
उत्तर १) विषय शेवटपर्यंत वाचा माऊली...*
*
हरी भक्त पारायण करताना कीर्तनकार आपल्या कंबरेला कसून पांढरा पट्टा का बांधतात?*

हरी भक्त पारायण करताना कीर्तनकार आपल्या कंबरेला कसून पांढरा पट्टा का बांधतात?*माझ्या माहिती प्रमाणे त्याला शेला म्हणतात.सध्या जरी फक्त कीर्तनकार तो वापरताना दिसत असले तरी पूर्वी जवळपास प्रत्येक जण तो वापरत असे.
डोक्यावर फेटा,अंगात नेहरू शर्टसारखा अंगरखा (किंवा बाराबंदी),धोतर किंवा सुरवार आणि शेला हा शिवकाळात सामान्यांचा पोशाख होता. *(आपल्या थ्री फोर्थ सारखी आखूड सुरवार असे त्याला कोपरी म्हणत)*
शेला बऱ्याच गोष्टींसाठी वापरत. त्याचे उपयोग्य खालीलप्रमाणे
१) पट्टा (पाठीला आधार म्हणून,विशेषतः लांबची घोडदौड करताना)
२) जमिनीवर बसायला सतरंजी
३) थंडीत शाल
४) पांघरूण (किंवा उशी )
५) तलवार \कट्यार खोचून ठेवण्यासाठी
६) जखम बांधण्यासाठी (रक्त थांबवण्यासाठी बँडेज म्हणून)
७) पावसापाण्यात कदाचित बॅकअप धोतर\ लंगोट
वाचण्यात येणारे ऐतिहासिक दस्तऐवज जास्त करून सैन्याशी संबंधित असल्यामुळे इतरांच्या पोशाखाबद्दल अंदाज आणि सामान्य ज्ञान याचा आधार घेतला आहे.काही चूक आढळ्यास जरूर दाखवावी
*फोटो स्रोत - गुगल*
कंसाचा वध करून मथुरेवर राज्य मिळवल्यानंतर,भगवान श्रीकृष्ण परत कधीच आपल्या घरी माता यशोदेला भेटायला का गेले नाहीत?
लग्न करताना गोत्र बघणे आवश्यक असते का?
श्रीकृष्ण आपल्या मुकुटवरती मोरपंख का धारण करत असत?
महाभारतामध्ये अर्जुनाने आपल्या भावांना का मारले होते?
*'श्री व्यंकटेश स्तोत्र'* याविषयी माहिती मिळेल का?
आपण थोडा १३ व्या शतकातील मागोवा घेतला तर कीर्तनाचे अनेक एक प्रकार असले तरी नारदी कीर्तन व वारकरी संप्रदाय कीर्तन किंवा संत कीर्तन असे दोन प्रकार जास्त प्रचलित होते.
संत ज्ञानेश्वर महाराजांनी भागवत धर्माचा पाया रचला, तरी संत नामदेव महाराज यांना आद्य कीर्तनकार म्हणून मान्यता मिळाली.
संत ज्ञानेश्वर माऊलींना समकालीन असणाऱ्या संत नामदेवांचा जन्म २६ ऑक्टोबर १२७० रोजी झाला.
अगदी लहानपणापासूनच नामदेव विठ्ठलमय झाले होते. पांडुरंगच त्यांचे सर्वकाही होता. विठ्ठलाशी ते संवाद साधत.या बालभक्ताच्या हट्टापायी विठ्ठलाने दुधाचा नैवेद्य सेवन केला,अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे.*भागवत धर्माचे आद्य प्रचारक म्हणून संत*
*माझ्या मते जो पट्टा डोक्याला असतो म्हणजेच.*
*(जी लाज डोक्याला बांधलेली असते ती समाज प्रबोधन करण्यासाठी तीच लाज कंबरेला गुंडाळावी लागते)*
तसेच कीर्तन करण्यासाठी खुप वेळ उभ राहवे लागते व मधे-मधे नाच ही करावा लागतो त्यामुळे कंबर पक्की बाँधलेली असेल तर कंबरेचा त्रास ही होत नाही…
सत्यनारायणाच्या पूजेत कथा सांगितली आहे त्यानुसार प्रसाद खाल्ला नाही म्हणून नाव बुडाली. हे कोठे घडले?
