Friday, December 16, 2022

मरावं की यांना मारावं ?

आजोबांनी कष्ट करून विकत घेतलेली, कसलेली, 

माझ्याच आज्याची शेती माझ्या बापाच्या नावावर करावी 
म्हणून तलाठी सज्जात गेलो . . .*

तलाठ्यानं सांगितलं -
काम करू *पण,*
 *देणार किती ?*

मला वाटलं शेती आमची, 
बाप माझा, 
आजा माझा.
मग याला का पैसे द्यायचे ?

तलाठ्याची तक्रार करावी म्हणून *पोलिस स्टेशनला गेलो.*
पोलीस म्हणाले -
 गुन्हा दाखल करू, तपास करू पण . . .
*आमच्या चहा पाण्याचं काय ?*

*मला पुन्हा राग आला.*
*यांना तर, सरकार म्हणजेच मी पगार देतोय मग पुन्हा हे चिरीमिरी का मागत असतील.*

म्हटलं हे *आमदारांच्या कानावर टाकू,*
आमदार म्हटले . . .
 त्याची गडचिरोलीला बदली करू, 
त्याला निलंबित करू,
मंत्र्यांना भेटू *पण . . .*
*वजन ठेवल्या शिवाय फाईल पुढं जातच नाही.*

*मला वाईट वाटलं.*
*यांना तर मी मतदान केलं होतं.*

वाटलं *कोर्टात जाऊ . . .*
गेलो.
तिथं गेल्यावर कळलं की,
*तिथं एक आज-उद्या मरेल अशी म्हतारी आली आहे.* 

*तिच्यावर तरुणपणी* *अत्याचार झाला होता. त्या मॅटरची तारीख होती.*
*अजून निकाल लागला नव्हता.*

शिवाय निकाल कसा लागेल याची खात्री नव्हती. 

म्हटलं हे एखाद्या . . . पत्रकार, 
लेखक, 
कवीला सांगावं . . .
*मन हलकं करावं !* आपल्या प्रश्नांना ते आवाज देतील.

तिकडे गेलो s s
*तर सगळेच म्हणाले,* 
*पेन आमच्या हातात असला तरी,*
*त्यातली शाई आम्ही विकली आहे.*
आम्ही तसं लिहू शकत नाही.
आमचे हात अन . . .
पेन बांधलेले आहेत. 

*मला याचा प्रचंड राग आला होता.*

म्हणून एका *साधू कडे गेलो.*
वाटलं तेवढीच आत्मशांती मिळेल.
मठावरचे सेवेकरी म्हणाले . . .
*उद्या या !*

सध्या भाऊसाहेब,
 P I साहेब, 
आमदार साहेब, 
पत्रकार साहेब,
लेखक, 
कवी आले आहेत.
महाराज त्यांच्यासोबत बिझी आहेत, 
नंतर . . .
 त्यांच्या सोबत जेवायला बसणार आहेत. 
आज ते तुम्हाला टाईम देणार नाहीत.

*माझा सगळ्यांवरचा विश्वास उडाला होता.*

म्हटलं *जनतेच्या दरबारात* जाऊ ...!

लोकांसमोर गेलो, लोकांना हे सांगितलं.
*लोकं म्हटली हा येडा झालाय् . . . . .*

हल्ली काही बरळतोय् !
*नंतर कळलं . . .*

*लोकं गुलाम झाली आहेत !*
लाचार झाली आहेत !

*क्षणभर वाईट वाटलं.*

*मी करणार तरी काय होतो.*

*त्यांच्यात सामील व्हावं कि मरावं ?*

*कि मारावं यांना . . .*

       😢 👊😢

*- मी एक मतदार !*
*(या देशाचा मालक ?)*

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...