*शंका आणि गैरसमज हे मानसिक आजार आहेत सुसंवाद हेच त्याच्यावर एकमेव गुणकारी औषध आहे सुख शोधून सापडत नसते त्याला प्रत्येक गोष्टीत बघण्याची दृष्टी असावी लागते जीवनात उत्तम मित्र योग्य रस्ता चांगले विचार उच्च धेय आणि अंगी नम्रता या पाच गोष्टी पाच बोटाप्रमाने असतात आणि सर्वच जुळून आल्या तर वज्रमुठ तयार होते आणि याच वज्रमुठीची ताकत माणसाला यशाकडे घेऊन जाते न मागता वाट्याला आलेल्या चांगल्या माणसांचे महत्व त्यांनी पाठ फिरवल्या शिवाय कळत नाही नकारात्मक प्रवृत्तीच्या लोकांना प्रतिसाद देणे जितके कमी कराल तितकी आपल्या जीवनात प्रगती होईल सुख हा साधा सरळ शब्द पण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य गिळून टाकतो दुःख हा वेदनादायक शब्द पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचं कसं याचं मार्गदर्शन करत असतो नाती इलेक्ट्रिक करंटसारखी असतात चुकीची जुळली तर आयुष्यभर झटके आणि योग्य जुळली तर तुमचं पूर्ण आयुष्य प्रकाशमय माणूस कितीही आपल्या बुध्दीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी नियतीने मांडलेला डाव आणि नियतीने ठरविलेला शेवट हा त्याला स्वीकारावाच लागतो कौतुक नावाची एक अशी संजीवनी आहे जी आत्मविश्वास गमावलेल्याना पुन्हा जगण्याचं बळ देते जगातील सर्वात मोठी प्रॉपर्टी आपलं शरीर आहे ते चांगलं असेल तर आपण जगातील कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करू शकतो शंकेला ईलाज नाही स्वभावाला औषध नाही चरित्र्याला प्रमाणपत्र नाही शब्दापेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारख उत्तम साधन नाही पण त्यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवा मग एक दिवस असा येईल की घड्याळ दुसऱ्याचे असेल पण वेळ तुमची असेल प्रकाशाचे आगमन झाले की अंधार संपतो सावली आली की उन संपते त्याप्रमाणे चांगले विचार जवळ आले की वाईट विचार आपोआप संपतात तुमची कष्टाची मिळकत जर तुमच्या कुटुंबाची गरजा भागविण्या इतकी असेल तर स्वतः ला श्रीमंत समजा कारण श्रीमंतीची व्याख्या आजपर्यंत कुणालाच करता आली नाही माणूस जेव्हा आपल्या मनातील गोष्टी लपवायला लागतो त्याच क्षणापासून तो तणावात रहायला लागतो ओळख मैत्री विश्वास प्रेम श्रध्दा आणि भक्ती या आयुष्यातील एका सुंदर प्रवासाच्या पायऱ्या आहेत कोणी कोठे आणि किती वेळ थांबायचे हे ज्याचं त्यानं ठरवायच यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो पण तो कायम मुक्कामाला राहत नाही आयुष्यात समजदारीची भाषा तेच वापरतात ज्यांनी कमी वयात जास्त वाईट दिवस पाहिलेले असतात दया अशी भाषा आहे की ती बाहिर्यालाही ऐकायला येते आणि मुकल्याला देखील समजू शकते आपलसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही फक्त आपण जे बोलतो ते सत्य व मनापासून असणे गरजेचे आहे स्वतःसाठी समाधान शोधताना इतरांच्या आनंदाला ठेच लागु नये याची जाणीव झाली की आपल्या जीवनाची वाटचालही परिपक्वतेकडे चालली आहे हे निश्चित समजावे तोंडातून निघालेला शब्द चुकलेली संधी अन् वाया गेलेला वेळ या तिन्ही गोष्टी आयुष्यात परत मिळवता येत नाहीत कुणास दुखावू नये उगाच गम्मत म्हणून बरंच काही गमवावं लागतं किंमत म्हणून सौंदर्य हे वस्तूत नसते पहाणाऱ्याच्या दृष्टीत असते साधेपणा ही सगळ्या पेक्षा चांगली सुंदरता आहे क्षमा ही चांगली शक्ती आहे विनम्रता हा सगळ्यात चांगला स्वभाव आहे आणी आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नात आहे विरोध आणि टिकेला सामोरे त्याच व्यक्तीला जावे लागते ज्याने जीवनभर प्रामाणिक पणे काम केलेले असते स्मित हास्य ही अशी वक्र रेषा आहे की जी आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी सहज सरळ करू शकते आयुष्यात दोन प्रकारचे लोक येतात एक तुम्ही चुकलात तर चुक सुधारण्या साठी मार्गदर्शन करणारे आणि दुसरे तुमची एक चुक व्हावी म्हणून वाट बघणारे मधावर पहिला नैतिक हक्क हा फुलांचा असतो पण मध चोरून पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाश्यांना त्याचे श्रेय दिले जाते समाजातही असेच असते प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात आणि वांग्याचा भोपळा करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होतात समोरच्या व्यक्तीच्या यशाची उंची गाठायची असेल तर त्याच्या डोक्यावर पाय ठेऊन नाही तर त्याच्या चरणावर हात ठेवा तो स्वताः वाकून तुम्हांला उंचीवर नेईल मान मिळवण्यासाठी जर स्वाभिमान गहाण ठेवावा लागत असेल तर महान होण्यापेक्षा सामान्य राहिलेलं बर प्रश्न निर्माण करणारी माणसं हुशार असतात पण प्रश्नच निर्माण होऊ नयेत म्हणून जी काम करतात ती माणसं बुद्धिमान असतात डिलीट जितक्या लवकर होते तितक्या लवकर डाउनलोड होत नाही कारण वेळ सर्जनलाच लागतो विसर्जन ला नाही मग ते कोणतेही एप्लिकेशन असो किंवा नाते आस्तिक बनू नका नास्तिक बनू नका केवळ वास्तविक बना जे चांगले आहे ते ग्रहण करा वाईट आहे त्याचा त्याग करा उसना उजेड घेऊन आयुष्याच्या अंधा-या वाटा शोधण्यापेक्षा स्वयंप्रकाशी होऊया नातं आपुलकीच असावं एकमेकांना जपणार असावं जवळ असो वा लांब नेहमी आठवणीत*

विचारधन परिवर्तन
*
शुभदिन
*
No comments:
Post a Comment