Saturday, December 10, 2022

अंकुश..


माणसाला काय हवं असतं? स्वातंत्र्य कुठे राहायचं, कुठे जायचं कुठे बोलायचं, आर्थिक, भावनांचं, विचारांचं आणि बरच काही जे करू वाटतं ते सर्व करायचं‌ हे फ्रीडम! ज्याची तो आजीवन अभिलाषा बाळगतो आणि जिथं हे असतं तिथेच तो व्यक्तीही असतो कायम त्या विचारांत, भावनांत भविष्य, भूतकाळात किंवा सर्व तो अनुभवत असतो, जगत असतो..

प्रत्येक जीवाला हवहवसं वाटणारं हे स्वातंत्र्य.. 
आयुष्यात जगतानाही काही लोक प्रत्येक क्षण अनुभवतात, जगतात अगदी पूर्ण, सर्व जसं विसरण्याचा प्रयत्न करतात मग तो वर्तमान, भविष्य किंवा भूतकाळ असो... तर काही नेहमी जागृत आणि गूढ विचारांत असतात. तसं ते आवश्यकही आहे, पण हे आपलं विचार करणं सोबत खूप मर्यादाही नकळत देऊन जातं. जरी वरून हसून खेळून असणारी ही व्यक्तिमत्वं आतून मात्र कमाल प्रत्येक गोष्टीचा, परिणामांचा बारीक असा विचार करणारी असतात. 

आता हेच बघा‌ना, आपण जेव्हा लहाण असतो, तेव्हा प्रत्येक छोट्या वा मोठ्या गोष्टींनी आश्चर्यचकित व्हायचो, अपार जिज्ञासा मनात ठेवायचो. तशी ती आयुष्यभर असतेच म्हणा, पण लहान वय असताना, जगाचा अनुभव नसताना या गोष्टी जशा खूप उत्साहवर्धक असतात किंवा तशा त्या वाटतात‌ आणि आपण जसे मोठे होत जातो तशा गोष्टी बदलत जातात.. 

ही विचारांची कैद सोबत खूप वैचारिक मर्यादाही घेऊन येते. जिथे ही नसते तिथे इच्छित जरी प्राप्त झालं, तरीही कुठेतरी त्या भावनेला अंकुश हा येतोच. पण कदाचित हेच आपलं मानवी जीवन, पूर्ण आणि कायम असं काहीही नाही, आपल्या हातात प्रसंगांना जसं फक्त तोंड देणं,‌ हाताळणं पण ते निर्माण करणं नाही..!!!

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...