" हर घर तिरंगा अभियान "
राष्ट्रध्वज कसा लावावा... ?
१) राषट्रध्वज हे हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सूत, पॉलिस्टर, सिल्क, खादी, लोकरीपासून तयार केलेला वापरावा.
२) प्लास्टिक किंवा कागदी झेंडा फडकवू नये.
३) तिरंगाचा आकार हा ३:२ या प्रमाणातच असावा.
४) तिरंगा फडकवताना नेहमी झेंड्यातील केशरी रंग हा वरच्या बाजूने आणि हिरवा रंग हा जमिनीच्या बाजूने राहील याप्रमाणेच फडकवावा.
५) राष्ट्रीय ध्वज लावताना स्तंभावर वरच्या टोकावर लावावा.
६) राष्ट्रध्वजावर कोणत्याही प्रकारचे अक्षर किंवा चिन्ह लिहू नये.
७) वातावरण कसलाही असो राष्ट्रध्वज हे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकवावा.
८) राष्ट्रध्वज कुठल्याही प्रकारे फाटलेला, मळलेला अथवा चुरगळलेला लावू नये. तसेच राष्ट्रध्वज उभारताना तो कुठल्याही पद्धतीनं फाटणार नाही याची काळजी घ्यावी. ध्वज उतरवताना हळूहळू सन्मानाने उतरवावा. त्याचा अनादर होईल असे कृत्य करू नये.








No comments:
Post a Comment