*शिवस्वराज्य दिन*
त्रेतायुगाचे रामराज्य
अवतरले कलियुगात
रयतेचे शिवस्वराज्य
धन्य स्थापिले भूमंडळात
धर्मनीती सुराज्य जाहले
गोरगरीब सुखात न्हाहले
जिजाईने जे स्वप्नी पाहिले
श्रीचे ईश्वरी स्वराज्य आले
ढोल नगारे, फुंकली तुतारी
पराक्रमी स्फुरल्या तलवारी
रायगडाच्या गगन शिखरी
जरीपटक्याच्या डुलती लहरी
मर्दमावळा पावन झाला
शिवप्रभु चक्रवर्ती झाला
कुटीमहालात ओथंबून गेला
आनंद स्वत्व महापूर झाला
जगताच्या कणांकणावर
शिवप्रभूंचा नाव गोंदला
दाहीदिशांच्या सीमांत
जय शिवाजी मंत्र गुंजला
बत्तीसमनाच्या सिंहासन
सुवर्णात हिरे अनमोल
मेघडंबरीत शोभे आसन
त्यात छत्रपती विराजून
देश विदेश आले धावून
शिवप्रभुला करती वंदन
गर्वाने स्फुरले मराठी मन
बलिदानी त्यागी झाले धन
राज्यभिषेक झाला राजा
अष्टप्रधानी कथली काजा
सुराज्याची घडी बसवली
शिवशकला सुरवात झाली
जय भवानी|| जय शिवाजी||
कवी : श्री निवास थळे ( रुक्मिणीकुमार)
कुर्डुस अलिबाग
No comments:
Post a Comment