
*आत्मसुखाकडे कस जायचं.?*
*त्यासाठी सद्गुरूंनी दोन मार्ग सांगितले.*
*एक direct,*
*आणि दुसरा indirect,*
*डायरेक्ट मार्ग सर्वाना झेपेलच,*
*असं नाही.*
*कारण...*
*दिव्य साधना समजणं,*
*आणि स्वरूपाचं भान घेणं,*
*त्या स्वरूपापर्यंत जाणं हे सोपं काम नाही.*
*सद्गुरूंनी सर्वसामान्य माणसाचा विचार केला.*
*साक्षात्कार होणारे फार कमी लोकं असतात.*
*पण सद्गुरूंनी.*
*सुखाचा अनुभव सामान्य लोकांसाठी,*
*खुला केला,*
*त्या मार्गाने गेलात तर हे जग सुद्धा सुखी होईल.*
*संपूर्ण विश्वात क्रांती करण्याची ताकद,*
*या मार्गात आहे.*
*सद्गुरूंनी सांगितलं की,*
*खरं सुख हे आत मध्येच असतं.*
*जाणिवेतच असतं.*
*हे सुख आपल्याला बाहेर विषयांच्या मार्फत मिळतं.*
*आपण समजा सिनेमाला गेलो,*
*त्यातून जो आनंद मिळतो,*
*तो त्या सिनेमातून मिळत नसतो,*
*तो आनंद आतूनच येत असतो.*
*खरा आनंद आत्मानंद्च असतो,*
*पण ते आपल्याला विषयाच्या आधारे मिळतं.*
*विषयसुख हे आत्मसुखच आहे.*
*पण ते विषयाच्या आधाराने मिळाल्यामुळे,*
*आपण विषयावर अवलंबून असतो,*
*विषय गेला की ते सुख गेलं,*
*कारण...*
*विषय हा कायम स्वरूपी नसतो.*
*जर तुम्ही विषयावर अवलंबून राहिलात,*
*तर तुम्ही कधीच...*
*सुखी होऊ शकणार नाही...!!*



*कधी आठवायचे असेल तर,*
*आयुष्यातले चांगले क्षण आठवावे.*
*आणि विसरायचे असेल तर,*
*आयुष्यातील वाईट क्षण विसरावे.*
*क्षण हा किती छोटा शब्द आहे ना.?*
*पण त्याचा अर्थ फार मोठा आहे.*
*आपल्या आयुष्यात असे अनेक क्षण येत असतात,*
*काही दुःखाचे तर काही आनंदाचे.*
*दुःखाचे क्षण हे जीवन जगण्यासाठी,*
*अनुभव मागे ठेवून जातात,*
*तर आनंदाचे क्षण हे जगणं शिकवून जातात.*
*काही असे ही क्षण येतात,*
*आपल्या सभोवताली सगळेच असतात,*
*पण आपल्या सोबत कुणीच नसतं,*
*त्यावेळीआपल्याला हिंमतीने,*
*त्यांना सामोरे जायचं असतं !*
*कधी वाटते भीती मनाला,*
*कधी मिळतो आनंद मनाला,*
*सुरू असतो हा खेळ सारा.*
*बेसावधपणे मिळालेले,*
*सुखाचे क्षण असो,*
*वा दुःखाचे धक्के असो,*
*आयुष्य जगायला शिकवतात.*
*त्याच बरोबर माणसं ओळखायला ही शिकवतात.*
*जीवनात प्रत्येक क्षण,*
*आपल्याला काहीतरी देत असतो.*
*आपल्या आयुष्याचा एक क्षण तो घेत असतो,*
*म्हणून क्षण आनंदाचे ठेवा साठवून,*
*निवांतांत येतील आठवण बनून...!!*



*सुंदर आयुष्य सहज घडत नसतं,*
*तर ते जणीवपूर्वक घडवावं लागतं,*
*ते म्हणजे प्रार्थनेतून,*
*माणुसकीतून,*
*प्रेमातून,*
*त्यागातून,*
*आणि सर्वात महत्वाचे म्हणजे,*
*कृतीतून घडत असतं...*
*संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की,*
*प्रत्येक गोष्ट ह्रदयाच्या जवळ नसते...*
*जिवन हे दु:खापासुन लांब नसते...*
*आपल्या मैत्रिला जपुन ठेवा.*
*कारण...*
*हीच एक अशी गोष्ट आहे,*
*जी प्रत्येकाच्या नशीबात नसते...*
*आयुष्य जगण्यात,*
*एक वेगळाच रूबाब येतो...*
*आणि...*
*"रुबाब" हा विकत घेता येत नाही.*
*अन् दाखवता पण येत नाही...*
*तो व्यक्तिमत्त्वातून सिद्ध होतो.*
*मस्तक थोडं नमवून बघा,*
*अहंकार मरून जाईल...*
*डोळ्यांना थोडं ओलं करून बघा...*
*कठोर मन ही वितळून जाईल...*
*वाणीवर थोडा संयम ठेऊन बघा,*
*जोडलेली माणसं...*
*कधीच दूर जाणार नाहीत...*
*इच्छा थोड्या कमी करून बघा,*
*समाधानाने जगा,*
*आनंदाचं जग दिसू लागेल...!!*



No comments:
Post a Comment