*देव शब्द आहे , जो तुम्हाला पुस्तकात मिळेल.*
*देव मूर्ती आहे , जी तुम्हाला मंदिरात मिळेल.*
*देव माणूस आहे , जो तुम्हाला समाजात मिळेल.*
*पण*
*देव जीवनात आहे, तो तुमच्या आत मिळेल.*
*हवेची पण गंमत असते ना,*
*चाकातून गेली की , चाक पळत नाही.*
*डोक्यात गेली की,*
*चांगल-वाईट कळत नाही.....*
*आणि श्वासोच्छवास सोडून गेली की,*
*घरात कोणी ठेवत नाही..*
*आयुष्य खूप लहान आहे*
*प्रेमाने गोड बोलत रहा.!*
*धन-दौलत कोण कोणाला देत नसत*
*फक्त माणुसकी जपत रहा.!!*
*प्रसंग कोणताही असो,*
*सुखाचा की दुःखाचा*
*त्यासाठी कोणी हाक दिली तर*
*प्रेमाने साथ द्या..!!!*
*माचीसच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो, म्हणून*
*थोड्या घर्षणाने ती पेटून उठते.. आणि *स्वतःच जळते...*
*परंतु,*
*आपल्याजवळ तर डोकं आहे आणि मेंदू* *सुद्धा आहे...*
*मग आपण का लहानसहान गोष्टीने पेटून उठतो..*
*शांत रहा...*
*स्वस्थ रहा...*
*घर्षण करून पेटविणाऱ्यांपासून सावध रहा...*
*आपण जगण्यासाठी आहोत जळण्यासाठी नाही...*
*जीवन खुप सुंदर आहे ते आनंदाने जगा*
*


.....
No comments:
Post a Comment