त्या कथेतच घडले.
आपल्याला ज्या गोष्टीवर विश्वास नाही,ज्याबद्दल आस्था नाही,ज्याबद्दल काहीच वाटत नाही त्याच्या सत्यासत्यतेच्या पडताळणीने काय हाती लागणार?
कुठल्याशा चर्च मध्ये म्हणे एका धर्मगुरुचे शरीर जतन करून ठेवले आहे,त्याची नखे केस अजूनही वाढतात.आता माझ्या तिथे जावून ते खोटं ठरवण्याने काय निश्पन्न होईल? ज्यांचा त्यावर विश्वास आहे तो तसाच राहील.मी उगाच त्यांच्या भावना दुखावून येईन काहीच कारण नसताना.एखाद वेळेस माझा अहंकार खुष होईल एक सामाजिक उपक्रम करून समाज सुधारणा घडवण्याचा. आणि पुन्हा लोकान्ना कशी अक्कल नाही,हे देखील मी नंतर सांगत फिरायला मोकळा.पण अखेर माझ्या बडबडीशिवाय कुणाच्याच हाती काही नाही लागणार.
तरीही जर का मला इच्छा उरलीच लोकांचे डोळे उघडायची तर मग सरकारी कार्यालयात कसा भ्रष्टाचार चालतो किंवा वाळूची चोरटी वाहतूक करणारे कसे पोलिसांशी हातमिळवणी करून बिनबोभाट काम करतात,किंवा तुमच्या घराजवळचाच नवीन केलेला रस्ता वर्षभराच्या आतच खणून गेला याबद्दलही *"पुराव्यासहीत"* आवाज उठवता येवू शकतो, ज्याने कदाचित आपल्या सह इतर समाजालाही मदत होवू शकते. पण ते करायला हिम्मत लागते, प्रसंगी जीव जावू शकतो.
तुलनेने पुराण कथेतली होडी कशी बुडाली याबद्दल जागृती निर्माण करणं सोपं आहे.कारण ते आपण बुड न हलवता घरात बसून हवे तेवढे ताशेरे ओढू शकतो. होतकरू विज्ञान प्रेमी त्याला *"लाईक"* करून पाठिन्बाही जाहीर करून देतात. बहुधा सध्याच्या सोधल मीडीयाच्या जगात एखादी पोस्ट टाकणं एवढीच समाज जागृती पुरेशी वाटत असावी.त्या बुडलेल्या होडीला एवढाच विरोध असेल तर एक १० लोकांचा गट जमवून घरोघरी जावून प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे.त्यातून कदाचित काहीतरी निश्पन्न होईल.फेसबुक,किंवा कोरावर पोस्ट टाकून नाही.प्रत्यक्ष कृतीने समाज बदलतो,जाग़्रुती येते. नुसत्या गप्पान्नी वेळ छान जातो. या पलिकडे फारसं काही होईल असं वाटत नाही.
