





कविता
*कवितेत असतात शब्द*
कल्पनेतील
आठवणीतील,
साठवणीतील
*कवितेत असतात भावना*
जीवनातील
आनंदाच्या
दुःखाच्या
*कवितेत असतात प्रसंग*
समाजाचे
निसर्गाचे
घटनांचे
*कवितेत असतात कल्पना*
भविष्याच्या
वर्तमानाच्या
भुतकाळाच्या
*कवितेत असतात पात्र*
सत्त्याचे
कल्पनेचे
कल्पनेपलीकडचे
*कवितेत असतात नाती*
मानलेली
रक्ताची
रक्तापलीकडची
*कविता बनली जाते*
माझी
तुमची
आपली
राजू लक्ष्मण उदमले
राहुरी, अहमदनगर
९८९०३५४०८९
No comments:
Post a Comment