Saturday, December 10, 2022

 🌺  🌺  🌺  🌺  🌺  🌺  🌺  🌺  🌺  🌺  🌺  🌺  🌺  🌺 

*आयुष्यात सुख असो किंवा दुःख,*
*जगावं तर लागतच.*
*मग दुःखात राहून काय होणार,*
*दुःखचं मिळणार.*
*पण जर आपण दुःखातही आनंदाने राहाण्याचा प्रयत्न केला,*
*तर किमान आपण आपले पुढील जीवन तरी,*
*चांगल्या पध्दतीने जगण्याचा प्रयत्न करू शकतो.*
*म्हणून परिस्थिती कोणतीही असो,*
*कधीच नाराज,हताश होऊ नका.*
*नेहमी पॉझिटिव्ह विचार ठेवा.*
*निगेटिव्ह विचारांना मनात जागा देऊ नका.*
*स्वामींची मनोभावे सेवा करा.*
*आपल्याला जे आयुष्यात हावे आहे,*
*ते संत व सद्गुरुकृपेने,*
*आपल्याला नक्कीच मिळेल.*
*सद्गुरूवर विश्वास ठेवा,*
*त्यांना मनापासून शरण जा.*
*एकाग्रतेने सेवा करा.*
*आयुष्यात कधी कधी आपण,*
*ज्या गोष्टींची अपेक्षा देखील केलेली नसते,*
*त्या गोष्टी सद्गुरू आपल्याला देतात.*
*म्हणून निश्चित राहा,सेवा करा.*
*आणि आपल्या मनाला नेहमी सांगत राहा,*
*हे पण दिवस जातील.*
*चांगले दिवस पण नक्कीच,*
*व लवकरच येतील...!!*

                 🙏🏻🌹🙏🏻

 🌺  🌺  🌺  🌺  🌺  🌺  🌺  🌺  🌺  🌺  🌺  🌺  🌺  🌺 



*माणसाला देवानेच बुद्धी दिलेली आहे,*
*तर मग त्याच्या बऱ्यावाईट कर्मांना,*
*देवच जबाबदार ठरत नाही का.?*
*या संदर्भात जीवनविद्येचा दृष्टीकोन काय आहे.?*
*परमेश्वराकडून मानवाला बुद्धी,*
*हे अत्यंत मौल्यवान असे अंतरेंद्रिय प्राप्त झालेले आहे.*
*बुद्धी असेल तर भांडवल नको...*
*अशी एक उत्कृष्ट म्हण,*
*मराठी भाषेत आहे.*
*याचा भावार्थ असा की,*
*बुद्धी हेच फार मोठे भांडवल आहे.*
*या बुध्दीच्याच बळावर,*
*निसर्गाच्या चराचर सृष्टीत,*
*माणूस हा प्राणी सर्वश्रेष्ठ ठरला आहे.*
*अशा या बुध्दीची मौल्यवान देणगी,*
*ईश्वराकडून म्हणजे निसर्गाकडून,*
*माणसाला भांडवल म्हणून,*
*मिळालेली आहे.*
*इतकेच नव्हे तर या बुद्धीचे भांडवल कसे वापरायचे,*
*याचे पूर्ण स्वातंत्र्य माणसाला प्राप्त झालेले आहे.*
*या बुध्दीचा उत्कृष्ट वापर करून,*
*नराचा नारायण व्हायचे की,*
*तिचा अयोग्य वापर करून,*
*नराचा वानर व्हायचे,*
*हे ठरविण्याचे काम माणसाचे आहे,*
*देवाचे किंवा निसर्गाचे नाही.*
*याचाच अर्थ असा की,*
*प्राप्त झालेल्या भांडवलाचा योग्य वापर करून,*
*नफा मिळवून...*
*आनंदाची दिवाळी करायची की,*
*त्याचा अयोग्य वापर करून,*
*दुःखाचे दिवाळे काढायचे,*
*हे ठरविण्याचे काम ज्याचे त्याचे.*
*थोडक्यात...*
*माणसे जी बरी-वाईट कर्मे करतात.*
*त्यांच्या बऱ्या-वाईट फळांना,*
*माणूसच जबाबदार असतो,*
*ईश्वर किंवा निसर्ग नाही...!!*

                🙏🏻🌹🙏🏻

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...