राहिला होडीचा प्रश्न,तर त्या होडीला ना पुजा घालणारे गांभिर्याने घेतात,ना ती कथा सांगणारा गांभिर्याने घेतो,ना कथा ऐकून प्रसाद खाणारे घेतात.तुमच्या माझ्या एवढाच त्यांच्याही *"कॉमन सेन्स"* वर आणि विचारांवर माझा विश्वास आहे.आपण आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी जशा *"औपचरीकता"* म्हणून करतो.(रोज शुभ प्रभात - शुभ रात्र चे मेसेजेस,कुणाला धक्का लागला तर सॉरी,कुणी काही दिलं तर थॅन्क यू,कुणी काही देत असेल तर खोटं खोटं हसून उगाच केलेलं 'नको नको, कशाला' ई. ई. पैकी प्रामाणिक भावना आपल्या मनात कश्शा कश्शाबद्दल नसते तरीही आपण ते सामाजिक रुढींचा भाग म्हणून करतोच ना) त्या प्रमाणेच पारंपारीक कथेचा भाग एवढी औपचारिकता मानूनच ह्या सगळ्या कथा ऐकल्या जातात. कुणीही त्या गांभिर्याने घेत नाही.त्यामुळे त्याच्या खोलात शिरण्यात अर्थ नाही.कथा संपली की लोक ती विसरून पुढल्या कामाला लागतात, तेवढे ते सूज्ञ असतात.पूजा घालत असूनही ते एवढे अलिप्त राहू शकत असतील तर विश्वास नसलेल्या तुमच्या माझ्या सारख्यान्ना त्या *"अवैज्ञानिक"* किंवा "पुरावा नसलेल्या" कथा वाटण्या इतपत त्या कथेला गांभिर्याने घ्यायचं कारण काय?
धर्मजागृती सुरूच करायची असेल तर आपल्या दैनंदिन जीवनातल्या अगदीच मुलभूत गोष्टींपासून करावी लागेल - त्याची सुरुवात आपण सकाळी उठून दात घासायला सुरुवात केल्यापासून रात्री शेवटची जांभई देईपर्यंत काय काय बोललो,काय काय वागलो हे जर का ताडून बघयला सुरुवात केली तर आपल्यालाच ती जाणीव होवून फेस येईल. तिथून (स्वत:पासून) सुरुवात करण्याची तयारी (आणि प्रचंड हिम्मत असेल) तरच ते होईल. अन्यथा पुजेतली एक कथा बदलून समाज बदलणार नाही. तसा बदलला असता तर सत्यनारायण न पुजणारे भारतात करोडो आहेत. ते अगदीच विज्ञाननिष्ठ असले असते.पण तसं नाही होत. कारण आपण ज्या बदलू बघतो त्या गोष्टी फारच ढोबळ असतात.मुलभूत नसतात.
*व्यक्तिश:* मला श्री.सत्यनारायणाची कथा कधीच पटली नाही.
आमच्या घरी दरवर्षी पूजा होते गणपतीच्या दिवसात.किंवा लग्न,बारसं,वास्तुशांत किंवा कुठलही शुभकार्य घरात झालं की असतेच असते.कॉलेजमध्ये असताना घरात श्री.सत्यनारायण बंद करण्याचा कडक विचार माझ्या बुद्धेवादी मेंदूने घेतला.पण घरातल्या १५ लोकांसमोर ती मागणी ठेवण्याची हिन्मत नव्हती झाली तेव्हा.नंतर काही काळाने त्या पुजेचे फायदे लक्षात आले. पूजेच्या निमित्ताने सगळेजण विनतक्रार घराची साफसफाई करतात,रांगोळ्या काढतात,घर सजवलं जातं,घरात जरा प्रसन्न वातावरण रहातं.जेवायला चार माणसं जास्त असतात,नैवेद्याचं जेवण असल्यामुळे चार पदार्थ जास्त केले जातात, जवळपासचे पाहुणे घरी येतात कार्यक्रम असल्याप्रमाणे.पण त्यातला सर्वात आवडता भाग म्हणजे पुजे आधी आपण गावातल्या प्रत्येक घरात जावून पुजेचं आमंत्रण देवून येतो, आणि पुजेदिवशी संध्याकाळी गावातल्या प्रत्येक घरातला एक तरी माणूस आपल्या घरी तीर्थप्रसादाला येवून जातो.या निमित्ताने गावातल्या प्रत्येक घराशी मी आणि त्या घरातला किमान एक जण त्या एका निमित्ताच्या जोरावर जोडले जातो.हा फायदा माझ्या लक्षात आला तेव्हा माझा श्री.सत्यनारायणावरचा राग गेला.कारण जेव्हा मी घरी आलेल्या गावातल्या लोकांच्या हातावर प्रसाद ठेवतो,तेव्हा तो प्रसाद ज्याच्या पुढ्यातून उचलून आणला त्या श्री.सत्यनारायणावर माझा विश्वास नसेल भलेही,पण तो घेताना हसत मुखाने समोरून आलेला प्रश्न "दिसला नाहीस बरेच दिवस, कुठे असतोस सद्ध्या?" आणि त्यानंतर झालेली एकमेकांच्या ख्याली खुशालीची चर्चा मला खूप जास्त सुखावून जाते.
