*वचन*






आई आणि ताई
एकाच नाण्याच्या बाजू दोन
सांगना या दोघींची जागा
घेऊ शकते दुसरे कोण?
आईनंतर जीव टाकणारी
जगात दूसरी कोण असेल
मला वाटते ती ताई शिवाय
दुसरी कोणी नसेल
देव सर्वत्र असू शकत नाही
म्हणून निर्माण केली आई
आई फार काळ राहू शकत नाही
आईला पर्याय म्हणून देवाने जन्माला घातली ताई
खरचं सगळे लोक मनापासून
जपतात का नाती?
राग,लोभ,द्वेष,मत्सर,हेवेदावे यांनी
रक्ताच्या नात्यात कालवली माती
सुखदुःखाच्या काळात तिचा
माहेरचा असतो आधार
बापानंतर भावाने कोणत्याही
परिस्थितीत नाही घ्यावी माघार
आईबापाशिवाय तिला माहेराला
भावाशिवाय दुसरं कोणीच नसतं
तिचं अख्ख माहेर एका भावात
एकवटलेलं असतं
ओवाळणी म्हणून द्यावे तिला
मनापासून एकच वचन

कोणत्याही संकटवेळी ताई
मी करीन तुझं रक्षण

मी करीन तुझं रक्षण
राजू ल.उदमले
राहुरी, अहमदनगर
९८९०३५४०८९
No comments:
Post a Comment