत्येक घरात कमीतकमी* 
*एक तरी मुलगी असावी..🌷*

*मुलगी म्हणजे घरासाठी*
*जीव की प्राण..* 
*तिला पाहून हरपून जातं* 
*सारं देहभान..*🌹 

*मुलगी घरात असली म्हणजे घर कसं फुलून जातं..* 
*तिचं असणं घरासाठी*
*चंदनाचा लेप होतं..🌹

*का बरं तिचेच नाव तोंडी असतं.*
*चोवीस तास येते ओठी..🌷त्याग,प्रेम,माया,काळजी*
*शब्द फक्त तिच्यासाठी..*🌹 

*आज सुकल्या सारखे दिसता* 
*बाबा काही दुखतंय का ?*🌷
*असा प्रश्न मुलगीच विचारते* 
*काळजात काही टोचतय का?...🌹*

*आई वडिलांचं मन वाचण्याची भाषा कुठून शिकते ती ?🌷*
*सारं दुःख कुशीत घेऊन* 
*इतरांसाठीच जगते ती ?🌹*

*मुलगी करते चिवचिवाट*
*म्हणून घर फुलून येतं..🌷
*असो अथवा नसो काही* 
*मन कसं भरून जातं..🌹*

*आई-बाबांच्या म्हातारपणी* 
*मुलगीच होते त्यांची आई..🌷
*घर कितीही मोठं असो*
*"मुली" शिवाय श्रीमंती नाही...🌹*

*मुलीसाठी देवा समोर*
*हात जोडून बसलं पाहिजे..🌷
*प्रत्येकाच्या अंगणा मधे* 
*"तुळशीचं रोप "असलं पाहिजे..🌷🌱🌷*

*✍🌱तुलशी विवाह सर्व महालक्ष्मी मातापित्याच्या लाडक्या लेकींसाठी....👏🏻* 

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...