*थोडक्यात काय,*
श्री.सत्यनारायणाच्या प्रसाद लांबच राहू द्या.पण सकाळी गाडी चुकेल म्हणून आपल्यातले अनेक जण देवाला हात न जोडताच धावत निघतात रोज कामावर,कॉलेजला,शाळेत जाताना.अहो उठायला उशीर होतो मग कसतरी उरकत निघतो आपण पाण्याच्या घोट ही न घेता, देवाकडे लक्ष द्यायला वेळ कुठेय? तरीही सगळ्यांच्या सगळ्या गाड्या सुरक्षीत वेळेत आपपल्या जागी जातायत, पुन्हा संध्याकाळी परत घरी घेवूनही येतायत. केवळ प्रसाद खाल्ला नाही म्हणून आपली गाडी उलटवायला देव म्हणजे काय आपल्या भागातला राजकारणी आहे का? ती फार सर्वोच्च शक्ती आहे पृथ्वीवरच्या एक कणभर माणसाने काहीही केलं तरी तिला फरक कसा पडेल? मग त्याची शिक्षा का देईल?
बाकी कथा काय आपणच लिहिल्यात.त्यातल्या काही समजावायला असतात,काही धीर द्यायला असतात,काही घाबरवायला असतात.शेकडो हजारो वर्षापूर्वीच्या काळातल्या माणसाच्या समजुतीतून आलेल्या कथा आहेत त्या. त्या दिवशी कदाचित तिच्या नवर्याची बोट अचानक बुडाली,कारण कळलं नाही.मग बिचार्या श्रधाळू बायकोला वाटलं असेल की अरेच्चा आपण प्रसाद खाल्ला नाही म्हणून तर नसेल ना देवाने शिक्षा केली? तेव्हा धावत घरी येवून तिने प्रसाद खाल्ला असेल आणि स्वत:ला दोष देत बसली असेल.तोपर्यंत तो बुडालेला माणूस काय तसाच पाण्याखाली रहाणार का? तो आला पोहत किनार्यावर.नंतर इतर लोकान्नी बुडलेल्या सोन नाण्याच्या पेट्या पण आणल्या बाहेर पाण्यातून.आता ही गोष्ट तिला प्रसाद खाल्यानंतर कळली असेल तर तिचा विश्वास आणखिनच दृढ झाला नसेल का? त्यासाठी चमत्कारच व्हायची गरज नसते.ती गोष्ट तिने पुढे आणखिन लोकांना सांगत राहिली असेल जन्मभर थोडासा मसाला मारून. तिच्याकडून ज्यांनी ज्यांनी ती गोष्ट ऐकली त्यांनी आणखिन स्वत:चा मसाला लावत पुढे सांगत राहिली.आपणही अशा बर्याच गोष्टी इकडच्या तिकडच्या ऐकून गप्पा रंगतात तेव्हा सांगतो नाही का? आपल्या अमुक अमुक काकांच्या अयुष्यात असं झालं, तमुक मित्राच्या वडिलांचं तसं झालं वगैरे वगैरे.अशीच बरीच वर्ष फिरत फिरत एका दिवशी सत्यनारायणावर पुस्तक लिहिणार्याला ती कळली असेल म्हणून त्याने तीही नोंदवून ठेवली असेल.अशी शक्यता असूच शकते नाही का?
*तुम्ही म्हणाल कशा वरून?*
तुम्हीच का? मीच विचारेन कशावरून हेच घडलं असेल? कदाचित सगळीच काल्पनिक नसेल कशावरून?
असूच शकते.आणि असेना का? आपल्या लहान पणी आपण रडायचे थांबलो नाही तर आपले आई वडील आपल्याला सांगायचे,गप्प बस आता नाहितर बागुलबुवा येईल, भरवताना सांगायचे जेव पटकन नाहितर अस्वल येईल आणि घेवून जाईल.आणि आपण सगळे त्या भितीने गप गुमान सगळा भात पटापट जेवायचो. आता आपल्याला सगळ्यानाच कळतं की आपण जेवलो किंवा नाही जेवलो तरी कुणीही आपल्याकडे येणार नाही.पण म्हणून आता तुम्ही भांडायला जाणार का आई वडिलांशी आपल्याला लहानपणी खोटी गोष्ट सांगितली म्हणून? कदाचित उद्या आपणच आपली मुलं हट्टी पणा करायला लागली की त्याना गप्प करायला हीच वाक्य बोलू नाहीका? कारण भीती दाखवून गोष्ट सांगून कामं होतात.
लोक जर का एकत्र बांधून ठेवायचे असतील तर तुम्हाला काहीतरी गोष्ट सांगावीच लागते, कसलीतरी समान भीती दाखवावीच लागते.सगळ्या जातीवादी संघटना नाही का दुसर्या जातीचा बागुलबुवा उभा करतात,सगळ्या धार्मिक संघटना दुसर्या धर्माचा करतात,राजकीय पक्ष दुसर्या पक्षाची भीती दाखवूनच तर सत्तेत येतात की बघा ते सत्तेत आले तर अशी वाट लावतील.
हेच माणसाच्या एकत्र रहाण्याचा प्रमुख संकेत आहे. त्यामुळे अशा एखाद्या कथेमुळे जर का माझ्या घरी १०० माणसं येणार असतील,एकमेकांच्या ख्याली खुशालीबद्दल चर्चा करणार असतील,माझ्या घरचा पाहुणचार घेणार असतील, कुठलीही नकारात्मकता न ठेवता हास्यवदनाने परत जाणार असतील तर मला त्या कथेची काहीच अडचण नाही.कारण संध्याकाळी तीर्थ प्रसाद देवून लाडू चिवडा खात गप्पा मारताना ना मला,ना समोरच्याला,ना आमच्या चर्चेला कुठेही तो बुडालेल्या बोटीचा विषय येत नाही.आमच्या दोघांच्याही दृष्टीने तिला तेवढं गांभीर्यही नाही.
कारण आमच्या आयुष्यात चर्चा करायला पुराणकथेत बुडलेल्या बोटीची सत्यासत्यता बघण्यापेक्षा इतरही अनेक महत्वाच्या गोष्टी आहेत.

जय हरी।।पांडुरंग हरी...२) उत्तर :-
वारकरी सांप्रदयात टाळ वाजवण्याची प्रथा का आहे?*
वारकरी सांप्रदयात टाळ वाजवण्याची प्रथा का आहे?**"कारण अस म्हंटल जात की टाळ वाजवल्याने "काळ" जवळ येत नाही..."*
*त्याच शास्त्रीय कारण अस आहे की टाळाच्या नादमय गर्जनेने कोणताही विषाणु वायु टाळाचा आवाज जिथं पर्यंत जातो तीथ पर्यंतच्या प्रदेशातुन नष्ट होतात...*
*साधारण हे विषाणु वायु सूर्यास्तानंतर जास्त आक्रमक होतात...*
*म्हणुन वारकरी संप्रदाय सूर्यास्तानंतर आणि सुर्योदयापुर्वीच भजन किर्तन रूपी सेवेच्या माध्यमातुन "टाळ गर्जना" करतात.* 

No comments:
Post a Comment